सूर्यवंशम, एव्हेंजर्स, लॉजिक आणि मी_स्टँड अप कॉमेडी ऍक्ट

चिनार's picture
चिनार in मिपा कलादालन
19 Jan 2021 - 8:14 pm

#Suryawansham

"सुर्यवंश एक आग हैं! इसमे दोस्तो के लिये जितनी ऊर्जा हैं, दुश्मनो के लिये उतनी ही ज्वाला!"

ह्याचा अर्थ विचारायचा नसतोय. हिरा ठाकूर एक टपराट बस चालवून पाच सात वर्षात एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कसं काय बांधतो हे पण विचारायचं नसतंय..

सिनेमात लॉजिक शोधायचं नसतं. कारण आपल्या आयुष्यातही काही लॉजिक नाहीये!!

ह्याच एका लॉजिकने सेट मॅक्सने सुर्यवंशमचे हक्क शंभर वर्षांसाठी विकत घेतलेत. म्हणजे येणाऱ्या पिढ्यांसाठी जंगल असतील नसतील, पाणी असेल नसेल, पण सूर्यवंशम नक्की असेल. नातवंड म्हणतील, आजोबाने आमच्यासाठी पैसा म्हणून एक रुपया नाही ठेवला पण सूर्यवंशम ठेवलाय..

हे माहिती असूनही एकीकडे कॅप्टन अमेरिका अन दुसरीकडे सूर्यवंशम सुरू असताना, सूर्यवंशम बघणाऱ्या माझ्यासारख्या सगळ्यांच्या सन्मानार्थ एक स्टँडअप कॉमेडी ऍक्ट!!

https://youtu.be/x_AT7OnDMd0

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

19 Jan 2021 - 10:08 pm | चौथा कोनाडा

+१

मस्तच !
लगे रहो चिनार भाऊ !

बाप्पू's picture

19 Jan 2021 - 11:29 pm | बाप्पू

मस्तच.. :))

फारएन्ड's picture

20 Jan 2021 - 7:52 am | फारएन्ड

मस्त जमले आहे :) मजा आली

फारएन्ड's picture

20 Jan 2021 - 7:53 am | फारएन्ड

मस्त जमले आहे :) मजा आली

झक्कास जमून आलीय स्टॅंडअप!

और भी आने दो...

- (हीरा ठाकूरचा भक्त) सोकाजी

हुप्प्या's picture

20 Jan 2021 - 9:11 am | हुप्प्या

मजा आली पाहताना. पुढला एपिसोड कधी?

सूर्यवंशम आवडणारे आपण एकटेच या जगात नाही ही जाणीवच मोठी सुखद होती.

आमच्या घरी मी एकटा सोडला तर बाकी सगळे हा सिनेमा लावला की उठून निघून जातात किंवा मला टिव्ही समोरुन हकलून देतात.
माझ्या दुर्दैवाने माझे लग्न सूर्यवंशम रिलिज व्हायच्या आधि झाले.

तुम्ही नशिबवन आहात की त्या मुलीने तुम्हाला रिजेक्ट केले एखादी समविचारी मुलगी शोधा आणि मग पुढची १०० वर्षे वेनजॉय करा

बर्‍याच दिवसात सेट मॅक्स ने लावला नाही "सुर्यवंशम"

रच्याकने:- पण सुर्यवंशमवर फक्त ४ मिनिटे? ये बत कुच जम्या नही दोस्त..

पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

20 Jan 2021 - 11:37 am | मुक्त विहारि

मी अद्याप तरी, सुर्यवंशम, हा सिनेमा बघीतलेला नाही

चिगो's picture

20 Jan 2021 - 1:54 pm | चिगो

सूर्यवंशम! अहाहा.. काय पिक्चर आहे राव? मैत्री, कर्तव्यनिष्ठा, जिद्द, निरपेक्ष प्रेम शिकवणारा अमिताभ, मोठ्या पदावर असूनदेखील जेष्ठ व्यक्तिंशी आदराने वागून परंपरा जोपासायला शिकवणारी सौंदर्या.. मी तर कितीदापण बघू शकतो (आणि सेटमॅक्स बघायला पण देतो.. ;D)

स्टँड-अप मस्त जमली आहे, चिनार भाऊ.. काही पंचेस जरा पॉज, टायमिंग कसून आणि स्पष्टपणे लँड करता आलेत तर बघा.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत..

मराठी_माणूस's picture

21 Jan 2021 - 4:25 pm | मराठी_माणूस

ती युट्युब लिंक टीव्ही वर सर्वा समवेत पहायचा प्रयत्न केला , पण आवाज स्पष्ट येत नाही.