सकरपंच : रिव्यू

Primary tabs

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
5 Feb 2021 - 2:27 pm

एक काळ असा होता जेंव्हा स्त्रियांची भूमिका चित्रपटांत फक्त रडकी माँ नाहीतर अबला स्त्री हीच होती. चुकून कधी चांगली स्त्रीभूमिका यायची. माझ्या मते हॉलिवूड मध्ये स्त्रीभूमिका जास्त मूर्खपणाच्या असायच्या. मग काळ बदलला आणि स्त्री ला मध्यभागी ठेवून चित्रपट बनू लागले. पण माझ्या मते ह्या चित्रपटांत सुद्धा एक महत्वाचा दोष होता. ह्या चित्रपटांत सुद्धा स्त्री तोटके कपडे घालून त्याच गोष्टी करायची ज्या एक पुरुष साधे कपडे घालून करायचा. म्हणजे वॉरियर प्रिन्सेस झीना प्रमाणे युद्ध, उड्या मारणे गोळ्या झाडणे आणि ते सुद्धा स्टिलेटो घालून इत्यादी. माझ्या मते इथे स्त्री सशक्तीकरणा पेक्षा पुरुषी फँटसी सार्थ करायचा प्रयत्न जास्त होता. अर्थानं इथे चार्ली अंजेल सारखे तद्दन रद्दी चित्रपट निर्माण झाले तसे किल बिल प्रमाणे जबरदस्त चांगले चित्रपट सुद्धा झाले. किल बिल मध्ये उमा ठर्मन तलवार घेऊन शेकडो मुडदे पडत असली तरी शेवटी तिच्या मूळ कथानकाचा हेतू एक माता आपल्या मुलीसाठी काय करू शकते आणि तिच्या बिल चा पुरुषी अहंकार ह्या दोन गोष्टी मध्यभागी होत्या.

झेक स्नायडर ह्याचा चित्रपट काहीसा ह्याच श्रेणीतील आहे पण त्याला एक खूप म्हणजे खूपच महत्वाचा ट्विस्ट आहे. हा चित्रपट माझ्या मते प्रामुख्याने पुरुषांसाठी आहे. सकरपंच आणि वॉचमन हे दोन चित्रपट स्नायडर ह्यांचे अत्युत्कृष्ट चित्रपट होते. पण त्यानंतर DC ने त्यांना जे चित्रपट करायला दिले जस्टीस लीग वगैरे पूर्णपणे रद्दड होते.

सकरपंच ह्याचा अर्थ पोटांत अनपेक्षित पणे मारलेली गुद्दी. चित्रपटाचे नाव आणि कथानक ह्यांचा काहीही संबंध नाही. पण चित्रपट संपतो तेंव्हा सकरपंच श्रोता म्हणून आपल्या पोटांत मारला जातो. कसे ते मी शेवटी सांगते.

चित्रपट बेबी डॉल ह्या मुलीची कथा आहे. कथा तीन रियलिटी मध्ये आहे. ह्या तीनपैकी कुठली रियालिटी प्रत्यक्ष आहे हे सांगणे अवघड आहे पण त्याने विशेष फरक पडत नाही.

बेबीडॉल चा सावत्र पिता दुष्ट असतो आणि त्याला मारण्याच्या नादांत बेबीडॉल चुकून आपल्या लहान बहिणीला ठार मारते. ह्या अपघाताचा फायदा घेऊन तिचा पिता तिला एका मेंटल संस्थेत घेऊन जातो आणि तेथील एका अडर्लीला तिची लोबोटोमी (मेंदू शस्त्रक्रियेने काढून टाकणे) करण्यासाठी पैसे चारतो. ह्या संस्थेची प्रमुख एक स्त्री डॉक्टर असते जिला सर्व पेशंट बद्दल सहानुभूती असते पण अडर्ली तिच्या सहीची कॉपी करून विविध पेशंट ना लोबोटोमी साठी दुसऱ्या एका डॉक्टर कडे पाठवत असतो.

मेंटल संस्था हि एक पहिली रियालिटी आहे. इथे बेबीडॉल ला आणखीन काही मैत्रिणी भेटतात. आणि ह्या सर्वांना घेऊन बेबीडॉल दुसऱ्या रियालिटी मध्ये जातात. ह्या रियालिटी मध्ये सर्व मुली एका कुंटणखान्यात आहेत. ह्या कुंटणखान्याची प्रमुख आधीची महिला डॉक्टर आहे पण तिच्या वर सुद्धा एक बॉस आहे तो म्हणजे हॉस्पिटल मधील अडर्ली. कुंटणखान्यात जबरदस्त सुरक्षा आहे आणि मेयर वगैरे मंडळी येऊन इथे मुलींचा उपभोग घेतात.

बेबीडॉल कुमारी असल्याने तिच्या कौमार्यभंगासाठी अनेक लोक खूप पैसे मोजणार असतात त्यामुळे त्याच्यासाठी ती खूप महत्वाची असते. इतर सर्व मुली आधीच त्याच्या भीतीत असतात आणि पळून जाण्याची कुणाचीच तयारी नसते.

कुंटणखान्यातून पळून जाणे हे प्रतीकात्मक दृश्य मेंटल हॉस्पिटल मधून पळून जाण्यासारखे आहे हे दर्शक समजू शकतात. त्यामुळे हा एक एस्केप चित्रपट आहे हे समजते. आपली नायिका आता काय युक्ती वापरून कुंटणखाण्यातून पळून जाईल (म्हणजेच मेंटल इस्पितळांतून पळून जाईल) हे आम्ही उत्सुकतेने पाहतो.

आता बेबीडॉल ला एक विशेष स्किल आहे. ते म्हणजे तिचे नृत्य. ती जेंव्हा नाचू लागते तेंव्हा सर्व पुरुष मंडळी मंत्रमुग्ध होतात आणि देहभान पूर्णपणे विसरतात. त्याच वेळी बेबीडॉल एका तिसऱ्या दुनियेत पोचते. ह्या दुनियेत तिला एक वृद्ध गुरु आहे. तो तिला तलवार आणि बंदूक वगैरे देतो आणि शस्त्रांचे शिक्षण. इथे जबरदस्त ऍक्शन सीन्स आहेत. म्हणजे किल बिलाच्या तोंडांत मारतील आणि थोडीही व्हिडीओ गेम प्रकारची हिंसा आहे. ड्रॅगन्स आहेत, बॉम्ब आहेत, सामुराई आहेत, विमाने आहेत, पळत्या ट्रेन्स आहेत आणि रोबोट्स आहेत.

गुरु मग बेबीडॉल ला पळून जाण्याची गुरुकिल्ली सांगतो. पळून जाण्यासाठी तिला काही गोष्टी गोळा कराव्या पाहिजेत. अग्नी, चावी, एक नकाशा, एक चाकू इत्यादी. मग बेबी डॉल नृत्य संपवून इतर ४ मुलींना हा प्लॅन सांगते. आधी त्यांना भीती वाटते पण नंतर त्या सर्वजण तयार होतात. ह्यानंतर त्यांचा पळून जाण्याचा प्लॅन आम्ही प्रतीकात्मक दृष्या तिसऱ्या दुनियेत पाहतो. तिसऱ्या दुनियेत एखादी मुलगी मेली तर कुंटणखान्यात दुसऱ्या दुनियेत सुद्दा ती एका वेगळ्या पद्धतीने मरते. तिसऱ्या दुनियेत ड्रगन ला मारणे म्हणजे दुसऱ्या दुनियेत लाईटर मिळवणे. ट्रेनवरील बॉम्ब डिफ्यूस करणे म्हणजे दुसऱ्या दुनियेत मॅप वापरून पळून जाणे.

चित्रपटाचा शेवट हा तुमच्या पोटांत मारलेला गुद्दा आहे त्यामुळे मी रसभंग करणार नाही पण स्पष्टीकरण जरून देते. दर्शक म्हणून आम्ही सर्वजण बेबीडॉल च्या ह्या स्वातंत्र्ययुद्धांत भाग घेतो. तिने स्वतंत्र व्हावे म्हणून आम्ही वाऊच करत असतो. तो दुष्ट अडर्ली किंवा कुंटणखान्याचा प्रमुख ह्याच्या विषयी आम्हाला कितीतरी द्वेष वाटत असतो. हा दुष्ट पुरुष निव्वळ हिंसेच्या जोरावर ह्या मुलींवर जबरदस्ती करतो आणि त्यांना त्यांचे स्वतंत्र जीवन देत नाही म्हणून आम्हाला राग येतो.

पण चित्रपटाचा शेवट असा आहे जिथे स्नायडर एक आरसा आमच्या समोर धरतो. तोकडी स्कर्ट घालून बेबीडॉलला ती हिंसा करताना आम्ही पहातो तेंव्हा एका दुसऱ्या रियॅलिटीत आम्ही त्याच पुरुषी अहंकाराने तो चित्रपट पाहात असतो (आपण पुरुष असाल तर). पण स्त्री दर्शक म्हणून सुद्धा तुम्हाला ते नक्कीच समजेल. चित्रपट संपतो तेंव्हा कुठेतरी आम्ही त्या अडर्लीच्या बाजूला नकळत होतो असे शेवटी वाटते.

स्नायडर आणि इतर मंडळींनी ह्या चित्रपटाबद्दल आपली मते व्यक्त केली आहेत. एक चांगला स्त्रीप्रधान चित्रपट म्हणजे स्त्रीने टाईट्स घालून बंदूक घेऊन कमांडो प्रमाणे वागणे हे स्त्रीला महत्व देणे नसून प्रत्यक्षांत पुरुषी फॅंटसीला चालना देणे आहे. ह्या उलट एक स्त्रीला आपण डॉक्टर, पोलीस किंवा अगदी सैनिक म्हणून सुद्धा दाखवले तर प्रत्यक्षांत स्त्रियांचा दृष्टिकोन आणि पद्धत हि पुरुषांपेक्षा खूपच वेगळी असू शकते. पण मोठ्या पडद्यावर ते कुणाला पाहायचे नसते. त्यामुळे आम्ही पुरुषी फॅंटसीच दाखवतो आणि त्याला स्त्री प्रधान भूमिकेचा मुलावा देतो.

टीप : चित्रपटांत भयंकर हिंसा असली तरी ती थोडी कार्टुनिश पद्धतीची आहे त्यामुळे ती पाहणे मजेदार वाटते.

suckerpunch

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

मिलियन डॉलर बेबी, हा सिनेमा जरूर बघा ....

कोलंबस सर्कल, हा सिनेमा बघीतला आहे का?

वेट अंटिल डार्क, साउंड ऑफ म्युझिक, साॅल्ट, ल्यूसी, हे मला आवडलेले अजून काही सिनेमे ....

शा वि कु's picture

6 Feb 2021 - 10:16 pm | शा वि कु

सिनेमा पाहावा वाटतो आहे.

स्नायडरचे सिनेमे व्हिज्युअली फार उत्तम असतात, पण सगळी मदार व्हिज्युअल्स वर नसती तर सिनेमे अजून चांगले झाले असते. अर्थातच, ३०० वैगेरे अपवाद. तिथे भव्य दृश्यांशिवाय जमणार नाही.

चित्रपट कुठं बघायला मिळेल

साहना's picture

7 Feb 2021 - 10:58 am | साहना

नेटफ्लिक्स वर आहे .

चौथा कोनाडा's picture

10 Feb 2021 - 5:46 pm | चौथा कोनाडा

सकरपंचची सुंदर ओळख !