मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

मिपा बालमित्रः धम्मालपंती.. २०२१

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in काथ्याकूट
14 Jan 2021 - 1:12 pm
गाभा: 

धम्मालपंती


नमस्कार मिपाकरहो,

सगळ्यात आधी २०२१ हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे आणि आरोग्यपूर्ण जावो, ही सदिच्छा!

नवीन वर्षाची सुरुवात आपण एका अनोख्या उपक्रमाने करत आहोत आणि हा उपक्रम तुमच्या-आमच्यासाठी नसून आपल्या बच्चे कंपनीसाठी आहे! अगदी बरोबर! बालगोपालांसाठी आहे हा अनोखा उपक्रम, ज्याचं नाव आहे 'धम्मालपंती'!

तुमच्या घरातील बच्चे कंपनी यात भाग घेणार आहे. लहान मुलं भन्नाट असतात, त्यांचं कल्पनाविश्वही भन्नाट असतं. शाळेच्या बाहेरच्या शाळेत मुलं खूप काही शिकत असतात, अनुकरण करत असतात. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी फक्त पुस्तकंच नाही, तर चौफेर ज्ञान आवश्यक आहे.

नवीन गोष्टी आत्मसात करण्याची, वेगवेगळ्या तऱ्हेने करून पाहण्याची त्यांची चौकस बुद्धी सध्याच्या स्पर्धेत आवश्यक आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्व होण्यासाठी याच तर गोष्टी आवश्यक असतात. या सगळ्यांतून मुलांमध्ये नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित होण्यास मदत होते. अर्थात ही मोठी प्रक्रिया आहे; पण त्याची सुरुवात विविध अ‍ॅक्टिव्हिटींमधून करण्यासाठीचा श्रीगणेशा पालकांकडून व्हावा, ही अपेक्षा आहे.

ह्या उपक्रमात ५ ते १५ वयोगटातील मंडळी भाग घेऊ शकतील आणि सर्व सहभागी मंडळींना मिपातर्फे प्रशस्तिपत्र देण्यात येईल.

तर मग वाट कसली पाहताय? लागा कामाला! तुमच्या बच्चे कंपनीमधले गुण - चित्रकला, निबंध, कविता, गोष्टी, कथाकथन, हस्तकला, नृत्य किंवा आणखी काही कला/कौशल्यं असतील, तर त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा. हा धागा खासम खास बालगोपालांसाठी आहे, त्यामुळे ह्या धाग्याची शान वेगळीच असणार आहे.

आपण फक्त त्यांना त्यांची बाललीला इथे पाठवण्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे, बाकी बच्चे अपने बाप होते है. तर रंगू द्या त्यांना त्यांच्याच रंगात, आपणही रंगू या आणि हा उपक्रम खूप यशस्वी करू या.

तुमच्या प्रवेशिका साहित्य संपादकांना व्य.नि. अथवा ईमेलने पाठवू शकता. मुदत २६ जानेवारी २०२१!


टीप : हस्तकला, नृत्य, कथाकथन व्हिडिओद्वारे पाठवल्यास जास्त बहार येईल. (हस्तकला सचित्र आणि कथाकथन ऑडियो स्वरूपातही पाठवू शकता.)

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

14 Jan 2021 - 1:39 pm | तुषार काळभोर

एकदम नावीन्यपूर्ण उपक्रम.

पियुशा's picture

14 Jan 2021 - 1:41 pm | पियुशा

जाम मजा येणार आहे ह्या उपक्रमात ,आतुरतेने वाट पाहत आहे,सर्वांना शुभेच्छा!

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Jan 2021 - 1:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

जन्मदाखल्या प्रमाणे माझे वय एखाद्या जख्खड म्हातार्‍या एवढे आहे, पण मनाने मी अजूनही लहानच आहे.
माझी प्रवेशिका चालेल का?
पैजारबुवा,

पियुशा's picture

15 Jan 2021 - 3:51 pm | पियुशा

तुम्ही जरा वाट पहा बुवा तुमच्या साठी पण येईल उपक्रम:)

चांदणे संदीप's picture

14 Jan 2021 - 3:11 pm | चांदणे संदीप

धत्तड तत्तड... धमाल मज्जा!

सं - दी - प

Bhakti's picture

14 Jan 2021 - 3:42 pm | Bhakti

मस्त!

मुक्त विहारि's picture

14 Jan 2021 - 8:13 pm | मुक्त विहारि

आवडला

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Jan 2021 - 1:19 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सांगतो लेकीला..

nanaba's picture

18 Jan 2021 - 2:15 pm | nanaba

माझ्या लेकीचे साहित्य पाठवेन

एकापेक्षा अधिक कलाकृती चालणार आहेत का?

नक्कीच!
ही स्पर्धा नाही. त्यामुळे एकाहून अधिक प्रवेशिकांचं स्वागत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2021 - 3:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त उपक्रम. शुभेच्छा....!

-दिलीप बिरुटे

बिपीन सुरेश सांगळे's picture

13 Feb 2021 - 10:52 am | बिपीन सुरेश सांगळे

मिपा मंडळ ,
एकदम हटके उपक्रम !
खूप कौतुक आहे
आणि सगळ्या बच्चे कंपनीचे सुद्धा कौतुक आहे .
सगळ्या थोर कलाकारांना शुभेच्छा !

मनस्विता's picture

13 Feb 2021 - 8:12 pm | मनस्विता

माझ्या मुलीचा सहभाग नोंदवायचा होता पण जमले नाही.