लाल बदामी प्रेम
जेव्हा माझी गोष्ट ....
तुझ्या तोंडून सुरु होते होते ना ,
ती मी भान हरपुन ऐकते
तु म्हणतोस " स्विटु ..तुझा DP मी जेव्हाही zoom करुन बघतो तेव्हा तेव्हा जाणवतं तुझं वेगळेपण ....
भव्य कपाळ , त्यावर शोभणारी चंद्रकोर ...
डोळे ...बोलके नि काळेभोर...
नाकावरचा तीळ तर रेअर खुप रेअर ...
गुलाबी गुलाबी ओठ , हसलीस की त्यातुन एक साइडचा दात हळुच डोकावतो बाहेर ..."
मी हाताच्या तळव्यांनी चेहरा झाकुन , लाजुन चुर
मग तु " i like u yaar "म्हणतं
पाठवतोस मला लाल बदामाचा पाऊस ..
तो कोसळत राहतो माझ्या mobile screen वर
आणी मी.....मी भिजत राहते चिंब चिंब
मोहरुन मी विचारते "अजुन काय ??"
तु मिश्कील हसुन म्हणतोस "बाकीचं गुपित प्रत्यक्ष भेटुनच सांगेन ".
छान
धन्यवाद
मिपावर स्वागत, तुम्ही लिहित रहा
हा असा का?
धन्यवाद
टर्मिनेटर बाबा की जय, हे घ्या मिक्स बदाम
धन्यवाद