कास पठार आणि महाबळेश्वर

शामसुन्दर's picture
शामसुन्दर in भटकंती
3 Oct 2020 - 10:58 am

कास पठार आणि महाबळेश्वर चालू झाले आहे का ?कोणी माहिती देऊ शकेल का?

प्रतिक्रिया

कंजूस's picture

3 Oct 2020 - 1:24 pm | कंजूस

कसे जाणार? सार्वजनिक जागा / बागा अधिकृतपणे बंद आहेत.

महाबळेश्वर/पाचगणी/ हे पुणे - पोलादपूर रस्त्यावरच असल्याने जाताजाता पाहता येईल.

सतिश गावडे's picture

3 Oct 2020 - 3:27 pm | सतिश गावडे

गाडीची काच खाली करुन गाडीतूनच पाहायचे का? :)

कंजूस's picture

3 Oct 2020 - 6:13 pm | कंजूस

तीन दिवसांपूर्वी ओळखीच्यातील तीन जण गेले होते कारने. एकाचे कंपनीचे काम होते आणि कंपनीने रूम बुक करून दिली होती.

चौथा कोनाडा's picture

3 Oct 2020 - 5:38 pm | चौथा कोनाडा

२२ सप्टें २०२० : यंदा कोविड १९ मुळे कास पठार पर्यटन राहणार बंद !

https://public.app/video/sp_s326rr2l3hb80

बोलघेवडा's picture

3 Oct 2020 - 9:39 pm | बोलघेवडा

कास पुष्प पठार बंद आहे. लांबून बघता येते.
त्याच्या पुढे १ कि मी अंतरावर कास तलाव आहे. अतिशय उत्तम ठिकाण आहे. इथे जाऊ शकता.

बोलघेवडा's picture

3 Oct 2020 - 9:39 pm | बोलघेवडा

आजच जाऊन आलो आहे

कंजूस's picture

3 Oct 2020 - 11:22 pm | कंजूस

फोटो? ठोसेघर धबधबा?

शामसुन्दर's picture

4 Oct 2020 - 11:20 am | शामसुन्दर

रीसोर्ट चालु आहेत का सर? स्वत:च्या गाडीने जाणार आहे चालु आसेल तर थिक नाहितर निघलो पुधे तपोळा जाव म्हण्तोय

आम्ही जाऊन आलोय कालच . बऱ्यापैकी पर्यटक ही होते. पठार फुलायला सुरवात झालीय. धुकं , ढगांची दुलई आणि ऊन नसल्याने छान हिरवेगार वातावरण होते काल. पुढे कास तलाव बघून पुढे 10 किमीवर शिवसागर जलाशय आहे. बोटिंग 7 महिने बंद होतं. काल आमच्यसमोरच बोटी उघडल्या मग पुढे संगम आणि जुनी बामणोली इथे बोटीने गेलो अर्धा तास लागला, पाण्यातून 12 किमी होते. तिथे भुयारात महादेवाचं मंदिर होतं. गार, शांत, प्रसन्न . कोयना , कांदाटी, सोळशी नद्यांचा संगम .

वजराई धबधबा पण आहे वाटेत.

मराठी_माणूस's picture

5 Oct 2020 - 4:52 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/maharashtra-news/flowers-of-kaas-plateau-bloom-...
बातमीत पर्यटकांना बंदी म्हट्ले आहे.