✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ग्रीष्मोत्सव साजरा!

B
Bhakti यांनी
Tue, 08/10/2021 - 10:15  ·  लेख
लेख
वसंतोत्सव नंतर ... वसंताने खो दिल्यावर ग्रीष्म चक्र उभे ठाकते.ग्रीष्म हा अवघडलेल्या अवस्थेसारखाच भासतो. शुष्कतेची जाणीव देणारा मधेच पावसाच्या सरी देऊन मोकळा होत जातो नाही का?ग्रीष्मातला उकाडा आता कडक जाणवत नाही, की वातानुकुलित यंत्राने तो हरवून गेला आहे.पण भव्य आकाशमंडपाखाली रुजू पाहणाऱ्या पालवीने आता हिरवाईचा बहरच धारण केलाय.पक्ष्यांची आता पिल्लांसाठी नवी घरटे बांधायची लगबग असते.वसंतात रुजलेला निसर्ग इवले इवले जीवांच पोषण पूर्ण होणार असते. हिरवी पाती 1 गुलमोहर-बहावा वसंतवैभव पण ग्रीष्मात अशा अनेक वैभवाने सृष्टी न्हाऊन जाते.गच्च गच्च हिरव्या पानात लिली,जाई –जुई,चाफा विविधरंगी फुलांच्या राशी बागेमध्ये ओसांडत असतात.तर लोणची ,गुळांबा ,साखरांबा पदार्थ तयार करून यांची वर्षभरासाठी साठवणूक होते.गुळांब्याच महत्व ‘डायटवाल्या दिवेकर बाईंनीही’ मानले आहे व त्याचा आग्रह धरला आहे. ज्येष्ठातल पुष्पवैभव स्त्रियांना पाहता याव म्हणुन ‘वटपौर्णिमा’ व्रत असावं.मान्सूनचे आगमन होताच हवेत गारवा भरला जातो.वाऱ्याचा तुफान वेग त्याच्याबरोबर पानाच्या सळसळीचा आवाज कानांत घुमतो. आषाढातले दिवस मेघांच दार अलगद उघडतात .सावळ्या मेघांची सैरभैर धावाधाव सुरु राहते .तासंतास समाधी लावून पहावे एव्हढे सुंदर आकाश या काळात दिसते.कालिदासाला देखील हे दूत भासले आणि मेघदूताची निर्मिती झाली. आषाढाच्या प्रथम दिनिं तया दिसे मेघ गिरिशिखरा आलिंगुनिया रम्य, जणों गज तटा धडकतां झुकला (अनुवाद : रा. प. सबनीस) सावळा मेघ 2 पाऊस भावना कवितेत,लेखात,भटकंतीत,एका छत्रीत दोघांना आणि प्रत्येक मनाला चिंब करीत राहतात.त्याबरोबर चहाचे घोट आणखिण काय हवं? तिथेच रानातल्या वनस्पती विज्ञान भाषेतील विड(weed) असलेल्या या वनस्पतींनी तर “खिलनेकी जिद पर अडी” करत अक्षरशःनिसर्गात तल्लीन होतात.सोनकी,तगर ,किरळ,टणटणी,वाघनख्या इत्यादी यांची फुले रानावनात फुललेली असतात.यातली काही औषधी असतात. वाघ नखी 9 रानफुल १ 3 रानफुल २ 8 एरवी काट्यांनी सजलेला बाभळीचाही बहरही निराळच आनंद देतो. मागे मी बाभळीच्या बहरावर चार ओळी लिहिल्या होत्या,तो पर्यंत बाभळीचा बहर मी मन लावून पाहिलाच नव्हता,यंदा मन भरून अनुभवला:) आणि बाभळ शोधता-अनुभवता बापट यांची ‘बाभूळझाड –एक सल’,इंदिरा संत यांची ‘बाभळी’ या कवितांचा आस्वाद मिळाला. यांनीही काट्यांमध्ये एक मनोहारी सोन बहर व्यक्त केलाय.. बाभुळमाय 6 विठ्ठल नाम घेत भक्तीरसात वारकरी दिंडीत अखंड मार्गक्रमण करीत राहतो.अलैकिक शक्तीने वातावरण भारावून जाते.आषाढी एकादशीला विठूच्या पायी माथा टेकवत उभा महाराष्ट्र भरभराटीच साकड त्याला घालतो.हेच शक्ती सामर्थ्य गुरुपौर्णिमाला पूर्णानंद देते. वरुणराजा बरसत बरसत थकत नाही.शेतातली पिक डोलत राहतात. आषाढी अमावस्येला दीप अमावस्येचा मान देत ग्रीष्म वर्षा ऋतूला प्रकाशाचे देणे देतो. -भक्ती
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
11427 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

वा !

हेमंतकुमार
Tue, 08/10/2021 - 10:23 नवीन
छान फोटो व वर्णन !
  • Log in or register to post comments

वारा वारा धारा धारा सांगतसे

गॉडजिला
Tue, 08/10/2021 - 15:07 नवीन
वारा वारा धारा धारा सांगतसे काही , तापलेल्या जीवा थोडी द्यावीशी तरारी...
  • Log in or register to post comments

मस्त झालाय लेख.

प्रचेतस
Tue, 08/10/2021 - 16:01 नवीन
मस्त झालाय लेख.
  • Log in or register to post comments

कुमार,गोजिरा,प्रचेतस धन्यवाद.

Bhakti
Tue, 08/10/2021 - 16:21 नवीन
कुमार,गोजिरा,प्रचेतस धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान लिहलंय !

मदनबाण
Tue, 08/10/2021 - 18:59 नवीन
छान लिहलंय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre
  • Log in or register to post comments

ललित वगैरे असणार

कंजूस
Tue, 08/10/2021 - 19:05 नवीन
या भीतीने लेख उघडला नव्हता सकाळपासून. पण दोनचार फोटो पाहिल्यावर हायसं वाटलं. छान.
  • Log in or register to post comments

हा हा !

Bhakti
Tue, 08/10/2021 - 19:43 नवीन
ललित लेख नाही पण मला मराठी निबंध वाटतोय!;) कंजूस काका, मदनबाण धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सेम तु सेम

बाबुराव
Wed, 08/11/2021 - 09:21 नवीन
दवनीय असेल म्हणुन लेख उघडला नव्हता. फोटो पाहुन आनंद जाहला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

काल्पनिक नसल्याने दवनीय नाही

Bhakti
Wed, 08/11/2021 - 10:13 नवीन
काल्पनिक नसल्याने दवनीय नाही :) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव

छान लेख

मित्रहो
Wed, 08/11/2021 - 12:11 नवीन
छान लेख आणि सुंदर फोटो
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

Bhakti
Wed, 08/11/2021 - 13:48 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

व्वा, सुंदर वर्णन आणि त्याला

चौथा कोनाडा
Wed, 08/11/2021 - 14:07 नवीन
व्वा, सुंदर वर्णन आणि त्याला साजेशे छान असे फोटो !
आषाढी अमावस्येला दीप अमावस्येचा मान देत ग्रीष्म वर्षा ऋतूला प्रकाशाचे देणे देतो.
+१ अगदी छान !
  • Log in or register to post comments

+१

Bhakti
Wed, 08/11/2021 - 16:43 नवीन
दिव्यांच्या फोटो द्यायचा विसरले होते...५ वर्षांपूर्वीचा आहे. चौको काका धन्यवाद. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

+१

चौथा कोनाडा
Tue, 08/17/2021 - 17:22 नवीन
+१ सुरेख !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 08/11/2021 - 17:52 नवीन
आवडला लेख आणि फोटोही सुरेखच लिहिले आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

धन्यवाद पैजारबुवा.

Bhakti
गुरुवार, 08/12/2021 - 09:03 नवीन
धन्यवाद पैजारबुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मस्त लेख..

तुषार काळभोर
Sat, 08/14/2021 - 08:51 नवीन
फोटो चांगले आहेत, लेख त्याहून जास्त भारी आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद​ तुषार! ग्रीष्मातलं

Bhakti
Sat, 08/14/2021 - 12:52 नवीन
धन्यवाद​ तुषार! ग्रीष्मातलं आणखिन एक वैभव म्हणजे पिवळा गुलमोहर....पिली धूप पेहनके तुम देखो बागोमे मत जाना :)Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सुरेख.....!

तुषार काळभोर
Sat, 08/14/2021 - 15:49 नवीन
सुरेख फोटो! असं फुलांनी डवरलेलं झाड अंगणात असायला हवं! आणि गाणं काय साजेलंसं निवडलंय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

असंच पण जांभळी फुलं असलेलं झाड

कंजूस
Sun, 08/15/2021 - 18:44 नवीन
चिकमंगळुरु बस डेपोजवळ होतं. ( ताम्हण नव्हे). पण खालून आणि पहिल्या मजल्यावरून हॉटेलमधून मोबाईलवर फोटो येईना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

छान!

जुइ
Sun, 08/15/2021 - 07:38 नवीन
लेखन आणि फोटो दोन्ही समर्पक
  • Log in or register to post comments

धन्यवाद जुइ.

Bhakti
Sun, 08/15/2021 - 14:47 नवीन
धन्यवाद जुइ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

छान लिहिलय

नीलकंठ देशमुख
Mon, 08/16/2021 - 20:29 नवीन
छान लिहिलय
  • Log in or register to post comments

सुंदर वर्णन.

विवेकपटाईत
Tue, 08/17/2021 - 11:31 नवीन
सुंदर वर्णन.
  • Log in or register to post comments

भुंग्या फुलाप्रमाणे असणारे एक

Bhakti
Wed, 08/18/2021 - 09:11 नवीन
भुंग्या फुलाप्रमाणे असणारे एक रानफुल. Image removed. धन्यवाद देशमुख काका आणि पटाईत काका.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा