पानिपत आणि शेरलॉक होम्स भाग २

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
13 Jan 2021 - 1:20 am
गाभा: 

1

पानिपत आणि शेरलॉक होम्स भाग २

शेरलॉक होम्स यांच्या मनातून ते चित्र जात नव्हते
काही दिवसांनी एका सायंकाळी पुन्हा डॉ वॉटसननी या विषयाला छेडले. ते म्हणाले, ' बॅटल ऑफ पॅनिपात वर मी वाचन केले. तो मोठा हिस्टॉरिकल इव्हेंट होता.'
यू नो वॉटी, 'त्या चित्रात ज्या लढाईच्या प्रसंगांना दाखवले आहे त्यातून ते चित्र काढणारा प्रत्यक्ष हजर असावा. म्हणून वेगवेगळ्या सरदारांच्या वेषभूषा, श्रीमंती, मानमरातब त्यातून दाखवलेला वाटतो.' व्हिस्कीचा नवा पेग भरत शेरलॉक होम्सनी ग्लास डॉ वॉटसनला सरकवला.

1

चीअर्स, म्हणून शेरलॉक होम्सनी एक मोठा सिप घेऊन म्हटले, त्या काळात नबाब, राजे आपल्या पदरी काही युरोपियन गोर्‍या लोकांना ठेवत असत. बरेचसे आर्मीमध्ये महत्त्वाची खाती तोफखाना, दारू बनवायचे कारखाने वगैरेचा मुख्य करत असत. अवधचा नबाब असे लोक ठेवून होता. त्यात एक फ्रेंच जो नंतर कर्नल म्हणून रिटायर झाला. त्याला भारतात नकाशे बनवायची, वाचन करायची कला होती. इथली भाषा जरी आली नाही तरी तो स्थानिक लोकांत मिळून मिसळून राही.
इंटरेस्टिंग, नाव काय त्याचे? त्याचा या चित्रांशी काय संबंध?
शेरलॉक होम्स पटकन उभे राहिले. टेबलावरील ग्लोब गोल गोल फिरला. इंडियन कॉंटिनंटपाशी थांबवत ते म्हणाले, धिस इज हिमालयन रेंज, नेक्स्ट रिव्हर्स गँजिस अँड जमुना. हियर डेल्ली. अप हियर पॅनिपात. नबाब शूजा वॉज नबाब ऑफ उध ऑर अवध. विथ हिम (Monsieur - मस्यू फ्रेंच उच्चारण - कोरनेल जां बातीस्ता जोसेव जॉंती) - मिस्टर कर्नल जॉन बातिस्टा जोसेफ गेंटिल सर्व्हिस करत होता. तो एकूण २५ वर्षे इंडियात राहिला. इतका मिसळला त्या मातीत कि लष्करी भपकेबाज कपडे, फ्रेंच चालिरीतींचा त्याला विसर पडला. बंगालमधे सुरवातीला त्याने दूप्लेस, ब्युसी, लॅली वैगेरेंच्या खाली काम केले. मीर जाफरने एका आपल्या मंत्र्याला आपल्या देखत मारल्याची किळस येऊन पाहून जाँती अवध संस्थानाच्या शुजाउदौलाकडे नोकरीला लागला. लवकर तो नबाबाचा मित्र झाला. दरबारात फ्रेंच एजंटचे श्रीमंती पद मिळवले. त्यांने भरपूर पैसे देऊन नकाशे बनवायच्या आपल्या आवडीच्या कामाला दिला. फावल्या वेळात हा टिवल्याबावल्या करतो, कामात लक्ष नाही, त्याने नेटीव्ह मित्र केलेत वगैरे आळ येऊन त्याला काढून टाका म्हणून आलेला वरिष्ठांचा आदेश नबाब शुजाने न मानता ठेवून घेतला. पण शुजा मेल्यावर त्याचे दिवस फिरले. काहींनी गंडवले. मित्र दिब्रॉसने त्याचे नकाशे पळवून आपल्या नावावर खपवायचा प्रयत्न केला.

1

वरील प्रमाणे चित्रे त्यांनी संग्रहित केली होती. त्यांनी असे फोटो चित्रे, मॅप्स संग्रह करून ते फ्रान्सला परतल्यावर तिथल्या राजाला दाखवून वाहवाही मिळवली. त्याच्या पश्चात मुलाने ते नंतर पुस्तकात छापले. राज्यात बदल झाल्यानंतर बिचाऱ्याची पेन्शन बंद झाली. त्याची पुढची २२ वर्षे हालाखीत गेली. पुअर फेलो…!

डॉ वॉटसननी मान डोलावली. 'इट वॉज ड्यु टू वी, युरोपियन्स नेटिव्ह्ज लर्नट मॅनर्स, एटिकेट्स, डिसिप्लिन, टाईमलीनेस, मेनी आर्ट्स, सायन्स, मिलिटरी टॅक्टिक्स’.
‘येस बाय ऑल मीन्स. यु सी इंडियन्सना 'जुवेल इन द क्राऊन' म्हणून नावाजले जाते. दे वेयर क्विक लर्नर्स’.
‘मार्क माय वर्ड्स, लेटर इयर्स दे विल रूल दि वर्ल्ड.'
‘आय सी’, डॉ वॉटसन म्हणाला. मनात शेरलॉकने वाचून मिळवलेली माहिती ऐकून थक्क झाला!
तेवढ्यात आलेले एक पार्सल फोडून वाचताना शेरलॉक होम्स यांचे डोळे विस्फारले.
‘सीम्स, विंग कमांडर हॅज टेकन माय अॅडव्हाइज व्हेरी सीरियसली! ही हॅज सेंट मी सम फोटोज्'!
लेट मी एक्सॅमिन… डॉ वॉटसन बडी, प्लीज एक्सक्यूज मी’ म्हणत ते आपल्या लॅबोरेटरीत गेले.

1

__________________________________________________________

1

प्रतिक्रिया

मस्त धागा आहे. पानिपतच्या लढाईत काय काय झाले याचा सारांश आहे असे वाटते. भित्ती चित्रासारखे काही तरी ....अनेक पातळीवर पाहायला लागेल. या लेखाचे सर्व भाग एकत्र कसे पाहावेत ?

शशिकांत ओक's picture

23 Jan 2021 - 4:59 pm | शशिकांत ओक

या चित्रातील व्यक्ती आणि घटना यावर भाष्य शेरलॉक होम्स यांच्याकडे पोस्टाने पाठवले आहे. त्यात जो प्रकाश टाकला आहे तो शेरलॉक होम्स यांना कितपत भावतो ते समजून येईल. या शिवाय आपल्या सारख्या विचक्षण सदस्यांकडून त्यांची मते समजून घ्यायला आवडेल.