फलज्योतिषविद्येला जोडलेल्या धार्मिक विधी,उपासनांचा जातकाला उपयोग काय?
अस्मादिक फलज्योतिषविद्येचे हौशी अभ्यासक आहेत.
फलज्योतिष हे भारतात विकसित झाले असले तरी त्याचे मूळ भारतीय नाही. इजिप्त,बॅबिलोनिया या प्रदेशात जन्मलेली ही विद्या आहे.हिचा संबंध आकाशस्थ ग्रह, उपग्रह, छायाग्रह आणि नक्षत्रे यांच्याशी आहे. म्हणजे निर्जीव ,भटक्या आकाशस्थ वस्तूंशी फलज्योतिषविद्येचा संबंध आहे. हे सर्व ग्रह, उपग्रह, नक्षत्रे, छायाग्रह हे मानव पृथ्वीवर निर्माण होण्याआधीपासून आकाशात आहेत. याचाच अर्थ असा की विशिष्ट ग्रह, तारे यांचा पृथ्वीवरील देवी देवतांशी काहीच संबंध नाहीये. माणसाने तो ओढूनताणून लावला आहे. म्हणजे आकाशस्थ ग्रह,तारे मानवावर करत असलेले परिणाम सततच्या निरीक्षणाने तपासून पाहिले तर ग्रह, तारे बर्याच प्रमाणात मानवावर परिणाम करत असावेत,त्याच्या स्वभावाशी ग्रह,तार्यांचा संबंध असावा असे म्हणता येऊ शकते. पण मानवाला सतत सुख, पैसा, आरामदायी , आनंदी जीवन हवे असते. त्यामुळे हे मिळण्यात अडथळे फार येऊ लागले आणि बरेच प्रयत्न करुनही त्या हव्याशा गोष्टी मिळणे अवघड झाले की तो फलज्योतिषविद्या जाणणार्या अभ्यासकाची मदत घेऊन त्या गोष्टी मिळवू पाहतो. सगळेच नव्हे पण बरेच फलज्योतिषी जातकाला काही धार्मिक विधी,दैवी उपासना , अध्याय वाचन इ. सुचवतात आणि इच्छित पूर्ण होण्याची आशा दाखवतात.
वर सांगितल्याप्रमाणे ग्रह , तारे यांचे नियंत्रण पृथ्वीवरील कोणत्याच देवाकडे, देवीकडे नाही. ते माणसाने ओढूनताणून जोडले आहे. मग असे असताना या धार्मिक विधी, उपासनांचा निव्वळ जातकाचे मनोबल वाढणे यासाठीच फारच थोडा उपयोग होतो (ते सुद्धा जातक आस्तिक असेल तरच) पण मूळ समस्या तशीच राहते. विशिष्ट समस्येसाठी विशिष्ट धार्मिक विधी किंवा विशिष्ट उपासना केली तर ती विशिष्ट समस्या सुटलेली आहे असे किमान १०० जातकही मिळायचे नाहीत. केवळ आशावाद!
मग प्रश्न असा पडतो की फलज्योतिषाला जोडून ठेवलेल्या या धार्मिक विधी, उपासनांचा उपयोग काय? कारण जातकाची वैयक्तिक समस्या सुटणे किंवा ती बरीच सौम्य होणे , कुवतीपेक्षा जास्तीच्या अपेक्षा पूर्ण होणे यातले काहीच धार्मिक विधी, उपासनांमुळे बदलू शकत नसेल तर त्या फलज्योतिषविद्येशी जोडणे साफ चुकीचे आहे. फलज्योतिषविद्येत अचूकता आणण्याच्या प्रयत्नांमधली धोंड आहे असे वाटते.
याला जोडून उपप्रश्न: माझा रत्ने आणि वास्तुशास्त्र यांचा अजिबात अभ्यास नाही. पण वरील प्रकार हातात धारण करायच्या रत्नांबाबतसुद्धा लागू होतो का? विशिष्ट रत्न धारण केलं तर विशिष्ट असं चांगलं फलित मिळेल यात काही अर्थ असावा का? वास्तुरचनेत काही बदल केले तर हवे तसे चांगले परिणाम दरवेळी मिळतात का? तुमचे अनुभव काय आहेत?
वर्गीकरण
खरंय तुमचं!
हं.
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरांशी सहमत.
हे सर्व ग्रह, उपग्रह, नक्षत्रे, छायाग्रह ...
In reply to हे सर्व ग्रह, उपग्रह, नक्षत्रे, छायाग्रह ... by अनन्त्_यात्री
अनन्त_यात्री
In reply to अनन्त_यात्री by उपयोजक
राशी, ग्रह आणि माणसाचा स्वभाव
In reply to अनन्त_यात्री by उपयोजक
ग्रह,तारे यांचा पृथ्वीवरील
In reply to ग्रह,तारे यांचा पृथ्वीवरील by गवि
आपण मतप्रदर्शन करुन कोण स्वत:चे मत बदलतो?
In reply to आपण मतप्रदर्शन करुन कोण स्वत:चे मत बदलतो? by उपयोजक
मत आहे म्हणून लिहीले
In reply to हे सर्व ग्रह, उपग्रह, नक्षत्रे, छायाग्रह ... by अनन्त्_यात्री
+१
देवा, तुमचे मन स्थिर नाही
In reply to देवा, तुमचे मन स्थिर नाही by पाषाणभेद
पाभे, आपल्या शब्दाशब्दाशी
आणखी एक राहिलंच.
चंद्राने पृथ्वीवर भरती ओहटी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- Masalaफलज्योतिष, रास, नक्षत्रांचे,
In reply to फलज्योतिष, रास, नक्षत्रांचे, by प्रचेतस
वैशाखनंदन म्हणजे काय ते
In reply to वैशाखनंदन म्हणजे काय ते by गवि
वैशाखनंदन म्हणजे गाढव.
In reply to वैशाखनंदन म्हणजे गाढव. by प्रचेतस
हे राम.
In reply to वैशाखनंदन म्हणजे काय ते by गवि
स्क्यूज मी सर...
In reply to स्क्यूज मी सर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वत्र चांगले शोधण्यासाठी
In reply to सर्वत्र चांगले शोधण्यासाठी by गवि
म्हणजे ते कसेही आहेत असे
In reply to म्हणजे ते कसेही आहेत असे by प्रचेतस
आता मनुष्य म्हटला की उन्नीस
In reply to आता मनुष्य म्हटला की उन्नीस by गवि
ते बाकी खरं तुमचं
In reply to फलज्योतिष, रास, नक्षत्रांचे, by प्रचेतस
विषयच संपला.
In reply to विषयच संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेवटी आपण ताऱ्यांपासून
In reply to शेवटी आपण ताऱ्यांपासून by प्रचेतस
तसं नै.
In reply to तसं नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यांच्या वक्री शनी असावा
In reply to फलज्योतिष, रास, नक्षत्रांचे, by प्रचेतस
नै तर काय.
सूर्यामुळेच आपल्या ग्रहावर
मग बाकी ग्रहांवर किंवा
माझ्या कुठे तरी ऐकण्यात किंवा
In reply to माझ्या कुठे तरी ऐकण्यात किंवा by आग्या१९९०
+१
बरोबर. मग बाकी ग्रहांवर किंवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- Masalaपितृदोषाचे वाढते प्रमाण आणि त्रंबकेश्वरी
In reply to पितृदोषाचे वाढते प्रमाण आणि त्रंबकेश्वरी by सर टोबी
शोधले तर सापडतील
आग्या मी जे सांगितले आहे ते
In reply to आग्या मी जे सांगितले आहे ते by आग्या१९९०
आग्या कशाला शब्दछल करत बसायचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- MasalaIn reply to आग्या कशाला शब्दछल करत बसायचे by मदनबाण
ग्रहतार्याच्या तुमच्या
ज्ञात अज्ञात सर्व गोष्टी चा
फलज्योतिषाचा आधार/मदत कोण घेत नाही?
In reply to फलज्योतिषाचा आधार/मदत कोण घेत नाही? by उपयोजक
७) फलज्योतिषावर
उप्योजक
मूळ प्रश्न असा की,
मुहूर्त...
नवग्रह शांती
In reply to नवग्रह शांती by विकास...
का ते सांगा . . .
In reply to नवग्रह शांती by विकास...
हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे
गहन विषय
ह्म्म वाचतोय
स्वतः याचा अनुभव घेतला आहे.
In reply to स्वतः याचा अनुभव घेतला आहे. by बोलघेवडा
बोलघेवडा
माझा छोटासा अनुभव
माझ्या अल्प अभ्यासावरून