मावळातील बेडसे बुद्ध लेणी - का आणि कशासाठी? संपूर्ण माहिती

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
8 Mar 2021 - 10:20 am

मावळातील बेडसे बुद्ध लेणी - का आणि कशासाठी? संपूर्ण माहिती

आपल्याच मि. पा. च्या ग्रुप मध्ये असलेलले आमचे मित्र कपिल कुलकर्णी (कपिलमुनी) यांनी काही दिवसापूर्वी "प्रचेतस" यांची "प्राचीन भारतः बेडसे लेणी" हि लिंक वाचायला दिली आणि बेडसे लेण्यांचा एक विडिओ बनवण्यास सुचवलं होत. मग काय गेल्या आठवड्यात त्या ठिकाणाला भेट देण्याचा योग्य आला आणि आपल्या सर्वासाठी हा सविस्तर माहिती चा व्हिडीओ घेऊन आलो.

पुण्यापासून जवळपास ५७ कि मी अंतरावर असलेली बेडसे बुद्ध लेणी. मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत येथून तिकोना किल्ला किंवा काळे कॉलनीकडे जाणारा रस्ता आहे. याच रस्तावर कामशेतपासून साधारणपणे आठ किमीवर असलेल्या करुंज गावातून बेडसे लेण्यांना जाणारी वाट आहे. लोणावळा पासून जवळच ३ लेणी आहेत , कार्ला , भाजे आणि हि बेडसे. या सर्व लेण्यांचा निर्माण का , कशासाठी आणि इथेच मावळात का? या प्रश्नांची संपूर्ण माहिती आपल्यासाठी या विडिओ मध्ये नक्की पहा.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेसाठी काम करणाऱ्या "संतोष दहिभाते" याने आपल्याला दिलेली हि संपूर्ण माहिती, त्याचे SPOTVAR कडून विशेष आभार.

सह्याद्रीत भटकंती करीत असताना अनेकदा कातळकोरीव लेणी नजरेस पडतात. काही लेणी धार्मिक स्थळांमुळे किंवा जाण्यायेण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे पर्यटकांनी कायम गजबजलेली असतात. पण सगळ्याच लेण्यांमध्ये पर्यटकांची अशी गजबज बघायला मिळत नाही. पर्यटकांच्या वर्दळीपासून असाच दूर राहिलेला लेणीसमूह म्हणजे पवना मावळातील बेडसे लेणीसमूह.

पूर्वाभिमुखी बेडसे लेणी दक्षिणोत्तर पसरलेल्या १००-२०० मीटर लांबीच्या कातळकड्यात खोदलेली आहेत. बेडसे लेणीसमुहात तीन चैत्यगृह (त्यापैकी एक अर्धवट), एक भव्य विहार, दोन छोटे विहार (एक अर्धवट), सहा पाण्याची कुंडे या लेण्यात कोरलेली आहेत. बेडसे लेण्यांचे सौंदर्य चैत्यगृहात आणि आगळ्यावेगळ्या विहारात आहे.

अधिक माहिती साठी संपूर्ण विडिओ नक्की पहा.

धन्यवाद...

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Mar 2021 - 10:40 am | मुक्त विहारि

आता व्हिडियो बघतो

व्लॉगर पाटील's picture

8 Mar 2021 - 3:22 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

Bhakti's picture

8 Mar 2021 - 11:16 am | Bhakti

भारी!!
संतोष यांनी खुपच सुंदर सांगितले.आवडल.
ते चाफ्याच फुलांनी झाड खुपच सुंदर होतं.

व्लॉगर पाटील's picture

8 Mar 2021 - 3:22 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

बेडसे लेणीबद्दलचा खूप छान व्हिडीओ. संतोष यांनी अतिशय छान माहिती दिली आहे.
बेडसे लेणीचे मनाला शांतता देणारे वातावरण अनुभवले आहे.

व्लॉगर पाटील's picture

8 Mar 2021 - 3:23 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

हा पाहून तिकडे कॅामेंट देईनच.

व्लॉगर पाटील's picture

8 Mar 2021 - 3:23 pm | व्लॉगर पाटील

हो नक्कीच ..

मुक्त विहारि's picture

8 Mar 2021 - 4:58 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2021 - 6:00 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम व्हिडियो

+१

संतोष यांची ओघवती भाषा आणि सांगितलेली माहिती ऐकताना थक्क व्ह्यायला होते !

बापूसाहेब's picture

8 Mar 2021 - 9:20 pm | बापूसाहेब

मस्त व्हिडिओ.. !! आवडला.

पुढील उपक्रमास शुभेच्छा.. !!!

कपिलमुनी's picture

9 Mar 2021 - 3:12 am | कपिलमुनी

छान व्हिडिओ !

प्रचेतस's picture

9 Mar 2021 - 9:15 am | प्रचेतस

चांगला व्हिडिओ आहे. बेडसे लेणीत पुरातत्त्व खात्याचे केअरटेकर म्हणून श्री. दहिभाते नावाचे एक गृहस्थ पूर्वी असत, ते बहुतेक ह्याच संतोषचे वडिल असावेत. नंतर त्यांची बदली कार्ले नंतर लेणीला झाली होती. त्यांच्याशी बोलण्याचा खूपदा योग आला होता.

भाजे लेणीलाही श्री. वाघमारे नामक एक गृहस्थ आहेत. ते तिकिट खिडकीपाशी किंवा लेण्यांच्या आसपास असतात. लेणी क्र. २० (सूर्यगुंफा) हा विहार कायम कुलुपबंद असतो. वाघमारेंना विनंती केल्यास ते तो विहार उघडून देतात.

व्लॉगर पाटील's picture

15 Mar 2021 - 10:44 am | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!
कधी वेळ काडून तिकडे पण भेट देतो नक्कीच

कानडाऊ योगेशु's picture

9 Mar 2021 - 9:30 pm | कानडाऊ योगेशु

ह्या लेण्यांचा तसे अजंठा वेरुळ इथल्या लेण्यांचा व तसेच खजुराहो इथल्या मंदीरांचा शोध म्हणे ब्रिटिशांनी लावला. तसे असेल तर ह्या कलाकृती तोपर्यंत विस्मृतीत गेल्या होत्या का? म्हणजे ह्याचा अर्थ शिवकालात ह्या लेण्यांबद्दल तेव्हाच्या जनतेला काहीच माहीती नव्हती असे समजायचे का? मग लेण्यांवरुन जो काही अन्वयार्थ लावलाय तो आधुनिक अभ्यासपध्दतीनुसार लावला गेला आहे का?

कपिलमुनी's picture

9 Mar 2021 - 9:58 pm | कपिलमुनी

स्थानिकांना या अशा गोष्टींबद्दल माहिति असते ब्रिटिश हे डो़क्युमेंट करत असत म्हणून त्यांनी लावला म्हणायचे

प्रचेतस's picture

10 Mar 2021 - 6:10 am | प्रचेतस

स्थानिकांना माहिती असतेच.
वेरूळ मात्र कधीच विस्मृतीत गेल्या नव्हत्या. ज्ञानेश्वरीत वेरूळचे कित्येक उल्लेख आहेत. महानुभव पंथाचे संस्थापक स्वामी चक्रधर वेरूळ लेणीत राहत होते, मालोजीराजे भोसले ह्यांच्याकडे वेरूळची जहागिरी होती, औरंगजेबाने वेरूळच्या लेणी भग्न केल्या इत्यादी इत्यादी.

ब्रिटिशांनी लेणींचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन केले, पण ह्यात भारतीय संशोधकही मागे नव्हते. भगवानलाल इंद्रजी, वा. वि. मिराशी, शोभना गोखले हे दिग्गज.

चौथा कोनाडा's picture

10 Mar 2021 - 8:33 pm | चौथा कोनाडा

ब्रिटिशांनी लेणींचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन केले, पण ह्यात भारतीय संशोधकही मागे नव्हते. भगवानलाल इंद्रजी, वा. वि. मिराशी, शोभना गोखले हे
दिग्गज.

इंद्रजी, मिराशी, शोभना गोखले यांच्या कार्यावर वेगळा लेख वाचायला आवडेल, प्रचेतस.

प्रचेतस's picture

11 Mar 2021 - 9:49 am | प्रचेतस

सवडीनुसार अवश्य लिहिनच.

विंजिनेर's picture

13 Mar 2021 - 2:54 am | विंजिनेर

पाटीलबुवा, हाही व्हिडियो आवडला - संतोषचं विशेष कौतूक
- और आने दो...

व्लॉगर पाटील's picture

15 Mar 2021 - 10:44 am | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

याचे उत्तर म्हणजे तोडफोडवाल्या सुलतानी आक्रमणानंतर लोक सावध झाले आणि त्या लेण्या बुजवून टाकण्यात आल्या आणि सुरक्षित केल्या गेल्या.
१८१८ नंतर ब्रिटिशांकडे संपूर्ण भारत अधिपत्याखाली आला. त्यांना त्रास होणाऱ्या किल्ल्यांचा वापर होऊ नये म्हणून मार्ग उध्वस्त केले त्यांनी पण धार्मिक स्थानांना विरोध नव्हता. व्यापार बिनबोभाट आणि सातत्याने होण्यासाठी जे हवे ते त्यांनी केले. कंपनी अधिकारी फावल्या वेळात माहिती, वस्तू आणि पुस्तके गोळा करून इंग्लंडला पाठवत. त्याचा अभ्यास करून पुढच्या राजकीय हालचाली करण्यात येत असत. ( उदा amala and antiquities of Rajasthan - by colnol Tod. याचे तीन भागातले साधारणपणे ४५०० पानांचे ग्रंथ. उदेपूरच्या महालात दिसतील हस्तलिखितं.)

मुसलमान मोगली सत्तांनी हिंदू देवळांची तोडफोड केली .त्यातून त्यांना धोका वाटत होता. जैन देवळांना हात लावला नाही आणि इनामे, देणग्या दिल्या. राजकीय चाली होत्या.

हे अगदी थोडक्यात. बरीच डॉक्युमेंटरीज डीडी भारती चानेलवर आहेत पण त्यांचे शेड्युल जाहीर करत नाहीत.

मुसलमान मोगली सत्तांनी हिंदू देवळांची तोडफोड केली .त्यातून त्यांना धोका वाटत होता. जैन देवळांना हात लावला नाही आणि इनामे, देणग्या दिल्या. राजकीय चाली होत्या.

>>>

हे नवीन कळले!

कंजूस's picture

15 Mar 2021 - 11:15 am | कंजूस

Amala नाही.

अतिशय बोलका स्वभाव . पूर्वीची ओळख नसतांनाही मनमोकळ्या गप्पा मारल्या.