सत्य

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
17 Aug 2021 - 10:23 am

एकदा सहा ऋषी जनकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन सत्याच्या शोधात हिमालयात पोहचले. एका हिमाच्छादित पर्वतावर त्यांनी कठोर तपस्या सुरु केली. सत्य त्यांच्या समोर प्रगट झाले. सर्वांनी सत्याला तपासले. आनंदाने सर्वांनी सत्याचे वर्णन करणे सुरु केले. प्रत्येकाने केलेल्या सत्याचे वर्णन वेगवेगळे होते. सर्व प्रज्ञांवंत होते. सर्व विचार करू लागले, आपल्यापैकी कुणीही असत्य बोलत नाही. सर्वच सत्यधर्म पाळणारे आहे. मग प्रत्येकाने सत्याचे वेगळे स्वरूप कसे काय अनुभवले. शेवटी त्यांच्यापैकी एका वृद्ध ऋषीने मौन सोडले, तो सर्वांना उद्देश्यून म्हणाला, बहुतेक प्रत्येकाचे सत्य वेगळे असते. सर्वांनी सत्याचे पालन करत पुढची वाटचाल करावी, हेच उचित. मी वृद्ध झालो आहे, आता आयुष्याचा शेवटचा काळ हिमालयात परमेश्वराचे स्मरण करत घालवावा हेच योग्य. तुम्ही सर्व पृथ्वीवर जाऊन सत्याचा प्रचार करा. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही अनुभवलेले सत्य दुसर्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा एकदिवस मानवाचे अस्तित्वच पृथ्वीवरून नाहीसे होईल.

वृद्ध ऋषीचा निरोप घेऊन बाकी सर्व मृत्यूलोकात परतले. त्यांनी सत्याचा प्रचार सुरु केला. त्यांचे लाखो शिष्य झाले. वृद्ध ऋषीने दिलेली चेतावणी ते विसरले. अहंकाराने ग्रस्त होऊन त्यांनी अनुभवलेले सत्य दुसर्यावर लादण्याचा प्रयत्न करू लागले. काळाचा प्रभावाने ते सर्व मरण पावले. त्यांच्या शिष्यांनी अधिक जोमाने त्यांच्या सत्याचा प्रचार करणे सुरु केले. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व युक्त्या ते वापरू लागले. दुसर्याने स्थापन केलेल्या मठ-मंदिरांना नष्ट करण्यात त्यांना आनंद येऊ लागला. अखेर त्यांनी अनुभवलेले सत्यच पृथ्वीवरील मानव जातीच्या विनाशाचे कारण बनेल असे वाटू लागले आहे. सत्याला पचविणे कठीण असते हेच सत्य.

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

17 Aug 2021 - 8:41 pm | गॉडजिला

ओशोनी ही बाब जास्त रंजकपणे सांगितली होती :)

सौन्दर्य's picture

17 Aug 2021 - 10:44 pm | सौन्दर्य

डोळ्यावर पट्टी बांधून हाताने चाचपडून हत्ती कसा असेल ह्याचा शोध घेण्याच्या चक्रधर स्वामींच्या गोष्टी सारखं हे सत्य आहे.

पट्टी बांधून चाचपडून सत्य हुडकणार्‍यांबाबत काहीच बोलण्यात अर्थ नाही. मला वाटत नाही ति कथा जी काही असेल ती सत्य हुडकायचा प्रभावी मार्ग दाखवत असेल उलटे सत्य काय नसते यावर ती कथा परिणामकारक भाष्य करत असेल.

विवेकपटाईत's picture

18 Aug 2021 - 9:32 am | विवेकपटाईत

आजच्या घटकेला माझाच मार्ग सत्य. मी दाखविलेल्या मार्गावर सर्वांना चालावे लागेल, अन्यथा..... यासाठी मी सत्य पचविणे कठीण हे लिहले आहे.

गॉडजिला's picture

18 Aug 2021 - 10:39 am | गॉडजिला

_/\_

काही लोकांना इतरांचे मार्ग डोळ्यात खुपतात त्याला आपण काहीच करु शकत नाही... अशावेळी कुत्री भुंकत असता हत्ति जस स्थितप्रज्ञ राहतो तीच वृत्ती आपल्या चित्ताची असली पाहीजे

सौन्दर्य's picture

19 Aug 2021 - 3:43 am | सौन्दर्य

आभार.