२०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने राबवलेली जनधन योजन अपार यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. सुमारे ४३.०४ कोटी लाभार्थी आजवर या योजनेचे आहेत. या शिवाय रु. १४६,२३०.७१ कोटी ठेवींमध्ये आहेत. योजना सुरू झाल्यापासून योजनेंतर्गत खात्यांच्या संख्येत २.३ पट आणि या खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेमध्ये ५.७ पट वाढ झाली. सरकारी मदत गरिबां पर्यंत पोहोचण्यात ही योजना प्रमुख आधार बनली आहे.
विविध राज्यांमध्ये जाताना पुन्हा नोंदणीची गरज दूर करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन बीएच मालिका वाहन नोंदणी सुरू केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन नोंदणीची नवीन मालिका सादर केली आहे. ही नोंदणी संपूर्ण देशात वैध असेल. नवीन मालिका BH (भारत मालिका) अशी आहे. वाहन मालकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना त्यांच्या वाहनांची नोंदणी बदलावी लागणार नाही. ज्यांना नोकरीच्या बदल्यांमुळे विविध राज्यांमध्ये स्थलांतरित होणे आवश्यक आहे अशा लोकांना याचा फायदा मिळेल.
सध्या, बीएच सीरीज अंतर्गत ही वाहन नोंदणी सुविधा संरक्षण कर्मचारी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र आणि राज्य पीएसयूचे कर्मचारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि संघटनांना स्वैच्छिक आधारावर उपलब्ध असेल.
संपूर्ण देशात एकच रजिस्ट्रेशन, तेही सेंट्रल एजन्सी द्वारे करण्याची गरज आहे. देशात कुठेही वाहन घेतलं की परत परत त्याचं रजिस्ट्रेशन करायला लागता कामा नये. रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस नावाची संस्था मोडीत काढून सेंट्रल ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी तयार करावी.
“२६/११ RSS की साजीश“. हे पुस्तक प्रकाशीत करनारे कोंग्रेस मध्ये हयात घालवलेले कृपाशंकर भाजपचे ऊपाध्यक्ष.
शिवसेना, कोंग्रेस मध्ये हयात घालवलेले सावरकरांचा अपमान करनार्या नितेश राणेंचे वडील नारायण राणे केंद्रीय मंत्री.
आणी हे लोक स्वतला हिंदूत्ववादी म्हणवतात.
भाजपात हयात घालवलेले खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे घरी बसलेत. भाजपात निष्टेला फळ मिळतं हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
जेव्हा भाजपला सत्ता नव्हता तेवेहा खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे विरोधात बसून लढले. सत्ता येऊन “अच्छे दिन” आले तर कृपाशंकर नी राणे मजा मारताहेत. कार्यकर्त्याना वार्यावर सोडून फक्त सत्तेसाठा कुठलीही तडजोड करनार्या कणाहीन भाजपपेक्षा शिवसेना कधीही बरी.
खडसेंच्या मागे ईडी लागलीय. जो भाजप सोडेल त्याच्या मागे आम्ही ईडी लावू, तसेच विरोधी पक्षांच्या मागेही ईडी लावू. भाजप सोडून सर्व पक्षातील नेत्यांच्या मागे ईडी लावू. केंद्रीय संस्थांचा ईतका गैरवापर??? दानवेंच्या जावयाने दानवेंची संपत्ती १० हजार करोड आहे असा आरोप केला होता. पण ईडीला ते दिसनार नाही. काकण दानवे भाजपात आहेत. “नाॅटी” ईडी. :)
आणी लोकाना भाजप हा पक्ष भ्रष्ट नाही असं वाटतं.
अर्णब गोस्वामीच्या मागे लागणारे >>>>
अर्नब गोस्वानी म्हणजे काय संत महात्मा होता का?? त्याच्या नावाने चिठ्ठी लिहून एकाने आत्महत्या केली. कितीतरी लाख बूडवले त्याने एका मराठी माणसाचे. आता शांत बसलाय. :)
खांग्रेस ची सत्ता होती तेंव्हा सुद्धा त्यांनी वेगेवेगळ्या प्रकारे विरोधी पक्षांना त्रस्त केले.
आत भाजपनेही ते केले तर गैर काय ? ज्या लोकांच्या मागे ईडी लागली आहे त्यांनी गैर्व्यवहार केलेत हे ही तितकेच खरे आहे.
आपल्या माणसांना वाचवणे यातही काही गैर नाही.
खांग्रेस कुठल्याही मार्गाने सत्ता काबीज करत होती. आज भाजपही तेच करत आहे. मार्गही तेच अवलंबत आहे. आणी खांग्रेस प्रमाणेच आम्ही गांधीवादी /स्वच्छ असल्याचा आव आणत आहे. राजकारणात हे चालायचेच.
राजीव गांधी म्हणाले होते की ८५% सरकारी पैसा भ्रष्टाचारात जातो. आज हे प्रमाण बर्यापैकी कमी आहे हे ही नसे थोडके.
ज्या देशातील मतदार मेंढरांप्रमाणे मतदान करतात, दारुसाठी आपली मते विकतात त्या देशात फार अपेक्षा ठेवता येत नाही.
कंगना रानावत केस >>> तीचं अतिक्रमणातील घर कायदेशीर मार्गाने तोडलं. भाजपवाल्यांचा बेकायदेशीर कामाना पाठींबा असला तरी महाराषट्रात ते चालनार नाही.
अर्णब गोस्वामी केस >>> एका मराठी माणसाचे पैसे डूबवून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलेय त्याने. (सध्या कुठे असतो काय माहीत. चांगलाच धसका घेतलाय मुंबई पोलीसांचा) :)
नारायण राणे >>> आता ह्यापुढे काहीही बोलायच्या आधी चार वेळा विचार करतील :)
काय वेळ आलीय नाही भाजप समर्थकांवर ऐकेकाळी नशेत डूबलेली कंगना नी तीच्या अतिक्रमनाचं समर्थन करावं लागतंय. काय वेळ आणलाय भाजप समर्थकांवर पवार साहेब आणी ठाकरे साहेबानी. ख्या ख्या ख्या.
इतके नाचु नका हो. त्याची गरज नाहीये ..
फक्त "मुंबईतील बाकी अनधिक्रुत बांधकामावर" कधी कारवाई करणार ते सांगा. तुम्ही त्रिकालज्ञानी आहात तेव्हा ते माहीत असेल्च.
कुठले बांधकाम -- कुठली तारीख ... ते सांगा डीटेलवार ..
मग नाचा हवे तेव्हडे ...
नारायण राणे >>> आता ह्यापुढे काहीही बोलायच्या आधी चार वेळा विचार करतील :)
आता जेंव्हा नारयण राणे बोलतील्/कृती करतील तेंव्हा जबअरदस्त परिणाम होईल. ठाकरे पक्षाची सगळी ताकद मुंबई महापालिकेत आहे. ( जशी गोष्टीतील राक्षसाचा जीव पोपटात असायचा ). आता नारयण राणे मुंबै महापालिकेत प्रहार करतील. तेंव्हा ठाकरे पक्ष कसा सटपटतो ते पहायचंय.
आपण आंदोलन करुन लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले मात्र केंद्र सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत.जनताच कुंभकर्णासारखी झोपली असून मी एकटा काय करू ? जनतेने आवाज उठवून सरकार बदलन्याची ताकदउभी केली पाहिजे- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे.
मिपावर यांच्यावर स्वतंत्र धागा काढावा लागेल, थोर व्यक्तिमत्व.
-दिलीप बिरुटे
तुम्ही कोणत्या आंदोलनात भाग घेतला होता आणि त्यातून कोणते कायदे करुन घेतलेत याचे काही डिटेल्स द्याल का प्लीज?
तारीख वार सकट आणि कायद्याच्या नोटीफिकेशन्स सकट दिलेत तर उत्तम.
केंद्र सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर - म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने पाळत असेल तर ते चुकीचे असते का?
प्रा.डॉ. अचानक जागे झाले आहेत याचा अर्थ युनियन आणि त्यांचे बोलविते धनी कम्युनिस्ट पक्ष यांचा - आता कामाला लागा - असा आदेश आलेला दिसतो आहे.
मन की बाते : च्यायला, ज्या सरकारच्या धोरणांमुळे शिक्षण मिळाले, नोक-या मिळाल्या आयुष्य स्थिरास्थावर झालं त्या सरकारच्या ऋणात राहण्याऐवजी बाकी काहीही होवो, सद्य सरकारच्या पालख्या उचला असा आदेश संघम दक्षम कडून आलेला दिसतो...!
-दिलीप बिरुटे
हा सफेद विनोद म्हणायचा की ब्ल्याक ह्युमर ?
अण्णा हजारे एक स्प्रिंग्बोर्ड आहेत. त्यावर पाय देउन उसळी मारुन आपल्याला पाहिजे तिथे जाता येतं !
किती नावं सांगु?
जनतेने आवाज उठवून सरकार बदलन्याची ताकदउभी केली पाहिजे
महान विचार म्हंटले पाहिजेत कारणं अजूनही त्यांचे आंदोलने नुसती सरकार बदलायला वापरली जातात हे दुर्लक्षित होतेय...
आंदोलन सरकारला बदलायला न्हवे बेजबाबदारपणा सोडायला करायला हवीत.
>> कारणं अजूनही त्यांचे आंदोलने नुसती सरकार बदलायला वापरली जातात.
कॉंग्रेसरकारविरुद्ध दिल्लीत केलेल्या एका मोठ्या आंदोलनामुळे भाजपा सरकारला फायदा झाला, त्या आंदोलनाने देशभर काँग्रेसरविरुद्ध जनतेमधे एक जनमत निर्माण करायला एक वातावरण मदत झाली होती. बाकी, आता अण्णांनी सद्य सरकारविरुद्ध कितीही शंखानाद केला तरी अण्णांनी काही ना काही कारणांमुळे (सेटींग) माघार घेतली. जसे की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नेमून त्यामार्फत सहा महिन्यांत निर्णय घ्यावा म्हणून जानेवारीत २०२१ आंदोलनाची हाक दिली होती. केंद्रसरकारने त्यांच्या मागण्यावर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते, त्याबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच लोकपाल, लोकायुक्त आणि निवडणूक सुधारणा या मागण्यांवरही त्यांना केंद्रसरकारने आश्वासने दिली होती आणि त्यांच्या आंदोलनाची हवा काढून घेतली. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता त्यातूनही ते हलकेच बाहेर पडले. आता अण्णा एकटे पडले आहेत. आंदोलन करायला सर्वाअर्थाने बळ कमी पडत आहे. कार्यकर्ते, पक्षीय समर्थन, नियोजन आणि घेतली जाणारी दखल याहीबाबतीत अण्णा मागे पडले आहेत. म्हणून अण्णा म्हणतात मी एकटा काय करु. जनतेने पुढे यावे.
अण्णांच्या विविध जनआंदोलनाचा सरकारवर जेव्हा प्रभाव पडत होता तेव्हा तेव्हा आंदोलनाच्या माध्यमातून विविध कायदे मंजूर करुन घेतले. माहितीचा अधिकार आंदोलनामुळे माहिती अधिकार कायदा लागू झाला. २००५, भारतीय संसदेतही हा कायदा पुढे अस्तिवात आला. लोकपाल विधेयक आंदोलन तर देशभर गाजले. अण्णांच्या आंदोलनाचा प्रभाव होता, आता तो प्रभाव उरला नाही.
>>> आंदोलन सरकारला बदलायला न्हवे बेजबाबदारपणा सोडायला करायला हवीत.
आपापली प्रत्येकाची मतं असतात, पटायला पाहिजेत असे काही नाही. परंतु जनतेची जवाबदारी केवळ मतदान करुन संपत नाही. तर, सरकारवर जनतेचा विविध आंदोलनाच्या माध्यमातून एक जनरेटा असला पाहिजेत, नाही तर निगरगट्ट सरकार केवळ बहुमत आहे, म्हणून वाट्टेल तसा कारभार करते हे अण्णांचे मत पटायला लागते. सरकारच्या बेजवाबदार विरोधात विरोधी पक्षांनी संसदेतले कामकाज बंद पाडले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही, असे दिसते. सरकारच्या बेजवाबदार वर्तनाबद्दल जनतेमधे तीव्र भावना असतात. सरकार बदलायला केवळ मतदानावर अवलंबून न राहता सरकारने जनतेच्या भावनेचा विचार केला पाहिजे, यासाठी लक्ष वेधून घेतले पाहिजे. सद्य महागाईकडे जसे सरकार दुर्लक्ष करुन अगा काहीच घडलेच नाही असे दाखवत आहे. अशावेळी सरकारच्या बेजवाबदारपणाबद्दल जाब विचारला पाहिएज.
जाता जाता : कालच एका कार्यक्रमात '' एकाधिकारवादी सरकारे सतत असत्यावर अवलंबून असतात असे भाष्य करीत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड म्हणाले की'' सरकारी संस्था मजबूत करण्यासाठी सरकारला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, सत्तेशी सत्य बोलण्याचे धाडस नागरिकांनी दाखवले पाहिजे. हे काम केवळ बुद्धीवंतांचेच नव्हे तर, महिला, दलित, वंचित यांनीही सत्तेला जाब विचारले पाहिजे.
-दिलीप बिरुटे
अण्णांच वय अत्ता ८४ आहे, ह्या वयात अण्णां कडून आंदोलनाची अपेक्षा करणं चुकीचं वाटतंय. सध्या ते आंदोलन करत नाहीत ह्याचा अर्थ त्यांनी सरकार बरोबर सेटींग केली आहे हा निष्कर्ष पण योग्य वाटत नाही.
केंद्रसरकार जर खरोखरच चुकीचं वागत असेल तर जनता आज ना उद्या जागी होईलच, कदाचित मोठी आंदोलन होणार नाहीत परंतु मतदानाद्वारे व्यक्त होईल. इंडिया टुडे च्या सर्वेक्षणात मोदींची लोकप्रियता पहिल्यांदाच बऱ्यापैकी कमी झालेली दिसत आहे. करोना च्या दुसऱ्या लाटेची हाताळणी, वाढलेले पेट्रोल चे भाव ह्या मुळे लोक नाराज आहेत, पण जर २०२४ ला परत मोदी सरकारच जिंकले तर मात्र EVM, जाहिरतबाजी मुळेच जिंकलं ह्याला काहीही अर्थ नाही.
सद्य सरकार काही अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलेलं नाही. महागाई, बेकारी, रोजगार आणि इतर प्रश्नांच्या संदर्भात आणि गेल्या पंधरावर्षात भाजपा सरकारांनी काय केले हे समजायला भारतीय जनतेला अजून काही वेळ लागू शकेल. कधी तरी हे सरकार अल्पमतात येऊ शकते, इतर पक्षांच्या कुबड्या लागू शकतात ही भारतीय लोकशाही राजकारणाची जगरहाटी आहे, इव्हीएम वगैरे या सर्व बोलायच्या गोश्टी आहेत. जनता हेच सर्वात मोठं इव्हीएम आहे. आत्ता तर कुठे लोकांनी सरकारविरुद्ध बोलायला हळुहळु सुरुवात केली आहे. पंडित नेहरुंनी काय केलं आणि काँग्रेस आणि इतर पक्षांनी काय केलं हे सांगून त्यांच्यावर टीका करुन फार काळ पोट भरणार नाही. कधी तरी आपल्या कामावरही बोलावे लागेल.
व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांचं व्यंगचित्र बोलकं आहे.
-दिलीप बिरुटे
इंडिया टुडे च्या सर्वेक्षणात मोदींची लोकप्रियता पहिल्यांदाच बऱ्यापैकी कमी झालेली दिसत आहे. ....................हा हा हा.हा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हा...
हे लोक विश्वासार्ह कधीपासून झाले ? इतके की त्यांचे मत कोट केले जाते ?
जर असं झालं तर भाजप ने शेण खाल्लं असं नि:संदिग्धपणे म्हणता येइल.
राणे आणि कृपाशंकर ला पक्षात घेणं हा निर्णय सुद्धा मूर्खपणाचा होता हे मा वै म.
आणि तरीही अन्य राजकीय पक्ष भाजप पेक्षा घाणेरडे असल्यालाने मत नाइलाजाने भाजप लाच
बरेचसे भाजप समर्थक त्या निर्णयाचा विरोध करतील, अगदी शिव्या घालतील हे इथे मिपावरही बघायला मिळेल.
गोरगरीबांच्या आणि समतेच्या नावावर लाखो लोकांना ठार मारून, देशोधडीला लावूनही परत 'ती आमची मुळातील आयडियोलॉजी नाहीच' असे म्हणणाऱ्या लोकांमध्ये असतो तो कोडगेपणा आमच्याकडे नाही. जे चूक असेल त्याला आम्ही चूकच म्हणतो.
भाजप समर्थक कोण असतील ते उत्तर देतीलच. पण वैतकटिकदृष्ट्या विचाराल तर कुठल्याही पक्षाचा समर्थक एका विशिष्ट मर्यादेअलिकडे मत सहसा बदलत नाही. पेट्रोल चे भाव प्रचंड वाढले, कुणी कुठला पक्ष जॉईन केला, कोण कुणाला काय म्हणाले, कोण कुणावर कसल्या केसेस दाखल केल्या आणि कोण कुणाशी कसली युती केली यावर ते ठरत नाही. माझ्या मते मतदारांची बांधिलकी पक्षाशी नसतेच मुळी. ती विचारांशी असते आणि त्या विचारानुसार कोणता पक्ष चालतो किंवा त्या विचारांशी सलगी दाखवतो यावर ते अवलंबून असते. शिवाय काही पूर्वसमजुती ही असतात. उदाहरणार्थ,
1. भाजप हा पूर्वी ब्राम्हण आणि शेटजींचा पक्ष म्हणून प्रसिद्ध होता. त्यांचे पाठबळ RSS कडून यायचे. ही समजूत अजूनही आहे आणि म्हणून आंबेडकरी जनतेचा या पक्षावर राग आहे. रामदास आठवले या पक्षाशी निगडित आहेत म्हणून फारसं काही बदलत नाही.
2. राष्ट्रवादी मराठा पक्षाशी संबंधित आहे. भुजबळ आणि तत्सम ओबीसी नेते असले तरी तो मराठ्यांचा म्हणून च ओळखला जातो.
अशा पूर्वसमजुती मुळे ब्राम्हण सर्वसाधारणपणे भाजप लाच मतदान करतात आणि जोपर्यंत भाजप मुसलमानांचे लांगुलचालन करत नाही तोपर्यंत ते मत फारसे बदलत नाही.
शिवसेनेने घोडचूक अशासाठी केली की त्यांनी पालघरचे साधू, "जनाब" बालासाहब ठाकरे अशा गोष्टींमधून आपल्या इमेज च्या 180 अंशामध्ये आपल्या प्रतिमेत बदल केला. शिवाय राष्ट्रवादी बद्दल भाजप मतदारांमध्ये राग असला तरी तो काँग्रेसवरच्या रागाइतका मोठा नाही. भ्रष्टाचार आणि मुस्लिम लांगुलचालन या मध्ये निदान भाजप चे कार्यकर्ते भ्रष्टाचार निवडतील असे वाटते. प्रत्येक छोट्या गोष्टींनी मतदार राजाचे मत फारसे बदलत नाही. कृपाशंकर सिंग असेल ही भ्रष्टाचारी, पण तो मतदारांसाठी कितपत मोठा मुद्दा ठरेल ते शंकास्पद आहे. माझ्या मते शिवसेनेच्या भाजप मतदारांना शिवसेनेबद्दल किती राग आहे आणि भाजपच्या शिवसेना मतदारांना भाजप बद्दल किती राग आहे यावर हे सगळं ठरेल.
पटला.
बरे ते सारे राहूंद्यात.
कॉमी, आपण अनेक दिवस येथे दिसत नव्हतात, आता गेल्या आठवड्यांत ऑपेर्याचा धागा काढलात तेव्हा जरा बरे वाटले. आपल्या प्रोफाईलमधे आपण केरळांत रहाता असे लिहीली आहे, तेव्हा जरा धाकधूक वाटत होती.
तर, केरळ्मधे अजून कोव्हिडचे जोरदार थैमान का सुरू आहे, ह्याविषयी काही माहिती? आणि त्या जगप्रसिद्ध केरळ- कोव्हिड 'मॉडेल' चे काय झाले, त्याविषयीही तुमची माहिती, शक्य झाल्यास द्यावी.
व काळजी घ्यावी.
धन्यवाद.
नाही हो, मी काय केरळात राहत नाही. याआधी पत्ता बेगुसराई असा दिला होता :)
बरेच दिवस बातम्या वाचणे वैगेरे पूर्ण बंद आहे, केरळ बद्दल पण. तरी एकदा बघतो.
वाट बघाच !. २०२२ मधे कोणी दुसरीच व्यक्ती राष्ट्रपती होईल. साहेब परत पुढच्या निवडणुकीची वाट बघत राहतील.
सध्या त्यांना मधाचं बोट दाखवलं जातंय . काम झाल्यावर तोंडघशी पाडलं जाइल.
अनिल देशमुखांना वाचवण्यासाठी सरळ सत्ता पालट होईल ही शक्यता नाही वाटत. काहीतरी "घेऊन" "सेटलमेंट" केली असावी.
सत्ते साठी तसही पवार साहेब नाहीतर ठाकरे साहेबांचे पाय भाजपला धरावेच लागणार आहेत. पाहू कुणाचे धरतात :)
मोदींनी आपले गुरू पवार साहेबाना पुढील राष्ट्रपती बनवावे. आपल्याला बोट धरून राजकारणात आणनार्या पवार साहेबांचे कर्ज फेडण्याची संधी आहे मोदींना. पवार साहेबांच्या बुध्दीमत्तेचा फायदा देशाला करून घेता येईळ तयेच मोदी आपल्या गुरूंबद्दल किती संवोदनशील आहे हा संदेश देखील जनतेत जाईल.
आता अनिल परबांना ईडीने नोटीस पाठविली आहे. ईडीने आतापर्यंत पाठविलेल्या सर्व ५ नोटिसा अनिल देशमुखांनी नातवंडांची शी पुसायला वापरून कमोडमध्ये फ्लश करून टाकल्या आहेत. अनिल परब सुद्धा काही वेगळे करण्याची शक्यता नाही. ईडीच्या नोटीसला साधे चिलट सुद्धा घाबरत नाही कारण ईडीची नोटीस फक्त राजकारण करण्यासाठीच असते हे तान्हे बाळ सुद्धा सांंगेल. त्यामुळे हा मूर्खपणा आता ईडीने थांबवावा कारण यातून त्यांचंच हसं होतंय.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ed-issued-notice-t…
कोंग्रेस सीबीआय चा गैर वापर करायची अशी बोंब मारनारे भाजप समर्थक आता ईडी च्या गैरवापरा बद्दल चूप का???
भाजप पक्ष आणी कार्यकर्त्यांचा दुटप्पी पणा असे मुद्दे आले का सिध्द होतो.
गैरवापर शब्द कमी पडावा इतका वापर भाजप इडी चा करतेय. खालच्या दर्जाचे राजकारण हे भाजपलाच शोभते. आणी प्रचार पार्टी विथ दिफ्रान्स चा. अर्थात शीर्ष स्थानापासूनच खोटे बोलणे नी मोठमोठ्या थापा मारणे सुरु आहे तर त्या खालचे तरी काय करणार.
अनिल देशमुखांना सीबीआयने क्लिन चीट दिलेली नाही असे आता स्पष्ट होत आहे. या निमित्ताने एक गोष्ट लिहाविशी वाटते.
सीबीआयने अनिल देशमुखांना क्लिन चीट दिली म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादीचे काहीतरी शिजत आहे या कल्पना करून भाजप समर्थकांनी आपल्या पक्षाला शिव्या घालूनही झाल्या. पण दुसरीकडे बघितले तर काय चित्र दिसते?
नेहरूंनी चीनच्या प्रश्नामध्ये घोळ घालून ठेवला होता, स्वप्नाळू परराष्ट्रधोरण अवलंबले होते आणि भारताचे कधी भरून न येणारे नुकसान केले होते हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? आता 'इन्स्टिट्यूशन्स'च्या पावित्र्याच्या गमज्या मारणारे काँग्रेस समर्थक इंदिरा गांधींनी संसद, न्यायालये, रिझर्व्ह बँक वगैरे प्रत्येक इन्स्टिट्यूशनच्या पावित्र्याची पायमल्ली केली होती हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? देशात आणीबाणी लादून या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सच्या माहेरघराला इंदिरा गांधींनी आग लावली होती, भ्रष्टाचाराची गटारगंगा घरोघरी पोहोचवून भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनवला होता, सत्ताधारी माजणे म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण १९७० च्या दशकातला काँग्रेस पक्ष होता- ते करून दाखवले इंदिरा गांधींनी हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? उठल्यासुटल्या राष्ट्रीयीकरण करून स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला अॅनेमिक बनवायचे काम इंदिरा गांधींनी केले होते हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? १९७१ च्या युध्दात आपल्या सैन्याने केलेल्या पराक्रमावर सिमला करार करून इंदिरा गांधींनी पाणी फेरले होते हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? पंजाबमध्ये जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा भस्मासूर इंदिरा गांधींच्या आशिर्वादातूनच उभा राहिला होता आणि त्यातून नंतर पंजाब दशकभर जळत होता आणि हजारो लोक विनाकारण मारले गेले होते हे काँग्रेस समर्थक मान्य करतात?राजीव गांधींची श्रीलंका तसेच शाहबानो आणि अयोध्या प्रश्नात भूमिका संशयास्पद होती हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? मनमोहनसिंगांच्या काळात पंतप्रधान या अत्यंत महत्वाच्या 'इन्स्टिट्यूशन'चे पोतेरे झाले होते हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? स्वतःच्या मतांची झोळी भरायला काँग्रेसच्या राज्यात हिंदू दहशतवादाचे थोतांड उभे केले होते आणि सगळा हिंदू समाज दहशतवादी आहे असे चित्र उभे करायचा अश्लाघ्य प्रयत्न केला गेला होता हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? कम्युनिझम या तथाकथित विचारांतून जगात लाखो-करोडो लोकांची हत्या झाली हे कम्युनिस्ट समर्थक मान्य करतात की दरवेळेस 'it was not real communism' चे पालूपद चालू ठेवतात? भारतातही जास्तीतजास्त राजकीय हिंसाचार घडवायचे पाप हे कम्युनिस्टांचेच आहे हे कम्युनिस्ट समर्थक मान्य करतात? दिल्लीत दिवसाला २० हजार+ कोरोना केसेस येत असताना आपण कोरोनाला कसे हरवले याच्या गमजा केजरीवाल करदात्यांच्या खिशाला कात्री लावून वेगवेगळ्या चॅनेल्सवर जाहिराती दाखवून मारत होते हे अयोग्य होते हे आपसमर्थक मान्य करतात? उगीचच कोणावरही पुराव्याशिवाय बेताल आरोप करणे ही मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतील एक जबाबदारी नाही हे जगजाहीर असतानाही तसे आरोप करायचे आणि मग इतरांनी बदनामीचे खटले ठोकल्यावर राम जेठमलानींसारखा कोर्टातील एकेका हिअरींगसाठी २०-२२ लाख घेणारा महागडा वकील करायचा आणि त्याचे बिल दिल्ली सरकारला म्हणजे करदात्यांना लावायचे हे करणे अयोग्य होते हे आपसमर्थक मान्य करतात? कोरोनाच्या भयंकर अशा दुसर्या लाटेत गरजेपेक्षा तिप्पट-चौपट ऑक्सिजन मागून घेऊन मग इतर राज्यांना ऑक्सिजन कमी पडला आणि ऑक्सिजनच्या अभावी तिथे लोक मरण पावले की आपोआप त्याचा द्वेष मोदीसरकारवर येईल असला घाणेरडा प्रकार केजरीवालांनी केला तो अश्लाघ्य होता हे केजरीवाल समर्थक मान्य करतात? तथाकथित शेतकरी आंदोलनाच्या नावावर दिल्लीत २६ जानेवारीला झालेला धुडगूस किळसवाणा होता हे सगळे जमात-ए-पुरोगामी मान्य करतात?
हे सगळे झाले भारतात. जगातही काही वेगळी गोष्ट नाही. एकीकडे शांततेचे नोबेल घेऊन फुकाचे शांततेचे ढोल बडविणार्या ओबामांनी सिरीयात अल कायदाविरोधात मदत करून आयसिस हा नवा भस्मासूर उभा केला हे लिब्बू लोक मान्य करतात? आता तर बायडन महाशयांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. आता त्याच आयसिसविरोधात परत तालिबानशी सहकार्य करायची भाषा सुरू झाली आहे ती अयोग्य आहे हे लिब्बू लोक मान्य करतात?
म्हणजे दुसरीकडे काय चित्र आहे तर आपण ज्याचे झेंडे मिरवतो त्याने कितीही मोठी चूक केली तरी हे लोक त्याविरोधात काहीही म्हणजे काहीही बोलत नाहीत तर उलट आपले झेंडे मिरवणे चालूच ठेवत असतात. त्याउलट महाराष्ट्रात राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांच्याबरोबर भाजप हातमिळवणी करणार या कल्पनेनेही आम्हाला वरखाली व्हायला लागते आणि आम्हीच आमच्या पक्षाला शिव्या घालायला लागतो. नोटबंदीच्या निर्णयामागे नक्की काय कारण होते याची कल्पना नाही पण तो निर्णय चुकीचा होता किंवा निर्णय बरोबर असला तरी अंमलबजावणी फसली हे बोलणारे किती भाजप समर्थक दाखवू? आणि तरीही दुसरीकडचे लाचार गुलाम लोक आम्हाला मात्र भक्त म्हणत असतात.तसेच ती गोष्ट झाली ही कल्पना करून त्या (याक्षणी) काल्पनिक असलेल्या गोष्टीवर आमची प्रतिक्रिया काय असेल हे विचारायचा शाहजोगपणा बाळगणारे लोक त्यांच्या बाजूकडून इतक्या गोष्टी प्रत्यक्षात (काल्पनिक नाही) झाल्या तरी त्याविरोधात हु की चू करत नाहीत.
तेव्हा एक गोष्ट ठरवली आहे. भाजपने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायचा निर्णय घेतला तर त्याचे समर्थन नक्कीच नाही. जी गोष्ट आपल्याला मान्य नाही त्याचे समर्थन करण्यासाठी आपला आत्मा विकावा लागतो तो आम्ही विकलेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मत त्या परिस्थितीत देणार नाही. असा निर्णय घेतला तर राष्ट्रीय स्तरावरही भाजपवर दोन डाग नक्कीच पडतील. पण दोन डाग पडलेले आवडत नाहीत म्हणून दुसर्या बाजूवर शंभर डाग असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून भाजपला विरोध करू- हे होणे नाही. निदान माझ्याकडून तरी नाही.
पण दोन डाग पडलेले आवडत नाहीत म्हणून दुसर्या बाजूवर शंभर डाग असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून भाजपला विरोध करू- हे होणे नाही. निदान माझ्याकडून तरी नाही
सहमत..
आज बोंबा मारणारे .. आपल्या पुर्वजांनी काय पचका करुन ठेवला आहे याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करतात. महागाई च्या नावाने शिमगा ५० वर्षांपुर्वी पण होत होता आजही होतो आहे. पुढेही होत राहील. लोकांना आपले पगार वाढुन हवे असतात परंतु बाकी बाजारात किंमती कमीच असाव्या असा अट्टहास असतो.
बाकी दोन/तीन डाग असलेला शर्ट आनी असंख्य डाग असलेला शर्ट यापैकी कुठला घालायचा असेल तर मी पण २ /३ डाग वाला शर्ट घालीन. उगीचच नवीन फॅशन आहे म्हनून असंख्य डाग असलेला शर्ट घालुन मिरवनार नाही ...
तस्मात जोवर भारत एक खंबीर राष्ट्र म्हणुन वाटचाल करत राहील तोवर खंबीर असलेल्या नेत्यालाच माझे मत.
बाकी दोन/तीन डाग असलेला शर्ट आनी असंख्य डाग असलेला शर्ट यापैकी कुठला घालायचा असेल तर मी पण २ /३ डाग वाला शर्ट घालीन. उगीचच नवीन फॅशन आहे म्हनून असंख्य डाग असलेला शर्ट घालुन मिरवनार नाही ...
माझ्या दृष्टीने या शर्टावर फक्त २-३ डाग नसून बरेच जास्त डाग आहेत व रोज एक नवीन डाग पडतोय.
बाकी मी असंख्य डाग असलेला किंवा फक्त २-३ डाग असलेलाही शर्ट वापरणार नाही. मी एखादा डाग विरहीत शर्ट शोधेन व तसा मिळेपर्यंत वाट पाहीन.
अनेक आशिर्वाद.
आपण श्रीगुरुजी असलांत तरी, माझे वय व त्यानुसार उघड्या डोळ्याने भंवताल पाहून, तसेच वाचून, माहिती करून घेऊन, व हाडामासांच्या माणसांच्या जगांत राहिल्याने माझी ज्येष्ठता आहे, असे मी म्हणू शकतो. तर अशा ह्या वडिलकीच्या नात्याने हे लिहीत आहे.
आपणांस डाग विरहीत शर्ट शोधून मग तो अंगात घालावयाचा आहे, तर माझे अनुमान मला सांगते की भारतवर्षांत, निदान पुढील १००- १५० वर्षे तरी अशक्य आहे. कारण आपण चोखाळलेली लोकशाहीची व्यवस्था, ज्या युरोपमधे रूजली व बहरली, तिथेच तिला काही अशा तर्हेची प्रगल्भता येण्यासाठी दोन शतकेतरी लागली होती. अमेरिकेतही परिस्थिती फार वेगळी नाही. तेव्हा आपल्या देशाला तसे डाग- विरहित शर्ट्स मिळवण्यासाठी अजून १००- १२५ वर्षे तरी कमीतकमी जावी लागतील.
आणि तेही मधल्या काळांत, कुठल्यातरी पराकोटीच्या धर्मांध व्यवस्थेने ही लोकशाहीची चौकट उधळून टाकली नाही, तरच हे शक्य आहे. नाहीतर मधल्यामधे सगळेच शर्ट्सच नाहीशी होण्याची भीति आहेच.
तेव्हा
१. आपणांस उदंड - म्हणजे अजून निदान १२५ वर्षाचे- आयुष्य मिळो व
२. त्यानंतरही आपली लोकशाहीची चौकट अशीच अबाधित राहो.
मग आपला डागविरहीत शर्टाचा यूटोपिया आपणांस अंमलांत आणता येवो.
असे दोन आशिर्वाद मी आपणांस येथे देतो.
हरकत नाही. मी वाट पाहीन, पण कोणत्याही परिस्थितीत डागाळलेल्यांना मत देणार नाही. १०० डाग पडलेल्यापेक्षा २-३ डाग पडलेला कमी वाईट हा तर्क वरपांगी चपखल वाटत असला तरी जेव्हा २-३ डाग पडलेला १०० डाग पडलेल्यांना डोक्यावर घेऊन त्यांचा उदो उदो करतो, तेव्हा २-३ डाग पडलेल्यावरही लत्ताप्रहार करावा लागतो.
प्रदीपभौ,
जाऊ द्या हो.
काही जणांचा राग फडणवीसांवर आहे. खडसे हे स्वच्छ चारित्र्याचे असूनही केवळ फडणवीसांमुळे खडसे यांची गोची झाली अस कोणाला वाटत असेल तर आपण हरकत घेणारे कोण?
थोडक्यात, फडणवीस बदलले की भाजपाचा शर्ट एकदम स्वच्छ होईल असे काहीसे आहे. फक्त मोदी शहांना त्याच्या बरोबर उलटे वाटते त्याला कोण काय करणार?
यावर काळ हाच एकमेव उपाय आहे.
या काळात रागाच्या भरात जाणारा, छोट्याश्या मोहापाही आणखी वाहवत जाणार आहे. तर जो शांत डोक्याने काम करेल तो तरून जाणार आहे. मला वाटते सध्या २ वर्षे महाराष्ट्रात हेच चालू आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक (पुढे ढकलली न गेल्यास) झाल्यावरच सगळं चित्र स्पष्ट व्हायला लागेल तो पर्यंत .....
ॐ शांती ॐ
हा आपला भाबडा आशावाद आहे. आजवर १००% शुद्ध चारीत्राचा राजकारणी माझ्या तरी पाहण्यात नाही. उडदामाजी काळे गोरे असतातच. त्यामुळे सगळेच खराब असतील तर त्यातल्यात्यात कमी खराब असलाच नेता शोधावा लागेल ...
उडदामाजी काळे गोरे असतील. पण २-३ डाग असलेल्याने शर्टावर १०० डाग असलेल्यांंची टोळी जमा केली तर याचा शर्टही डागांनी भरून जाईल.
राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, मधुकर पिचड, नितेश राणे, पद्मसिंह पाटील, हर्षवर्धन पाटील, बबन पाचपुते, कृपाशंकर सिंह इ. जर मंत्रीमंडळात असतील तर फडणवीस मुख्यमंत्री असूनही ते मंत्रीमंडळ महाभ्रष्टाचारी असेल. हे मंंत्रीमंडळ भाजपचे की राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे असा संशय निर्माण होईल.
त्यामुळे अशा डागाळलेल्यांना गणंगांना डोक्यावर घेणाऱ्यांना 'इंद्राय स्वाहा । तक्षकाय स्वाहा ।' या नीतिने खाली आपटावे लागेल.
आज बोंबा मारणारे .. आपल्या पुर महागाई च्या नावाने शिमगा ५० वर्षांपुर्वी पण होत होता आजही होतो आहे. -------
२०१४ साली बहोत हुई महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार असा प्रचार करणाऱ्या भाजपेयींची अक्कल कुठे गेली होती. महागाई वाढणारच ही अक्कल तेव्हा भाजपेईना नव्हती का??
तस्मात जोवर भारत एक खंबीर राष्ट्र म्हणुन वाटचाल करत राहील तोवर खंबीर असलेल्या नेत्यालाच माझे मत~~~
एकेकाळी चीनला टक्केर देण्याची भाषा करणारे भाजपचे लोक आता आपली परिस्थिती अफगाण पेक्षा चांगली म्हणताहेत. नेमक राष्ट्र खंबीर असल्याची वाटचाल कुठे दिसतेय??
प्रतिक्रिया
जनधनचे यश ४३.०४ कोटी लाभार्थी व रु. १४६,२३०.७१ कोटी ठेवींमध्ये
विविध राज्यांमध्ये जाताना
संपूर्ण देशात एकच रजिस्ट्रेशन
In reply to विविध राज्यांमध्ये जाताना by निनाद
“२६/११ RSS की साजीश“. हे
अवघडच आहे..
In reply to “२६/११ RSS की साजीश“. हे by अमरेंद्र बाहुबली
खडसेंच्या मागे ईडी लागलीय. जो
अर्णब गोस्वामीच्या मागे
In reply to खडसेंच्या मागे ईडी लागलीय. जो by जॅक द रिपर
गैर काय ?
In reply to खडसेंच्या मागे ईडी लागलीय. जो by अमरेंद्र बाहुबली
फडणवीस कितीही वेळा ठाकरेना
सुप्रिम कोर्टात किती वेळा
In reply to फडणवीस कितीही वेळा ठाकरेना by अमरेंद्र बाहुबली
सतत फुटणारे थोबाड असलेले उद्दाम फाटर्रे सरकार
In reply to फडणवीस कितीही वेळा ठाकरेना by अमरेंद्र बाहुबली
कंगना रानावत केस >>> तीचं
In reply to सतत फुटणारे थोबाड असलेले उद्दाम फाटर्रे सरकार by जॅक द रिपर
हे वाचा .. https://www
In reply to कंगना रानावत केस >>> तीचं by अमरेंद्र बाहुबली
अजून बाकीच्या बांधकामावर
In reply to हे वाचा .. https://www by सुक्या
कधी करणार ते सांगा ..
In reply to अजून बाकीच्या बांधकामावर by अमरेंद्र बाहुबली
काय वेळ आलीय नाही भाजप
In reply to कधी करणार ते सांगा .. by सुक्या
तूम्ही अनावश्यक मनस्ताप करून घेताय
In reply to काय वेळ आलीय नाही भाजप by अमरेंद्र बाहुबली
इतके नाचु नका हो. त्याची गरज
In reply to काय वेळ आलीय नाही भाजप by अमरेंद्र बाहुबली
वरुन .. मुबैत अनधिक्रुत
In reply to अजून बाकीच्या बांधकामावर by अमरेंद्र बाहुबली
कहना कया चाहते हो भाई
In reply to अजून बाकीच्या बांधकामावर by अमरेंद्र बाहुबली
आता तयारीनिशी
In reply to कंगना रानावत केस >>> तीचं by अमरेंद्र बाहुबली
कुंभकर्णीय जनता ?
तुम्ही कोणत्या आंदोलनात भाग
In reply to कुंभकर्णीय जनता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खिक्क !!!
In reply to तुम्ही कोणत्या आंदोलनात भाग by जॅक द रिपर
त्यांचं नोटबंदी विरोधी आंदोलन
In reply to तुम्ही कोणत्या आंदोलनात भाग by जॅक द रिपर
बहुमत जनतेने दिले आहे
In reply to कुंभकर्णीय जनता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अच्छा असं व्हय.
In reply to बहुमत जनतेने दिले आहे by निनाद
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे : थोर व्यक्तिमत्व.
In reply to कुंभकर्णीय जनता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जनतेने आवाज उठवून सरकार
असहमत.
In reply to जनतेने आवाज उठवून सरकार by गॉडजिला
अण्णांच वय अत्ता ८४ आहे, ह्या
In reply to असहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अमरत्वाचा पट्टा
In reply to अण्णांच वय अत्ता ८४ आहे, ह्या by रात्रीचे चांदणे
गेल्या १५ वर्षात भाजपा सरकार
In reply to अमरत्वाचा पट्टा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंडिया टुडे च्या सर्वेक्षणात मोदींची लोकप्रियता ......
In reply to अण्णांच वय अत्ता ८४ आहे, ह्या by रात्रीचे चांदणे
राष्ट्रवादी व भाजप यांच्यातील
मग आता ?
In reply to राष्ट्रवादी व भाजप यांच्यातील by श्रीगुरुजी
किंवा गृहखात्या अंतर्गत
In reply to मग आता ? by कॉमी
ही बातमी खरी असेल तर आता काही
In reply to मग आता ? by कॉमी
धन्यवाद.
In reply to ही बातमी खरी असेल तर आता काही by श्रीगुरुजी
एक भाजप समर्थक म्हणून माझी प्रतिक्रिया
In reply to धन्यवाद. by कॉमी
जर असं झालं तर भाजप ने शेण
In reply to एक भाजप समर्थक म्हणून माझी प्रतिक्रिया by mayu4u
कोडगेपणा
In reply to धन्यवाद. by कॉमी
भाजप समर्थक कोण असतील ते
In reply to धन्यवाद. by कॉमी
चांगला प्रतिसाद
In reply to भाजप समर्थक कोण असतील ते by रावसाहेब चिंगभूतकर
धन्यवाद.
In reply to चांगला प्रतिसाद by प्रदीप
कदाचित पवार साहेब पुढील
In reply to ही बातमी खरी असेल तर आता काही by श्रीगुरुजी
शरदचंद्रजी पवार २०२२ मध्ये ते उपराष्ट्रपती पदावर विराजमान होतील.
In reply to ही बातमी खरी असेल तर आता काही by श्रीगुरुजी
अनिल देशमुखांना वाचवण्यासाठी
In reply to राष्ट्रवादी व भाजप यांच्यातील by श्रीगुरुजी
मोदींनी आपले गुरू पवार
*संजय राऊत यांचा करेक्ट
आता अनिल परबांना ईडीने नोटीस
+१
In reply to आता अनिल परबांना ईडीने नोटीस by श्रीगुरुजी
कोंग्रेस सीबीआय चा गैर वापर
In reply to आता अनिल परबांना ईडीने नोटीस by श्रीगुरुजी
गैरवापर हा शब्द तुम्हाला
In reply to कोंग्रेस सीबीआय चा गैर वापर by अमरेंद्र बाहुबली
गैरवापर शब्द कमी पडावा इतका
In reply to गैरवापर हा शब्द तुम्हाला by जॅक द रिपर
अहो हे राजकारणात चालायचंच !
In reply to गैरवापर शब्द कमी पडावा इतका by अमरेंद्र बाहुबली
क्लिन चीट
पण दोन डाग पडलेले आवडत नाहीत
In reply to क्लिन चीट by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to क्लिन चीट by चंद्रसूर्यकुमार
१००% सहमत
In reply to क्लिन चीट by चंद्रसूर्यकुमार
बाकी दोन/तीन डाग असलेला शर्ट
In reply to १००% सहमत by सुक्या
बाकी दोन/तीन डाग असलेला शर्ट आनी असंख्य डाग असलेला शर्ट यापैकी कुठला घालायचा असेल तर मी पण २ /३ डाग वाला शर्ट घालीन. उगीचच नवीन फॅशन आहे म्हनून असंख्य डाग असलेला शर्ट घालुन मिरवनार नाही ...माझ्या दृष्टीने या शर्टावर फक्त २-३ डाग नसून बरेच जास्त डाग आहेत व रोज एक नवीन डाग पडतोय. बाकी मी असंख्य डाग असलेला किंवा फक्त २-३ डाग असलेलाही शर्ट वापरणार नाही. मी एखादा डाग विरहीत शर्ट शोधेन व तसा मिळेपर्यंत वाट पाहीन.+१
In reply to बाकी दोन/तीन डाग असलेला शर्ट by श्रीगुरुजी
चि. श्रीगुरुजी यांस,
In reply to बाकी दोन/तीन डाग असलेला शर्ट by श्रीगुरुजी
केजरीवाल हे नाव ऐकलंय का??
In reply to चि. श्रीगुरुजी यांस, by प्रदीप
हरकत नाही. मी वाट पाहीन, पण
In reply to चि. श्रीगुरुजी यांस, by प्रदीप
प्रदीपभौ,
In reply to चि. श्रीगुरुजी यांस, by प्रदीप
हा आपला भाबडा आशावाद आहे.
In reply to बाकी दोन/तीन डाग असलेला शर्ट by श्रीगुरुजी
उडदामाजी काळे गोरे असतील. पण
In reply to हा आपला भाबडा आशावाद आहे. by सुक्या
बन्यान्वर
In reply to बाकी दोन/तीन डाग असलेला शर्ट by श्रीगुरुजी
आज बोंबा मारणारे .. आपल्या
In reply to १००% सहमत by सुक्या