✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

प
पाषाणभेद यांनी
Wed, 09/29/2021 - 07:37  ·  लेख
लेख
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ मिपाकरहो! आपला कट्टा नाशिक येथे दिनांक ०३/१०/२०२१ रोजी नाशिक येथे होणार आहे. आपणा सर्वांना या निमित्ताने तेथे कुटूंबासहीत उपस्थित राहण्याचे हार्दीक निमंत्रण आहे. एकत्र जमण्याचे ठिकाणः नाशिक, अशोक स्तंभ - सर्कल थिएटर (किंवा ठरणार्‍या हॉटेलातही सरळ यावे) वेळः मिसळ खाण्याची, अर्थात सकाळची, ९:३० वाजताची. पुन्हा एकदा सर्व मिपा परिवाराला एकत्र येण्याचे हार्दीक निमंत्रण आहे. #मिपाकट्टा, #मिसळपाव.कॉम-कट्टा, #मिपाकट्टा@नाशिक, #चला-नाशिकला, #mipakatta@Nashik, @katta-nashik
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19377 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

नाशिकला असतो तर नक्की आलो

प्रचेतस
Wed, 09/29/2021 - 09:09 नवीन
नाशिकला असतो तर नक्की आलो असतो. कट्ट्यास शुभेच्छा आहेतच.
  • Log in or register to post comments

अस्संच बोल्तो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/29/2021 - 12:36 नवीन
नाश्कात असतो तर, आलो असतो. शुभेच्छा. मिपाकट्टे जगभर होत राहीले पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कट्ट्याला शुभेच्छा!

खेडूत
Wed, 09/29/2021 - 10:10 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा! वृत्तांत मात्र येऊदे. . मागचा कधी वाचला हेही आठवत नाही इतके दिवस लोटलेत! अद्याप कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने उपस्थित मिपाकर काळजी घेतील..
  • Log in or register to post comments

हो काळजी घेवू.

पाषाणभेद
Wed, 09/29/2021 - 10:22 नवीन
हो काळजी घेवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

नक्कि उपस्थित राहु

गॉडजिला
Wed, 09/29/2021 - 10:37 नवीन
कोरोना मास्क वगैरे नियम पाळुन.
  • Log in or register to post comments

हजेरी लावा आणि दणकून फोटो पाठवा.

कंजूस
Wed, 09/29/2021 - 11:32 नवीन
थोडे ओडिओसुद्धा घ्या. ---- पण रामकुंडावर श्राद्धानिमित्त नाशकात गर्दी आहे ना??
  • Log in or register to post comments

रामकुंडावर आताच कुठे जायचे?

पाषाणभेद
Wed, 09/29/2021 - 12:05 नवीन
रामकुंडावर आताच कुठे जायचे? जायचे ते शेवटचा घास घ्यायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

छान

hrkorde
Wed, 09/29/2021 - 12:01 नवीन
छान
  • Log in or register to post comments

खाण्यापिण्याची चंगळ करा.

सुरिया
Wed, 09/29/2021 - 12:09 नवीन
खाण्यापिण्याची चंगळ करा. मज्जा करा. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मस्तच !

चौथा कोनाडा
Wed, 09/29/2021 - 13:00 नवीन
मस्तच ! नाशिककर नसल्याने अर्थातच येऊ शकणार नाही. कट्टयास अ. हा. शु, बर्‍याच दिवसात मिपा कट्टा झालेला नाहीय, वृतांत वाचण्यात आलेला नाहीय, तेव्हा हे वृत्त खुप आश्वासक आहे !

🥂

चीयर्स मिसळपाव, चीयर्स मिपा कट्टा !
  • Log in or register to post comments

कट्ट्यास शुभेच्छा

हेमंतकुमार
Wed, 09/29/2021 - 13:05 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

कट्ट्यास शूभेचहा :=)

रंगीला रतन
Wed, 09/29/2021 - 13:40 नवीन
कट्ट्यास शूभेचहा :=) सोशल डीस्टनन्सीग चे पालन करून मज्जा करा.
  • Log in or register to post comments

कट्ट्यास शुभेच्छा!

टर्मीनेटर
Wed, 09/29/2021 - 13:42 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा! फोटोंसहित व्रुत्तांताच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

कट्ट्यास शुभेच्छा!

नावातकायआहे
Wed, 09/29/2021 - 13:46 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा! व्रुत्तांत येइलच!!
  • Log in or register to post comments

नाशिकला असतो तर नक्की आलो

सतिश गावडे
Wed, 09/29/2021 - 13:50 नवीन
नाशिकला असतो तर नक्की आलो असतो. कट्ट्यास शुभेच्छा आहेतच.
  • Log in or register to post comments

शौकीनने अशोकस्तंभाजवळच

प्रचेतस
Wed, 09/29/2021 - 13:57 नवीन
शौकीनने अशोकस्तंभाजवळच कायमस्वरूपी गाळा घेतलाय म्हणे.
  • Log in or register to post comments

पुणे कट्टा करायला कोणी उत्सुक आहे का?

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 09/29/2021 - 13:58 नवीन
त्याच दिवशी त्याच वेळी पुण्यात कट्टा होऊ शकतो का? ठिकाण डेक्कन(पाताळेश्वर), औध,बाणेर किवा तत्सम बादवे नाशिक कट्ट्याला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

व्वा त्याच दिवशी त्याच वेळी दुसरा कट्टा पुन्यात ?

गॉडजिला
गुरुवार, 09/30/2021 - 21:54 नवीन
हे वाचुनच माझ्यात अंमळ तारुण्य निर्माण झाले आहे असे वाटत आहे :) पुणे कट्याला माझ्या मनपुर्वक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

शुभेच्छा!

नि३सोलपुरकर
Wed, 09/29/2021 - 14:20 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा! ...व्रुत्तांताच्या प्रतिक्षेत. नि३
  • Log in or register to post comments

कट्ट्यास शुभेच्छा. वृत्तांत

अमरेंद्र बाहुबली
Wed, 09/29/2021 - 14:21 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा. वृत्तांत जरूर कळवावा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा. येणे शक्य नाही.

कॉमी
Wed, 09/29/2021 - 14:29 नवीन
शुभेच्छा. येणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

पेरूची वाडी

पाषाणभेद
गुरुवार, 09/30/2021 - 09:31 नवीन
पेरूची वाडी https://g.page/peruchi-wadi-chulivarachi-misal?share Address: Mungsare Phata Makhmalabad Girnare, highway, Nashik, Maharashtra 422003, India Hours: Open ⋅ Closes 4PM Phone: +91 95033 02007 ज्यांना शक्य असेल त्यांनी सरळ या पत्यावर सकाळी 9:30 च्या सुमारास पोहोचावे. वाहनाची सोय नसणार्‍यांनी मध्यवर्ती ठिकाण अशोकस्तंभ, सर्कल थिएटरच्या कंपांऊंड साईडला थांबावे. म्हणजे त्यांना शोधणे अन पीक अप करणे सोपे होईल. शक्यतो वेळेबरहूकूम पोहोचलात तर लवकर खाणे होईल व इतर स्पॉटही भटकंती करता येईल.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

तुषार काळभोर
गुरुवार, 09/30/2021 - 10:02 नवीन
पुण्यापासून अंमळ दूर असल्याने उपस्थिती शक्य नाही. पण बर्‍याच वर्षांनी जाहीर मिपा कट्टा होत असल्याने मनःपूर्वक शुभेच्छा! सविस्तर वृत्तांत आणि भरपूर फोटो टाका. जमल्यास दोन चार जणांनी मिळून धावता वृत्तांत + फोटो टाकत राहा...
  • Log in or register to post comments

शुभेच्छा! ग्रुप फोटो

अनन्त्_यात्री
गुरुवार, 09/30/2021 - 20:10 नवीन
काढताना मास्क काढावा ही नंब्र विनंती.
  • Log in or register to post comments

हो हो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/30/2021 - 20:31 नवीन
आणि फोटोखाली क्याप्शन टाकून हे हे यांचं नाव आहे, डावीकडून, उजवीकडून, क्रमांक अनुक्रम, बसलेले उभे... वगैरे ठळक खुणा सांगाव्यात समजायलाही सोपं जाईल. ;/ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

कट्टयाला सुभेच्छा!

जुइ
गुरुवार, 09/30/2021 - 20:21 नवीन
वृत्तांत येऊद्यात.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

लई भारी
Fri, 10/01/2021 - 05:52 नवीन
वृत्तांत येऊ द्या फोटोसकट!
  • Log in or register to post comments

वृत्तांत

MipaPremiYogesh
Sun, 10/03/2021 - 10:08 नवीन
वाह बऱ्याच दिवसांनी कट्टा..मस्त..येऊ द्यात लेख.. पुणेकरांनो घ्या मनावर कट्ट्याचे
  • Log in or register to post comments

+१२२

हेमंतकुमार
Sun, 10/03/2021 - 13:04 नवीन
पुणेकरांनो घ्या मनावर कट्ट्याचे
2019 च्या दिवाळी पूर्व पाताळेश्वर कट्ट्याची पुनरावृत्ती व्हावी ऐकताय ना मालक मंडळी :)) नाशिकचा वृत्तांत अजून का येईना? तमाम महाराष्ट्रीय मिपाकरांचे डोळे लागून राहिले आहेत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MipaPremiYogesh

कट्टा सुरू झाला का?

तुषार काळभोर
Sun, 10/03/2021 - 10:24 नवीन
कोण कोण आलंय? धावता वृत्तांत टाकत राहा..
  • Log in or register to post comments

पाऊस असल्याने कट्ट्याला माझा

गॉडजिला
Sun, 10/03/2021 - 13:01 नवीन
पाऊस असल्याने कट्ट्याला माझा ब्रेक पण दुपारी महाराजा काठीयावाडी ढाब्यावर जेवायचे नक्की आहे... कोणी आहे का फ्री ? मस्त जेवण अशी चव फक्त अन् फक्त नाशकातच.
  • Log in or register to post comments

डोंबीवली फास्ट न पकडता

संगणकनंद
Sun, 10/03/2021 - 13:11 नवीन
डोंबीवली फास्ट न पकडता आल्याने कट्ट्याला हजर राहू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

मी एका पाताळेश्वर कट्ट्याला...

कंजूस
Sun, 10/03/2021 - 15:42 नवीन
तिथूनच ओडिओ टाकला होता. (अनिवासी यांच्यासाठीचा डॉ. सुहास म्हात्रेंनी बोलावलेला.)
  • Log in or register to post comments

मंडळी,

पाषाणभेद
Mon, 10/04/2021 - 18:36 नवीन
मंडळी, मिपाकट्टा@नाशिक २०२१ अगदी उत्साहात संपन्न झाला. वृतांतलेखन जमल्यास टाकतो. पण फोटो आपल्या मिपाच्या फेबू पत्यावर टाकले आहेत. त्याचा लाभ घ्यावा.
  • Log in or register to post comments

https://scontent.fbom19-2.fna

पाषाणभेद
Mon, 10/04/2021 - 18:38 नवीन
https://scontent.fbom19-2.fna.fbcdn.net/v/t1.6435-9/244261687_4292767110773210_6465271428115334007_n.jpg?_nc_cat=100&ccb=1-5&_nc_sid=730e14&_nc_ohc=HtpF4l2cKHkAX_N9QwN&_nc_ht=scontent.fbom19-2.fna&oh=255a43ef3a78df44f1fc9fe69e0174e6&oe=61803123 Image removed. मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट), श्री. जानू (निळसर शर्ट).
  • Log in or register to post comments

वा.. बहोत खूब!

तुषार काळभोर
Mon, 10/04/2021 - 18:45 नवीन
एकदम फ्लेक्स वगैरे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

+१

गॉडजिला
Mon, 10/04/2021 - 19:35 नवीन
बहूतेक पहिल्यांदाच मीपा कट्टा असा सुन्दर व बहुमान वाढवणारा आयोजित झाला असावा. फ्लेक्स बघुन मन अतिशय उचंबळून आलं. सुरेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

वा, मस्त !

हेमंतकुमार
Mon, 10/04/2021 - 18:47 नवीन
अभिनंदन ! आनंद झाला पाहून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

पाषाणभेद
Mon, 10/04/2021 - 18:57 नवीन
Image removed. मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट), श्री. जानू (निळसर शर्ट). निळ्या टी शर्ट मध्ये असलेला: चि. आरुष (सर्वेष सरांचा मुलगा.), पाठमोरी असलेली माझी मुलगी कु. स्वराली. ----------------------------------------------------------------------------------------------------------------- Image removed. मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट). सौ. पाषाणभेद (अर्चना)- (राखाडी पंजाबी सुट) ----------------------------------------------------------------------------------------------------------------- Image removed. मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), श्री. जानू (निळसर शर्ट). निळ्या टी शर्ट मध्ये असलेला: चि. आरुष (सर्वेष सरांचा मुलगा.), पाठमोरी असलेली माझी मुलगी कु. स्वराली. ----------------------------------------------------------------------------------------------------------------- Image removed. मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट). सौ. पाषाणभेद (अर्चना)- (राखाडी पंजाबी सुट), सौ. कुलकर्णी मॅडम - (हिरवा पंजाबी सुट) ----------------------------------------------------------------------------------------------------------------- Image removed. मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), श्री. जानू (निळसर शर्ट). श्री. जानू (सर्वेष सर व त्यांचे कुटुंब जरा उशीरा आले होते. ) ----------------------------------------------------------------------------------------------------------------- Image removed. मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ मिपाकर त्यांच्या कुटूंबीयांसोबत मिपाकट्याला आले होते. उपस्थित: डावीकडून: सौ. कुलकर्णी मॅडम, सौ. बोरसे मॅडम, झाडावर बसलेली कु. स्वराली, कु. आरूष, सौ. लोहार मॅडम, कु. प्रज्ञा. (तिनही महिला शिक्षिका असून सर्व जणी मराठी विषयच शिकवितात हा दुर्मीळ योगायोग आहे.) ----------------------------------------------------------------------------------------------------------------- Image removed. मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ लहान मुले धबधब्याच्या टोकावरच्या टेकडीवर गेले होते. ----------------------------------------------------------------------------------------------------------------- मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१Image removed. मिपाकट्टा साजरा झाला त्याच्या जवळील दरी गावाजवळ असलेले दर्‍याईमाता देवस्थान. पाठमोरे असलेले श्री. सर्वेष सर (मिपाआयडी - जानू.) ----------------------------------------------------------------------------------------------------------------- Image removed. मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ दर्‍याईमाता मंदीरातून दिसणारे विहंगम दृष्य. धबधबा, दरी, तसेच लांबवर दिसणारे काश्यप्यी धरणाचे पाणी. ----------------------------------------------------------------------------------------------------------------- Image removed. मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ दर्‍याईमाता मंदीरातून दिसणारे विहंगम दृष्य. धबधबा, दरी. मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ चे वृतांतलेखन लवकरच करतो.
  • Log in or register to post comments

धमाल कट्टा केलेला दिसतोय.

कंजूस
Mon, 10/04/2021 - 19:41 नवीन
आणि त्या दऱ्यायी जागाही छान आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

श्रीरंग_जोशी
Mon, 10/04/2021 - 20:10 नवीन
नाशिक येथील मिपाकट्ट्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल पाषाणभेद साहेबांचे व उपस्थित मिपाकर व त्यांच्या कुटूंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन. कट्ट्याचे व भटकंतीचे फोटो छान आहेत.
  • Log in or register to post comments

अस्संच बोलतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/17/2021 - 11:54 नवीन
मिपाकट्टा यशस्वी केल्याबद्दल पाषाणशेठ आणि उपस्थित सर्वांचे अभिनंदन. फ़ोटो वृत्तांत आवडला. लै भारी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

व्वा, व्वा ! सुंदर प्रचि.

चौथा कोनाडा
Mon, 10/04/2021 - 20:44 नवीन
व्वा, व्वा ! सुंदर प्रचि. दर्‍याईमाता ठिकाण खुप निसर्गरम्य दिसते जोरदार कट्टा ! पाभे, बेटे मौज कर दी | मिपा बॅनर बघून सेंटीमेंटल व्ह्यायला झालं !

💖

एक बेंचमार्क सेट केलात की आपण !
(तिनही महिला शिक्षिका असून सर्व जणी मराठी विषयच शिकवितात हा दुर्मीळ योगायोग आहे.)
मिपाकर लेखकांना काही मार्गदर्शन मिळू शकते का ?
  • Log in or register to post comments

झाडावर एक अळी आणि माकड ठेवले आहे.

कंजूस
Tue, 10/05/2021 - 05:23 नवीन
ते फार आवडले. शिवाय बंदिस्त जागेतला कट्टा नाही.
  • Log in or register to post comments

सहीच पाभे, जोरदार कट्टा

प्रचेतस
Tue, 10/05/2021 - 07:00 नवीन
सहीच पाभे, जोरदार कट्टा झालेला दिसतोय. फ्लेक्स लै भारी.
  • Log in or register to post comments

छान!

Bhakti
Tue, 10/05/2021 - 07:16 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

खूप छान कट्टा झाला आहे. सर्व

सुरसंगम
Tue, 10/05/2021 - 07:50 नवीन
खूप छान कट्टा झाला आहे. सर्व छा. चि. खूप छान आली आहेत.
  • Log in or register to post comments

वा

गुल्लू दादा
Tue, 10/05/2021 - 08:50 नवीन
खूप सुंदर. वृत्तांत येऊ द्या लवकर.
  • Log in or register to post comments

खूप दिवसांनी कट्ट्याचा धागा

सौंदाळा
Tue, 10/05/2021 - 10:55 नवीन
खूप दिवसांनी कट्ट्याचा धागा आला आणि कट्टादेखील जोरदार झालेला दिसतोय. फोटो मस्तच. सविस्तर वृत्तांताची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ -

पाषाणभेद
Mon, 10/11/2021 - 23:36 नवीन
मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ - वृत्तांतलेखन बर्‍याच दिवसांच्या प्रतिक्षेत असणारा "मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१" त्याच दिवशी म्हणजे दिनांक ०३/१०/२०२१ रोजी नाशिक येथे "पेरूची वाडी" या हॉटेलात साजरा झाला त्याचा हा वृतांत. या भेटीचे फोटो आधीच प्रसिद्ध झाले असल्याने ते पुन्हा येथे डकवत नाही. मिपाकर वरचेवर कट्टाभेट म्हणजेच गाठभेट किंवा गेट टुगेदर करतात. नाशकात आजपर्यंत जाहीर मिपाकट्टा कधी झाला नाही. या आधी आम्ही नाशिककर वरचेवर भेटत असतोच. या कोरोनाकाळात त्याला अल्प विश्रांती भेटली होती. त्यावर उतारा म्हणून मिपाकट्टा नाशिक येथेच करण्याचे आम्ही नाशिककरांनी ठरवले होते. बाहेरगावातून येणार्‍या पाहूण्यांची सरबराई करण्याची, त्यांची ठेप, व्यवस्था राखण्याची जय्यत तयारी आम्ही नाशिककरांनी केली होती. पण या कट्याला बाहेरगावचे कुणीही पाहूणे आले नाहीत हे सत्य आहे. आमचा त्यांचेवर राग असणार आहेच. असो. तर कट्याचे नियोजन कसे करायचे यासाठी नाशिक तसेच इतर ठिकाणच्या मिपाकरांशी संपर्क साधला. त्यात कट्याचा दिवस व ठिकाणावरून बरीच खलबते झाली. अनेक जणांनी यंदाचा कट्टा मुंपुठाच्या (मुंबई, पुणे, ठाणे) आसपासच घ्यावा असा आग्रह धरला होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे नाशिकला जाहीर कट्याचे प्रायोजकत्व कधीही मिळाले नसल्याने आमचा आग्रह ह्या कट्यासाठी नाशिक शहराला होता. एकदाचे नाशिक ठिकाण जाहीर करून या प्रश्नावर तोडगा काढला गेला. तसेच या भेटीत मिपाकर त्यांचे कुटूंबीय सदस्य देखील आणू शकतात हा ठराव मान्य करण्यात आला. आपले कुटूंबीय जर अशा कट्टा भेटीत सामील केल्याचा आनंद वेगळाच असतो. एकदाचे ठिकाण ठरल्यानंतर आता भेटीसाठी हॉटेल शोधणे आले. नाशकात अनेक हॉटेल्समध्ये मिसळ मिळते. नाशकात एक खडा मारला की तो खडा दहा मिसळवाल्यांना लागतो (असे मीच म्हणतो.) मुंबई तसेच पुण्याच्या रस्त्याच्या हॉटेल्सला वगळण्यात आले. कारण असे की, तेथे शांततेने मिसळीचा आनंद घेता आला नसता. नाशकातल्या उत्तरेकडील बाहेरच्या भागात मखमलाबाद गावाच्या रस्त्यावर निसर्गरम्य वातावरण आहे. हे गाव नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत येते तरीदेखील गावाने गावपण अजून जपले आहे. (येथेच अभ्या अन लतीकेची मराठी मालीका 'सुंदरा मनामध्ये भरली' याचे चित्रीकरण होत आहे.) तेथील गंगापूर गाव व धरणाकडे जाणार्‍या रस्त्याला अनेक हॉटेल्स आहेत. तेथले एक 'पेरूची वाडी' या नावाचे हॉटेल ठरवले. आदल्या दिवशी तेथे फोन करून आमचे टेबल बूक करण्यात आले. त्या आधी मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ अशा अर्थाचे दोन बॅनर्स मिपाच्या लोगोसहीत छापून घेतले. बॅनर तयार करणारा मुलाशी (दुकान मालक) बॅनर तयार होत असतांना गप्पा मारत बसलो. त्याला असल्या कट्याचे अप्रूप वाटले. त्याने लावलेल्या रेट बोर्डावरील रेट पेक्षा ५०% कमी रक्कम तो आकारत होता. मी त्याला त्याचे कारण विचारले तर तो म्हणाला की, "तुम्ही एवढे चांगले काम करत आहात. मग तुमच्याकडून कमीच पैसे घेईन वगैरे." मी त्याला सगळे पैसे देऊ करूनही तो पैसे कमीच घेत होता. मग मात्र मी जास्तीचे १०० रूपये तेथल्या एका मुलाच्या हातात दिले. त्या दुकानदार मुलाला मी मिपावरील लेख वाचन करण्यास सांगितले. त्यानेही वेळ मिळाल्यास वाचेन असे आश्वासन दिले. बॅनरवर मिसळपाव.कॉम असे लिहील्याने मिसळपावच हॉटेलातला मेन्यू आपोआप ठरला गेला. सकाळी साडेनऊ वाजता हॉटेलात भेटण्याचे ठरले गेले. तशा अर्थाची झुम मिटींग आदल्या दिवशी झाली. मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ रोजी हजर असलेले मिपा सदस्य व त्यांच्या कुटूंबीयांची नावे येथे आधीच लिहीतो म्हणजे लिखाणाला/ वाचनाला संदर्भ लागेल. - मिपाआयडी- वकिलसाहेब असलेले श्री. संतोष भोई सर. - मिपाआयडी- हर्‍या असलेले श्री. शिरीष कुलकर्णी साहेब, सौ. कुलकर्णी मॅडम, चि. पार्थ. - मिपाआयडी पाषाणभेद असलेला सचिन बोरसे, सौ. अर्चना बोरसे, कु. स्वराली. - मिपाआयडी जानू असलेले श्री सर्वेष लोहार सर, सौ. लोहार मॅडम, कु. प्रज्ञा, चि. आरुष. Image removed. ( कट्टाभेटीचे हे केवळ प्रातिनिधीक छायाचित्र आहे. या आधीच कट्टा भेटीचे इतर छायाचित्रे प्रकाशीत केले आहेत. कृपया ते पहावेत.) तर मिपा कट्याच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक ०३/१०/२०२१ रोजी आपले वकील साहेब हॉटेलमध्ये सर्वात आधी म्हणजे नऊ वाजेच्या दरम्यान पोहोचले होते. मी देखील त्याच दरम्यान पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो पण नेमके आनंदवली पुढे चांदशीच्या रस्त्याचे काम चालू असल्याने मला पुन्हा माघारी यावे लागले व लांबचा रस्ता जवळ करावा लागला. त्यात वेळ गेला. अर्थात मी जास्त वेळ न जाता मी 9:40 च्या दरम्यान पोहोचलो. त्यानंतर कुलकर्णी साहेबांचा फोन आला. त्यानंतर ते घरून निघाले. ते जवळच राहत असल्याने व त्यांना चांदशीच्या नव्या होणार्‍या रस्त्याचा बायपास माहीत असल्याने ते लगोलग पोहोचले. हॉटेलमध्ये आल्यानंतर सगळ्यांची व एकमेकांच्या कुटूंबातील सदस्यांची ओळख पाळख झाली. पेरूची वाडी हॉटेल हे पेरूच्या बागेतच केले आहे. पेरूची झाडे पेरूच्या बहाराने लगडलेली होती. सर्वेष सर (जानू) व कुटूंबीय अजून पोहोचले नव्हते. त्यामुळे जमलेल्या मंडळींनी पेरूच्या बागेत फोटो काढले. कुणी झाडावर चढून तर कुणी झोक्यावर बसून मजा केली. तेथेच ताजे पेरू विक्रीला होते. मंडळींनी ते पेरू विकत घेतले. सर्वेष सर अजूनही हॉटेलात पोहोचले नव्हते. ते देखील चांदशीच्या नव्या रस्त्यात अडकले होते. मग कुलकर्णी साहेबांनी त्यांना फोनवरून मार्गदर्शन केले. तो पर्यंत मिसळीची ऑर्डर दिल्या गेली होती. मंडळी मिसळ पावाचा आस्वाद घेत होती. जरा वेळाने सर्वेष सर त्यांच्या कुटूंबासमवेत हॉटेलात पोहोचले. मग लगोलग त्यांच्या डीशची ऑर्डर दिल्या गेली. तेथेच ओळख होवून गप्पा सुरू झाल्या. महिला वर्ग गप्पात रंगला होता. मिसळीचा आस्वाद घेणे सुरू होते. तिनही महिला शाळेत मराठी विषय शिकवत आहेत हा एक योगायोग होता. त्यामुळे त्यांच्या गप्पांना निराळाच संदर्भ लाभला. मिसळ खाऊन झाल्यानंतर गुळाच्या जिलेबीच्या रिपीट ऑर्डरी दिल्या गेल्या. त्यानंतर तेथे पेरूच्या स्वादाचे आईस्क्रीम छान मिळते अशी बातमी कुलकर्णी सरांनी दिली. त्याचा आस्वाद घेण्यात आला. एकूणच आईस्क्रीम छान होते. आता हॉटेलमध्येही गर्दी वाढलेली होती. खाणे झाल्यानंतर पेरूच्या बागेत पुन्हा फोटो काढल्या गेले. या ठिकाणाहून जवळच आठ एक किमीवर डोंगरावर एक दर्‍या धबधबा आहे. तेथे जाण्याचे आमचे ठरले. वकीलसाहेबांना कामामुळे लगेच निघायचे असल्याने त्यांनी निरोप घेतला. कुलकर्णी दांपत्यानेही पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला. सर्वेष सर व माझे कुटूंब यांनी धबधब्याला भेट देण्याचे ठरवले. धबधब्याचे जवळचे गाव दरी आहे. रस्ता छान शेतातून जाणारा होता. पावसाने शेती बहरली होती. हिरवीगार शेती व वळणाचा डोंगरावर जाणारा रस्ता पाहून मन प्रसन्न होत होते. धबधब्याच्या बाजूलाच दर्‍या मातेचे डोंगरातल्या कपारीत मंदीर आहे. तेथे जाण्यासाठी पायर्‍या आहेत. मंदीरातून समोरची दरी, बाजूचा धबधबा समोरच्या धरणाच्या पाण्याचा विस्तार दिसत होता. सर्वेष सर मुलांना, महिलांना धबधब्याच्या टेकडीवर चढून गेले. वरती एक छोटासा बांध होता. मी धबधब्याच्या खाली असलेल्या छोट्या पुलाच्या खाली बसून विश्रांती घेतली. कु. प्रज्ञा, चि. आरूष व कु. स्वराली या मुलांनी धबधब्याच्या परिसराचा खरा आनंद घेतला. ते चारही जण भरपूर वेळ धबधब्याच्या काठावर, वरती टेकडीवर होते. त्यानंतर तेथून निघण्याची वेळ झाली. मखमलाबाद पर्यंत आमच्या गाड्या एकत्र धावल्या व नंतर आमचा मार्ग निराळा होवून आम्ही एकमेकांच्या कुटूंबाचा निरोप घेतला. अशा रितीने मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ साजरा झाला. या प्रतिसादाच्या आधीच कट्याच्या भेटीचे, हॉटेल तसेच धबधब्याचे, दर्‍या मातेच्या मंदीराजवळील फोटो टाकले असल्याने आपणास कोण कोण आले होते याची कल्पना आलीच असेल. कार्यबाहूल्यामुळे मिपाकट्याच्या वृतांता टाकण्यास खूपच उशीर झाला असल्याने क्षमस्व. (शुद्धलेखन तपासले नसल्याने लिखाणातल्या चूकांकडे दुर्लक्ष करावे.) नाशकात होणार्‍या आगामी कट्ट्यास तुम्हा सगळ्या मिपाकरांस आताच आमंत्रण देत आहे, हे सांगून मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ चे वृतांतलेखन येथेच थांबवतो. कळावे, तुमचाच, पाषाणभेद. ११/१०/२०२१
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा