चुलीवर आपण जेंव्हा काही ऍन बनवतो तेंव्हा लाकडाच्या धुराचा वास त्या अन्नात आपसूक घुसतो. आधुनिक मुलांना कदाचित हा वास आवडणार नाही पण गावांतून शहरांत गेलेल्या अनेक लोकांना हा वास मिस होतो. मक्याचे कणीस, पापड किंवा अगदी "नुस्तें" जरी गॅस वर बनवले तरी त्या लाकडाच्या धुराच्या वासाच्या शिवाय त्याची चव तेव्हडी चांगली वाटत नाही. ह्या शिवाय बिर्याणी, मटण, जंगली गेम मांस ह्याला जर तो थोडा धुराचा वास नाही तर त्याला अजिबात मजा येत नाही.
त्यामुळे खालील ट्रिक वापरून आपण अगदी फ्लॅट मध्ये सुद्धा लाकडी धुराच्या वासाचे अन्न बनवू शकता.
सर्वप्रथम एक कोळसा घ्यावा (चार-कोल), कधी गावांत गेला असला तर साधा लाकडी कोळसा सुद्धा चालेल पण हा अतिशय ड्राय असला पाहिजे.
जे काही अन्न बनवायचे असेल, बिर्यानी वगैरे ते बनवावे. मग एका वाटींत शुद्ध घी मेल्ट करून ठेवावे. बटर वगैरे चालणार नाही चांगले घी च पाहिजे. मग कोळसा गॅस वर चांगला लाल करावा. मग ती घी असलेली वाटी आपल्या पदार्थांत ठेवावी आणि कोळसा त्यांत टाकून झटपट आपले भांडे झाकावे. घी जळून एक पंधरा शुभ्र धूर अप्लाय भांड्यांत पसरेल. एक १० मिनिटे जर भांडे झाकून ठेवले तर तो धूर अन्नात चांगला मिक्स होतो.
प्रत्येक धूर वेगळा असतो घी आणि कोळसा जळून निर्माण होणारा धूर थोडा यज्ञाच्या धुराच्या प्रमाणे असतो. पण तुम्हाला जर वेग वेगळा धूर हवा असेल तर मक्याच्या कणसाला जे केस सदृश्य घडे असतात ते जाळून सुद्धा येणार धूर चांगला असतो. त्याशिवाय नारळाच्या "कट्टी" चा धूर, "सोन्ना" चा धूर आणि "पिड्या" चा धूर सुद्धा वेगवेगळा असून त्याची चव वेगळी असते.
माशांना थोडा समुद्री धूर द्यायचा असेल तर थोडी रेती वाटींत ठेवावी आणि त्यांत खारे पाणी ठेवावे. मग हि वाटी मायक्रो वेव्ह मध्ये गरम करून नंतर अन्नात ठेवली तरी चालेल.
विविध प्रयोग करून पहा. ज्यांना हि ट्रिक ठाऊक नसते असे लोक अगदी थक्क होतात.
उदाहरण : https://www.youtube.com/watch?v=FG2y-QrpYz8&t=8s
वाचने
16784
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
घी ?
ग्रेट.
अजिबात नाही. सिजलऱ हा प्रकार
In reply to ग्रेट. by कंजूस
व्यंजन हा शब्द वापरलात म्हणजे
In reply to अजिबात नाही. सिजलऱ हा प्रकार by साहना
द्रवरूप धूर आहे उपलब्ध
In reply to अजिबात नाही. सिजलऱ हा प्रकार by साहना
कालच बाटली विकत घेतली हिकारी
In reply to द्रवरूप धूर आहे उपलब्ध by भुजंग पाटील
Ok
पण एक शंका....
तूप
In reply to पण एक शंका.... by दिपक.कुवेत
दिपकराव,
एका वाटींत शुद्ध घी मेल्ट करून ठेवावे.पाच एमेलसुद्धा चालेल. कारण एक एमेल द्रवाची एकोणीस एमेल वाफ ( धूर) होतो असं शाळेत शिकलो. दोनतीन प्लेटींना पुरतोय शंभर एमेल धूर॥वाटी अश्यासाठी घ्यायची कि
In reply to दिपकराव, by कंजूस
रायत्यात निखारा
इथे रोजचे जेवण बनवले जात नाही घरी
असहमत ....
In reply to इथे रोजचे जेवण बनवले जात नाही घरी by Rajesh188
स्वतः वरून दुसऱ्यांची परीक्षा
In reply to इथे रोजचे जेवण बनवले जात नाही घरी by Rajesh188
"आयते" दिले तर जरूर खाऊ.
In reply to इथे रोजचे जेवण बनवले जात नाही घरी by Rajesh188
ती भारतीय ?????
In reply to इथे रोजचे जेवण बनवले जात नाही घरी by Rajesh188
चुकीला माफी नाही
In reply to ती भारतीय ????? by मराठी_माणूस