महिलादिन
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ती आपली भाकरी स्वतः कमवेल.
(ते करत नसतानाही ती त्या भाकरीच्या किमतीहून अधिक कष्ट घरात घेत असते ह्याची जाणीव तिला असेल.)
ती साडी नेसेल वा मिनी स्कर्ट घालेल.
ती लग्न करेल वा करणारही नाही.
तीला मुलं नको असतील किंवा कदाचित तिला लग्न नको असेल - पण मुले हवी असतील - तो तिचा निसर्गदत्त अधिकार आहे असेही तिला वाटत असेल.
ती डे सेलिब्रेट करेल वा न करेल.
ती दागिने घालेल वा तिला त्यांचा तिटकारा वाटेल.
ती सणांसाठी पाळी पुढे ढकलणे नाकारेल..
तिला देवाधर्माची खूप आवड असेल आणि त्यापुढे संसार तुच्छ वाटत असेल किंवा कदाचित तिचा देवावर विश्वास नसेलही...
तिला कदाचित घरकामाची तितकीच आवड असेल जितकी तुम्हाला.. किंवा नसेलही!
तुम्हा सर्वांकरता रोज सकाळ दुपार संध्याकाळ रांधणे, त्याकरताची सर्व उस्तवार करणे हे तिचेच काम आहे - असे तिला वाटेलच असे नाही.. कदाचित ज्यांना पोटाला लागते त्या सर्वांचा ह्यात सहभाग असावा असे तिचे प्रामाणिक मत असेल.
ह्यामागचे सत्य जाणून तिची चेष्टा उडवू नका..
कदाचित तिला ड्रायविंग येत नसेल किंवा ती कदाचित तुमच्यापेक्षा अधिक सफाईने गाडी चालवत असेल.
कदाचित योग्य वेळी स्टॉपलॉसचे गणित तिला अधिक उत्तम समजले असेल.
तिला आपला नवरा आपला गुलाम नाही हे जसे कळते, तसेच आपणही त्याचा गुलाम नाही हे देखील कळले असेल.
ह्याचा अर्थ ती बेजवाबदार आहे असा घेऊ नका. तिचे प्रेम नाही, ती तुसडी आहे असेही नाही , शर्ट पँट घातल्याने, नोकरी करण्याने पुरुषांची बरोबरी होते का? नाही ना? मग तिला पुरुषांची बरोबरी करायची नाहिये, तिला समाजात गोंधळ माजवायचा नाहिये.
बाई म्हणून असलेली गृहीतके नाकारणे ह्याला कृपया गुन्हा समजू नका.
लक्षात घ्या तिला फक्त मोकळा श्वास घ्यायचाय!
तीही एक माणूस आहे.
तिला तुम्ही हवे आहात... साथीदार म्हणून हवे आहात.. ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करेल.
प्रेमाच्या आणि आदराच्या लायक असतील तर तुमच्या नातेवाईकांना ती आपले नातेवाईक मानेल.
तुम्हीही तसेच केलेत तर किती उत्तम होईल!
हे देखील समजून घ्या, की तिचीही काही स्वप्न आहेत, स्वतः च्या आवडी निवडी आहेत.
स्वतःहून घेतलेली जवाबदारी ती उत्तम पार पाडेलच. पण तुम्ही लादलेली जवाबदारी तिला आपली वाटेलच अशी अपेक्षा ठेवू नका.
ती चुकणारच नाही असे मी म्हणत नाही. कुठल्याही "माणसाकडून" घडू शकतात अशा चुका तीच्याकडूनही होऊ शकतातच.
कदाचित एखादी "ती" खरेच वाईट, खरेच क्रूर असेलही, काही विघातक करत असेलही - त्याकरता स्त्री म्हणून सूट देऊ नका.
पण स्त्री म्हणून तुम्ही लादलेल्या गोष्टी नाकारल्या म्हणून तीला चेटकीणही ठरवून नका.
केवळ शारिरीक फरकामुळे - तुमच्या कल्पनेतल्या साच्यात तिला बसवू नका.. तिचा घाट तिचा तिला शोधूदेत!
त्याकरता तिच्या हक्काची मोकळीक तिला द्या.
महिलादिनाचा पोळा होऊ नये इतकीच अपेक्षा!
------------------------------------------
अनेक गृहीतकांना झुगारून स्वतःच्या स्वप्नांकरता झटणार्या , घुंगट झुगारून शेतकरी आंदोलनात सहभागी होणार्या, रायफली चालवणार्या, कुस्ती खेळणार्या, इतर खेळ, साहित्य, शिक्षण, गुंतवणूक ,कला, गणित,भाषा, इतिहास, शास्त्र, युद्ध - आणि इतर अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार्या सगळ्या महिलांना, रोजच्या आयुष्यात झगडावं लागलं तर ते झगडून आपलं स्वातंत्र्य मिळवणार्या - घरातल्या घरातच मिनि क्रांती घडवणार्या सगळ्या बायकांना , स्वतःची मत असणार्या बायकांना, कदाचित ह्यातलं काहीही न करताही आपलं स्वत्व शोधणा र्या वा ते गवसलेल्या बायकांना आणि बाई म्हणजे आपल्या इतकीच माणूसच आहे , तिला स्वतः च्या आवडी आहेत, स्वतःचे प्रेफरन्सेस आहेत आणि त्याही जन्माने आपल्या इतक्याच स्वतंत्र आहेत हे कळलेल्या पुरुषांनाही स्त्रीदिनाच्या शुभेच्छा!
~ शिरीष
प्रतिक्रिया
थोडेसे मॉडिफाय करायचेय.. इथे संपादन कसे करता ये ईल?
फेमिनिस्ट फेस्टिव्हल
माहितीपूर्ण...
धन्यवाद
महिला दिनाच्या
प्रत्येक पुरुषांनी आजच्या
महिला दिन ..
सहमत आहे ....
सहमत.. महिला दिन साजरा करणे
पुरुष म्हणून आमच्या भावनांना
छ्या छ्या
हे वाचायचे राहिले का? :)
हाच तर्क बहुतेक डे ना लागू
महिला पुरुषासारखीच एक एन्टिटी आहे इतकेच मी मानतो.
लोकसत्ता मधला लेख
थँक्यू
'महिला दिना'चं वास्तव
काही घेरी बेरी येणार नाही.
बाकी चालू द्या.
वंश सातत्याची भावना
मुले = सरकारची मालकी ?
प्रत्येकाचं चांगलं तेच घ्याव
लेख आवडला..
महिला दिन चुकीचा .... ?
थॅक्यू चिगो!
याला काय शीर्षक द्यावे ?
परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मौलिक विचार
सलाम
धोक्याचा इशारा देणे ....