दंतकथा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
परवाची गोष्ट ,अगदी परवाची.दातांच्या डॉक्टरांकडे गेलो होतो.अर्थात दाताची तक्रार होती म्हणून.एरवी डॉक्टरांकडे कोण कशाला जाईल.
तसे दाताचे डॉक्टर माझे मित्र आहेत. पण मी रिकामा असलो तरीकामाच्या वेळेला उगीच गप्पा मारायला गेलो तरी ते बिझी असल्याने मला तिथे दात करोत (स्वतः चे)बसावे लागेल.
संध्याकाळी सात साडेसात ची वेळ.दवाखान्यात बर्यापैकी गर्दी होती .
प्रतिक्षालयात अंदाजे पंधरा,वीस लोक ।रुग्ण (दंताळू) व सोबतचे( सांभाळू ) धरुन .दोन तीन चिमुरडे पण होते .
चेहऱ्यावर च्या करुण भावा वरून रुग्ण कोण ते सहज ओळखू येतं.
'मेरा नंबर कब आयेगा ?'असा प्रश्न मनात घेवून ,तोच अधुनमधून रीसेप्शनिस्टला विचारत,मी बसलेलो.
गर्दी असली की बरं वाटतं एकटेपणा जाणवत नाही.कुणीतरी सोबत आहे ही भावनाच उभारी देतै मनाला .असे विचार मनात ये होते. क्षणाचे का असेना हे सोबती होते माझे.मन उचंबळून की काय म्हणतात तसं आलं.
उतनाही उपकार समझ 'कोई जितना साथ निभाए ,' साहीर च्या ओळी मनात रुंजी घालू लागल्या.
काही दुखत असलं की असलं काही तरी उदात्त वगैरे दाटून यायची मनाला सवय झाली आहे. इथेतर दाढदुखी होती.
माझा नंबर यायला किमान अर्धा तास तरी होता.
जमलेल्यांपैकी ऐंशी टक्के जनता ( दंताळू व सांभाळू मिळून )
माना खाली घालून मोबाईल मधे मग्न होते.
व्हाटसअप ,फेसबुक ,च्याटींग,कॉलींग,स्क्रोलींग वगैरे सुरु होते .
फोनवरबोलणे ,पण कुजबुज,वा: इतरांना त्रास होउ नये
याचे भान येतयं समाजात.एक सुखद विचार डोकावला.
दोन्ही रीसेप्शनिस्टपैकी एकजण ,आपले काम सांभाळून ,मोबाईल वर गेम खेळायची कसरत करत होती .दोन छोटे ,मोबाईल वर कार्टून पाहात होते. अन त्यांचे यबाप लेकराचे कौशल्बर बघूनसुखावत होते.
।लहान वयात किती सफाई ने मोबाईल ऑपरेट करतोय.मोठा झाल्यावर नक्कीच तो कोण जॉब्स का गेट त्याच्या सारखा होउ शकतो.असे भाव चेहर्यावर.
मधुनमधून कुठला आवाज आला,बोलावणे आले ,तर तेवढ्यापुरते डोकी वर व्हायची .आपल्याशी संबंधित नाही कळल्यावर पून्हा माना खाली. काहींनी कंटाळून आपापले मोबाईल चाळून खिशात वा हातात नुसतेच ठेवलेले होते.अधूनमधून कुणाच्या तरी मोबाईल ची रींगटोन वाजायची वा सिग्नलयायचा .लगेच बहुतेक जण जणुकाही आपल्यालाच कॉल।मेसेज आहे असे वाटून मोबाईल तत्परतेने पाहून घ्यायचे आपला नाही हे लक्षात आले की व पून्हा जागेवर ठेवायचे.बहुतेक सारे जण आत्ममग्न.
जे या आत्मानंदात विलीन नव्हते ते वाट पाहाण्याचा कंटाळा घालवण्यासाठी इकडे तिकडे पाहात ,कधी बाहेर चकरा मारत वेळ काढत होते.डॉक्टराचे केबीन मधून गालावर हात धरून रडवेला त्रासिक चेहरा घेऊन काही बाहेर येत होते.त्यांचे जागी ज्यांचा नंबर आला ते आता आपले काय होणार असे भाव घेऊन आत जात होते. तेरा क्या होगा कालिया? असा प्रश्न माझ्या मनात येत होता. जे आत गेले त्यांच्या जागी
दवाखान्यात नवीन लोक येत होते.पण एकंदरीत देखाव्यात फारसा फरक नव्हता.या सगळ्या कडे पाहात माझाही वेळ चांगला जात होता.
एक आजीबाई , मनातल्या मनात ' काय मेलं खूळ ते! आमच्या वेळी असलं नव्हते ' असे म्हणत सगळ्या 'मोबाइल्यांकडे 'कटाक्ष टाकत होत्या.
माझी त्यांची नजरानजर होताच ,मी त्यांच्या मनीचे भाव बरोबर आहेत असे
हास्याने दाखविले .त्या ही अंतरीची खूण पटल्या सारखे हसल्या.
एवढावेळ प्रतिक्षालयात ल्या टीव्हीवर बातम्या सुरु होत्या.
रोजचेच दळण ते.परत सकाळपासून रात्री पर्यंत चालूच .असून असून वेगळे तेकाय?
अपघात .दुर्घटना.तोडफोड .जाळपोळ.नुकसान .संप.रस्तारोको .शेतकर्यांच्या आत्महत्या.पेट्रोल डिझेलची भाववाढ.राज्यकर्त्यांच्या केलेल्या (?) कामा बद्दलच्या फुशारक्या.पक्षांतरे .सरकार पडणे.
विरोधकांचे नाकर्तेपणा चेआरोप.वेगवेगळ्या कामातले,संस्था तले भ्रष्टाचार .आरोपींचे पलायन .रुपयाची घसरण .अतिरेकी हल्ले.
नटनट्यांचे एकमेकांवरचे आरोप .तेच ते अन तेच ते.
लोक अधुनमधून टीव्ही वर द्रष्टीक्षेप टाकत होते.आपला याच्याशी काही संबंध नाही हे मानून पून्हा आपल्या मोबाईल कडे वळत होते।एवढ्यात आठ वाजले.रीसेप्शनिस्टने एकदम भानावर आल्या सारखं मोबाईल बाजूला करुन रीमोट ने च्यानेल बदलला. शिर्षकगीत सुरू झाले अन्,
मोबाईल मग्न मंडळीपैकी अनेकांचे कान टवकारले.
'कोणाच्या तरी बायकोच्या नवरा 'की नवर्याची बायको 'नावाची
वर्षानुवर्षे चालू मालिका सुरु झाली होती .बहुतेक जणांचे डोळे मोबाईल वरून टीव्हीकडे वळले.आता अर्धातास तरी ,ही मालिका संपेपर्यंत , डॉक्टरांनी बोलावू नये असे अंतरीचे भाव अनेकांच्या चेहर्यावर उमटले होते.
एवढ्यात मला डॉक्टरांचे बोलावणे आले .मग मी माझ्या या सर्व क्षणिक सोबत्यांचा मनोमनी निरोप घेउन,दाताचे दुखणे कायमचे मिटविण्याचे आशेने दातावर हात पोटात भितीचा गोळा घेऊन डॉक्टरांच्या कक्षात गेलो.
नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिया
खरं आहे!!!
वैताग ठीक आहे हो. पण एवढे
@ नीलकंठ देशमुख : तुमचा ह्युमरसेन्स अफलातून आहे !
धन्यवाद. सुचनांबद्दल आभार.
छान
धन्यवाद