✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

ख
खेडूत यांनी
गुरुवार, 09/17/2020 - 12:44  ·  लेख
लेख
आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र दामोदरदास मोदींचा आज सत्तरावा वाढदिवस. त्या निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा! मोदींचं व्यक्तिमत्व मुख्यतः खूप वादग्रस्त आहे. त्यांची कारकीर्द खूप कष्टाची राहिली आहे. सतत आव्हानांचा सामना करत त्यांनी खूप काही साध्य केले आहे. जे काहीच शक्य वाटत नव्हते, ते मुद्दे सोडवले गेले आहेत. काही नवे मुद्दे वाढले आहेत. अजून खूप काही करायचे बाकी आहे. काहीही केले किंवा न केले तरी विरोध होतोच. नव्या माध्यमांमुळे सजगता वाढली आहे. बाकी इतिहास आपल्या सर्वांसमोर आहेच. त्यामुळे पुनराव्रुत्ती टळत आहे. यानिमित्ताने मनात काही प्रश्न येतात.. १. त्यांनीच सुरू केलेल्या प्रथेनुसार पुढील निवडणुकीनंतर ते पद न घेता ते सल्लागाराच्या भूमिकेत राहतील काय? त्यांना नातलगांची सोय लावायची नसल्याने चिकटून राहणार नाहीत असे वाटते. २. त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षात सक्षमपणे देशाचा कारभार कोणता नेता सांभाळू शकेल? ३. पुन्हा भाजपला सत्ता न मिळाल्यास दुसरा कोण पंतप्रधानपद योग्य प्रकारे भूषवू शकेल? ४. वरील मुद्दा तीन नुसार स्थिती मुळात येऊ शकते का? आणि त्यामुळे त्यांनी केलेले चांगले काम बंद तर होणार नाही ना? ५. त्यांच्या काय चुका झाल्या असे वाटते आणि उर्वरित साडेतीन वर्षांत कुठले मुद्दे त्यांनी  प्राधान्याने हातात घ्यायला हवेत? मिपाकरांना काय वाटते जाणून घ्यायला आवडेल. (अवांतर टाळण्यासाठी आधीच धन्यवाद..कारण सर्वच मिपाकर जबरदस्त सूज्ञ आहेत! )
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37841 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

.

शाम भागवत
गुरुवार, 09/17/2020 - 12:51 नवीन
👍<\span>
  • Log in or register to post comments

मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

डीप डाईव्हर
गुरुवार, 09/17/2020 - 13:23 नवीन
मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

सध्या मोदी सरकार चीन,ठप्प

मदनबाण
गुरुवार, 09/17/2020 - 13:25 नवीन
सध्या मोदी सरकार चीन,ठप्प झालेली अर्थव्यवस्था आणि माचो लिब्राडु / देशद्रोही झुंड / डावे या तीन आघाड्यांवर एकाच वेळी लढत आहे असे दिसते आहे. मा. मोदींना उदंड आयुष्य लाभुन वरील तीनही आघाड्यांत त्यांना यश मिळो ही प्रार्थना करतो ! हर बार मोदी सरकार !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बुढ्ढी गुड्डी सठिया गई है !
  • Log in or register to post comments

धुरळा

कपिलमुनी
गुरुवार, 09/17/2020 - 13:25 नवीन
धुरळा व्हणार
  • Log in or register to post comments

मोदींना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...

शशिकांत ओक
गुरुवार, 09/17/2020 - 13:33 नवीन
१. वयाच्या ७५ व्या वर्षी ते पदावरून दूर होतील... कदाचित पंतप्रधानपदाची टर्म पुरी करतील. व दूर होतील. २. आत्ता सांगणे कठीण आहे. अमित शहा यांच्यावर ती जबाबदारी सोपवली जाईल. ३. तशी वेळ येईल असे सध्या वाटत नाही. ४. जसे शेषन यांनी घालून दिलेल्या वाटेने पुढील निवडणूक आयोगाला जावे लागते. तसेच होऊन नव्या रुळांवरून सत्तेची गाडी पुढे चालू राहील. सामान्य जनतेला पूरक राज्य कारभारात सुधारणा जरूर होतील. पण जर मी आणि माझे कुटुंबीय या चक्रात उच्च पदांसाठी शर्यत सुरू झाली तर मात्र परिस्थिती झपाटय़ाने बिघडेल. ५. अद्याप चूक झाली असे म्हणता येईल असे वाटत नाही. हां काही गोष्टी एरर ऑफ जजमेंट म्हणून धराव्या लागतील. साहसी निर्णय घेण्यात असे घडते. या पुढे अर्थिक घडी नीट बसवणे आणि देशाच्या सीमांचे संरक्षण करणे ही प्राथमिकता असेल.
  • Log in or register to post comments

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदिजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

टर्मीनेटर
गुरुवार, 09/17/2020 - 14:34 नवीन
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदिजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची माझ्या वकुबानुसार उत्तरे देतोय. ती उत्तरे सर्वांना पटतीलच असे नाही आणि कोणी ती पटवून घ्यावीत असा आग्रहही नाही 😀
१. त्यांनीच सुरू केलेल्या प्रथेनुसार पुढील निवडणुकीनंतर ते पद न घेता ते सल्लागाराच्या भूमिकेत राहतील काय? त्यांना नातलगांची सोय लावायची नसल्याने चिकटून राहणार नाहीत असे वाटते.
माझ्या माहितीप्रमाणे भाजप मध्ये वयाची पंच्चात्तर वर्षे पूर्ण झाल्यावर उमेदवारी दिली जात नाही. पुढची लोकसभेची निवडणूक २०२४ साली होणार आहे. त्यावेळी मोदिजींचे वय ७४ वर्षे असेल, तेव्हा त्यांना उमेदवारी मिळण्यास तांत्रिक अडचण नसावी. आणि ती निवडणूक जिंकून पुन्हा तेच पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत यासाठी त्यांना परमेश्वर चांगले आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हि प्रार्थना.
२. त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षात सक्षमपणे देशाचा कारभार कोणता नेता सांभाळू शकेल?
आजघडीला त्यांचा उत्तराधिकारी होऊ शकेल असा एकही नेता मला तरी त्यांच्या पक्षात दिसत नाही. काही जणांना नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, अमित शहा वगैरे मंडळी त्यासाठी योग्य वाटतात पण त्यांच्याबद्दल काही न बोललेलेच बरे असे माझे वैयक्तिक मत!
३. पुन्हा भाजपला सत्ता न मिळाल्यास दुसरा कोण पंतप्रधानपद योग्य प्रकारे भूषवू शकेल?
भाजपला सत्ता न मिळाल्यास विरोधी पक्ष म्हणून ज्या काही टोळ्या आजघडीला राजकीय पटलावर दिसत आहेत त्यांच्यातही कोणी पंतप्रधानपद योग्य प्रकारे भूषवू शकेल असा नेता निदान आजघडीला तरी दिसत नाही असे माझे वैयक्तिक मत!
४. वरील मुद्दा तीन नुसार स्थिती मुळात येऊ शकते का? आणि त्यामुळे त्यांनी केलेले चांगले काम बंद तर होणार नाही ना?
अजून पुढच्या निवडणुकांना साडेतीन वर्षांपेक्षा जास्त अवकाश आहे त्यामुळे अशी स्थिती येऊ शकते का ह्यावर आत्ता भाष्य करणे थोडे घाईचे ठरेल. परंतु जर अशी स्थिती आलीच तर त्यांनी केलेली चांगली कामे बंद वा स्थगित होण्याची शक्यता वाटते. (महाराष्ट्रात असा अनुभव आला आहे.)
५. त्यांच्या काय चुका झाल्या असे वाटते आणि उर्वरित साडेतीन वर्षांत कुठले मुद्दे त्यांनी प्राधान्याने हातात घ्यायला हवेत?
देशाचा कारभार चालवणाऱ्या व्यक्तीकडून झालेल्या चुका काढण्या एवढी माझी लायकी नक्कीच नाही, तरी ज्या बाबतीत अनुभव आले त्यावरून सांगू शकतो कि, श्रीमती निर्मला सीतारामन ह्यांना अर्थमंत्री पदी बसवणे हि त्यांची दुसरी चूक आहे. पहिली चूक त्यांना याआधी MCA (Ministry Of Corporate Affairs) चे मंत्रिपद देऊन मोदिजींनी केली होती. अर्थात मुळात त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आणि हि खाती त्यांना देण्यात स्वतः मोदिजींना रस होता कि पक्षाच्या किंवा कुठल्या लॉबीच्या दबावामुळे ती द्यावी लागली ते माहिती नाही. तसेच पुढील साडेतीन वर्षांत त्यांनी रोजगार निर्मितीवर आणि ते पंतप्रधान होण्यापूर्वीपासून अजूनही अस्तित्वात असलेला भ्रष्टाचार नष्ट करावा आणि देशातील अंमली पदार्थांचा व्यापार आणि विक्री थांबवावी. आणि हो, त्यांचा उत्तराधिकारी होऊ शकेल असा एखादा ताज्या दमाचा नेताही घडवावा. बाकी कुठल्याच राजकीय पक्षाशी/विचारसरणीशी माझी बांधिलकी नसल्याने २०२४ साली ते रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी किंवा ओवैसिंच्या MIM पक्षाकडूनही निवडणुकीला उभे राहिले तरी माझे मत त्यांनाच 👆 धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हेप्पि बर्थ डे

नीलस्वप्निल
गुरुवार, 09/17/2020 - 14:32 नवीन
मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

Gk
गुरुवार, 09/17/2020 - 15:00 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी

प्रसाद_१९८२
गुरुवार, 09/17/2020 - 15:44 नवीन
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! -- पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाबाबत काहीच शंका नाही. ते मोठे मोठे निर्णय अगदी सहजरित्या घेतात. नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, जिएसटी, कलम ३७०, तीन तलाख किंव्हा मग राम मंदिर असो, वर्षोन वर्षे प्रलबिंत असणारे प्रश्न त्यांनी अवघ्या सहा वर्षात सोडवले. मात्र त्यांना बोलबच्चनगिरी करण्याची वाईट खोड आहे. नोटबंदीची घोषणा करतेवेळी त्यांनी 'देशातील काळा पैसा नष्ट होईल, दहशतवादी कारवाया संपतील, भ्रष्टाचार व काळाबाजार संपून जाईल व करचुकवेगिरीला आळा बसेल'असे अनेक फायदे नोटबंदी करण्यामागचे त्यांनी सांगितले. मात्र आजघडीला त्यांनी सांगितलेल्या वरिल सर्व गोष्टी जैश्या तैस आहेत. हिच गत जिएसटीच्या वेळी झाली. आजही राज्य व केंदात जिएसटीच्या पैश्यासाठी मारामारी सुरु असते. त्यांच्या बोलबच्चनगिरीचे अलिकडचे उदाहरण द्यायचे तर लॉकडाऊनचे देता येईल. ऐके दिवशी संध्याकाळी टिव्हीवर अचानक येऊन "मित्रो आज रात आठ बजेसे पुरे देश मे २१ दिन लॉकडाऊन लगने जा राहा है, (इथवर ठिक आहे पण हे पुढचे वाक्य बोलायची काय गरज होती) 'अगर ये २१ दिन के लॉकडाऊन का पालन हमने नहि किया तो देश २१ साल पिछे चला जायेगा" २१ काय १५० दिवसांचा लॉकडाऊन ठेऊन केस कमी झाल्याच नाहीत उलट दिवसागणिक वाढतच आहेत. आरोग्य व्यवस्था उभारुन महिन्या दिड महिन्याने लॉकडाऊन उठवला असता तर आजची परिस्थिती नसती.
  • Log in or register to post comments

आमचे दोन आणे ..

चौकटराजा
गुरुवार, 09/17/2020 - 16:50 नवीन
१. त्यांनीच सुरू केलेल्या प्रथेनुसार पुढील निवडणुकीनंतर ते पद न घेता ते सल्लागाराच्या भूमिकेत राहतील काय? त्यांना नातलगांची सोय लावायची नसल्याने चिकटून राहणार नाहीत असे वाटते. भा ज प मधील अलिखित नियमानुसार नरेन्द्र मोदी हे राजकारणात तून निवृत न होता सत्ताकारणातून निवृती पत्करतील आसे वाटते .याचा अर्थ ते राजकीय मार्गदर्शकाचे काम स्वीकारतील . २. त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षात सक्षमपणे देशाचा कारभार कोणता नेता सांभाळू शकेल? जर एक पायलट अचानकपणे प्रधान मन्त्री होऊ शकतो व शाहाबानू व बोफोर्स असे मुद्दे सोडता अनेकाना दखल घ्यावसा पी एम वाटू शकतो तर भा जपा मधेही असे एखादे तरूण नेत्रुत्व उभे राहू शकेल. ३. पुन्हा भाजपला सत्ता न मिळाल्यास दुसरा कोण पंतप्रधानपद योग्य प्रकारे भूषवू शकेल? पुन्हा भा ज पा ला सत्ता न मिळणे हे तसे अवघड आहे पण जर आताच्या महाराष्ट्राप्रमाणे स्थिती होऊन जर भा ज प ची गोची झाली तर राहुल गान्धी पी एम होतील. ४. वरील मुद्दा तीन नुसार स्थिती मुळात येऊ शकते का? आणि त्यामुळे त्यांनी केलेले चांगले काम बंद तर होणार नाही ना? फार मोठा मुर्खपणा करून भा ज पा ने सत्ता गमावावी अशी घोडचूक ते करणार नाहीत. माझ्या मते चान्गले काम म्हणजे ज्युडीशियल रिफॉर्म , इलेक्टोरल रिफोर्म , राजकारणी लोकान्च्या वरील केस साठी खास न्यायालये .ई कार्य्र मोदी ही कामे करणारच नाहीत. त्यान्ची जरी कितीही मनोकामना असली तरी राजकीय लोक ते होऊन देणार नाहीत. पी एम हे पद तसे दुबळे आहे एका अर्थाने ! ५. त्यांच्या काय चुका झाल्या असे वाटते आणि उर्वरित साडेतीन वर्षांत कुठले मुद्दे त्यांनी प्राधान्याने हातात घ्यायला हवेत? नोटबदली ( नोटबन्दी ) ही काही लोकांचे नुकसान करून गेली असे काही म्हंणतात . असे जर आहे तर ती परिणामशून्य नव्हती हे सिद्ध होते. पण त्याने फायदा नक्की काय झाला हे मोदीना अद्याप सिद्ध करता आले नाही. ५ लाखाचे ठेवीना विमा संरक्षण हे काम जरी झाले तरी खाजगी क्षेत्रातील लोकाना पेंशन अगदीच मामुली मिळत आहे .ती देण्यासाठी पी एफ कडे पैसा भरपूर आहे पण सरकारची त्यासाठी काही करायची इच्छा नाही. शेतीमालाचे चढ उतार याचा त्रास उत्पादक व ग्राहक दोघानाही होतो. सबब कायमस्वरूपी काहीतरी किंमत नियन्त्रण सर्कीट ब्रेकर सारखी यन्त्रणा सरकारने राबविली पाहिजे वा शेतीमालाच्या सर्वच कारभारातून सरकारने लक्श काढून शेतकर्याना पूर्ण स्वातंत्र दिले पाहिजे. फुल लिबरल पॉलिसी.
  • Log in or register to post comments

जय नरेन्द्र ग्यान गुन सागर |  जय मोदी तिहुँ लोक उजागर ||

चामुंडराय
गुरुवार, 09/17/2020 - 17:06 नवीन
शुभेच्छा ! नुकतच एक WA फॉरवर्ड आलंय. लोकांच्या प्रकृतीची काळजी असल्याने थोडाच भाग इथे टाकतो. अधिक रस असल्यास शोध घेणे. जय नरेन्द्र ग्यान गुन सागर |  जय मोदी तिहुँ लोक उजागर || राष्ट्रदूत अतुलित बलधामा | दामोदर पुत्र नरेन्दर नामा || तुम उपकार राष्ट्र पर कीन्हा |
  • Log in or register to post comments

मोदी चालीसेची झलक आवडली

डीप डाईव्हर
Fri, 09/18/2020 - 00:35 नवीन
मोदी चालीसेची झलक आवडली 👍 मी हल्ली whatsapp वापरत नाही, पूर्ण दिली अस्तीत तर बरे झाले असते 😔 आता जालावर शोधून बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

काही मिपाकरांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी

चामुंडराय
Fri, 09/18/2020 - 03:05 नवीन
वरती उल्लेख केल्या प्रमाणे काही मिपाकरांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी येथे सगळा भाग दिला नाही परंतु गोगोलदेवाला शरण गेलात आणि त्याला नेट पॅक चा नैवेद्य दाखवला तर तुमची सगळी माहिती गोळा करण्याच्या बदल्यात तो तुम्हाला "मोदी चालीसा" त्याच्या पोतडीतून काढून देईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डीप डाईव्हर

...

Gk
गुरुवार, 09/17/2020 - 17:18 नवीन
रावणाचा प्राण बेंबीत होता, तिला बाण लागल्यावर तो मेला 370 , 3 तलाक , राम मंदिर ही भाजपाची बेंबी आहे , एकदा हे झाले की भाजपे गडगडणार
  • Log in or register to post comments

काय सांगताय?

सुबोध खरे
Fri, 09/18/2020 - 11:02 नवीन
काय सांगताय? खरंच कि काय? कुमार केतकरांनी सांगितलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

...

Gk
Fri, 09/18/2020 - 11:26 नवीन
गावभर ऑपरेशन लोचट करावी लागत आहेत नैतर एक हाती सत्ता दिली असती की राज्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

...

Gk
Fri, 09/18/2020 - 11:28 नवीन
महाराष्ट्रात 122 वरून 105 वर आले युतीची एकूण टोटलही कमीच आली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

...

सॅगी
Fri, 09/18/2020 - 12:18 नवीन
आणि मग raul vinci सत्तेत येणार.... मग काय...बटाटेच बटाटे आणि सोनेच सोने....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

.

Gk
Fri, 09/18/2020 - 14:37 नवीन
मशीनची किंमत 15 लाख आहे मोदींना द्यायला सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

तुमच्या काँग्रेस वाल्यांना

सुबोध खरे
Fri, 09/18/2020 - 14:44 नवीन
तुमच्या काँग्रेस वाल्यांना आपला काळा पैसे देशात आणायला सांगा. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील. (मोदी हेच म्हणाले होते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

.

सॅगी
Fri, 09/18/2020 - 14:48 नवीन
बोफोर्स अकाउंट मधून वजा करायला सांगा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

.

सॅगी
Fri, 09/18/2020 - 14:50 नवीन
कमी पडले तर 2G अकाउंट आहेच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

.

Gk
Fri, 09/18/2020 - 14:53 नवीन
2014 पूर्वी मोदींकडे काळ्या पैसेवाल्यांची यादी होती म्हणे त्यांना पकडायला सांगा 2 जी घोटाळा घडलेलाच नाही ( असे कोर्ट बोलले )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

अग्गोबै

सॅगी
Fri, 09/18/2020 - 15:03 नवीन
मग इतक्या कंपन्यांची (टेलिनॉर, एटिसालॅट वगैरे) लायसन्सेस कोर्टाने कँसल का केली म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

हं

Gk
Fri, 09/18/2020 - 15:15 नवीन
कोर्टाने कायतरी केन्सल केले एव्हढ्यावरून कुणीतरी दहा करोड खाल्ले हे सिद्ध होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

हं

सॅगी
Fri, 09/18/2020 - 16:09 नवीन
कोर्टाने कायतरी केन्सल केले एव्हढ्यावरून कुणीतरी दहा करोड खाल्ले नाहीत हे तरी सिद्ध होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

सागर गुरव, Gk

शा वि कु
Fri, 09/18/2020 - 16:28 नवीन
हि बातमी माहितीपूर्ण आहे. https://www.indiatoday.in/india/story/2g-spectrum-verdict-what-happens-now-to-122-cancelled-telecom-licenses-1113292-2017-12-21
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

हं

सॅगी
Fri, 09/18/2020 - 16:11 नवीन
कोर्टाने कायतरी केन्सल केले एव्हढ्यावरून कुणीतरी दहा करोड खाल्ले नाहीत हे तरी सिद्ध होते का ? मुळात कँसल करण्याची परिस्थीती का आली???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

हॅ हॅ हॅ

Gk
Fri, 09/18/2020 - 16:13 नवीन
गुन्हा घडला तर गुन्हा घडला हे सिद्ध करावेच लागते नुसत्या कुजबूजीवर चालायला कोर्ट म्हणजे रेशीमबाग नव्हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

हा हा हा

सॅगी
Fri, 09/18/2020 - 16:23 नवीन
गुन्हा करण्यासाठी काहीतरी उद्देश असतोच ना... कोणी टाइम पास करायला गुन्हा थोडीच करतो?? आता गुन्हा झालाच आहे, तर त्याचा फायदा कोणाला तरी झालाच असेल ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

.

Gk
Fri, 09/18/2020 - 16:32 नवीन
कोर्टच बोलले काही घडले नाही मोदी , बेदी , रामदेव , अण्णा, केजरीवाल ह्यांना 2 जी नावाचा भास झाला होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

.

सॅगी
Fri, 09/18/2020 - 16:57 नवीन
काही घडलेच नाही, पण काहीतरी करायचं म्हणून लायसन कॅन्सल केली आणि काही जणांना आत घातले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

@ सागर गुरव : अजून किती दिवस हे अज्ञान दर्शवणार ?

संजय क्षीरसागर
Fri, 09/18/2020 - 16:29 नवीन
हा मूळ विडीओ पहा : Rahul Gandhi's viral video on potato turning into gold was a sarcasm on PM Modi अशीच बनवाबनवी करुन आणि तुमच्यसरख्यांना उल्लू बनवून हे सत्तेत आले. घटनेला २ वर्ष झाली तरी तुम्हाला पत्ता नाही. सुशिक्षितांची ही परिस्थिती तर अडाण्यांना काय म्हणावं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

@संजय क्षीरसागर : अज्ञान

सॅगी
Fri, 09/18/2020 - 17:06 नवीन
अज्ञानाचं बोलायच झालं तर १५ लाख मागणार्या अडाण्यांना काय म्हणणार आहात आपण?? जरा त्यांच्यासाठीही आपल्या अगाध ज्ञानाचे ४ थेंब उडवा की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ सागर गुरव : हे कुठून काढलं ?

संजय क्षीरसागर
Fri, 09/18/2020 - 17:24 नवीन
आधी तुम्ही चुकीची पोस्ट टाकलीये हे मान्य करा. घटनेला २ वर्ष होऊन सुद्धा तुम्हाला विडीओ एडीट केला आहे हे माहिती नव्हतं. मतदार सतर्क नसेल तर काय लायकीचे सरकार निवडून येणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

.

सॅगी
Fri, 09/18/2020 - 17:32 नवीन
१५ लाखाच्या मुद्द्याला बगल देण्याची कला फार चांगली जमली तुम्हाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ सागर गुरव : काहीही फिरवाफिरवी !

संजय क्षीरसागर
Sat, 09/19/2020 - 12:21 नवीन
तुमचा आलू-सोना प्रतिसाद आजही तुमचं अज्ञान दर्शवतो आणि अशाच बनवाबनवीतून सरकार सत्तेवर आलं हे उघड होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

फिरवा फिरवी

सॅगी
Sat, 09/19/2020 - 12:32 नवीन
चमच्यांचे १५ लाखांबद्द्लचे प्रतिसाद ज्ञानाचा फार मोठा उजेड पाडतात नाही का?? त्या बनवाबनवीबद्द्ल तुमच्या प्रतिसादातुन चकार शब्द निघत नाही यातही बरंच काही उघड होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अहो आपटर्ड लोकांचं असंच आहे!

सुबोध खरे
Sat, 09/19/2020 - 14:37 नवीन
अहो आपटर्ड लोकांचं असंच आहे! मोदींचे स्वच्छ भारत अभियान विफल करण्यासाठी रस्त्यावर टमरेल घेऊन बसणाऱ्या लोकांबद्दल का चिंता करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

@ सुबोध खरे : विषय काय आणि लिहिता काय ?

संजय क्षीरसागर
Sat, 09/19/2020 - 15:42 नवीन
जरा तारतम्य बाळगा. तुमच्यात खरंच हिंमत असेल तर मी वर स्पष्टीकरणार्थ दिलेला विडीओ (जो बिजेपीनी प्रचारात निर्लज्जपणे वापरला) तो खोटा आहे हे सिद्ध करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

विषय काय आणि लिहिता काय ?

सुबोध खरे
Sat, 09/19/2020 - 19:07 नवीन

विषय काय आणि लिहिता काय ?

श्री मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा धागा आहे. सज्जन पणे श्री मोदींना या धाग्यावर शुभेच्छा द्यायच्या ऐवजी त्यात तुम्ही आपल्या द्वेषाच्या विषाची गरळ ओकताय वर मलाच विचारताय कि धागा कोणता? हे केवळ "अरे ला का रे" उत्तर आहे एवढेही समजेनासे झाले, इतका द्वेष? निश्चलनीकरणाचा फटका जरा जोरात बसलेला दिसतोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ सुबोध खरे : मुद्दा लक्षात येईल तर नवल !

संजय क्षीरसागर
Sat, 09/19/2020 - 19:17 नवीन
मोदींच्या वाढदिवसाला तुम्ही पंचारती ओवाळा. आधी जो विषय चालू होता त्यामधे तुम्ही नाहक पडलात आणि आता पाचर बसल्यावर नेहेमी सारखे काहीही मुद्दे चालू केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मोदींच्या वाढदिवसाला तुम्ही

सुबोध खरे
Sat, 09/19/2020 - 19:20 नवीन
मोदींच्या वाढदिवसाला तुम्ही पंचारती ओवाळा. वाढदिवसाला पंचारती ओवाळणे हि तर आपली संस्कृतीच आहे. त्यात नवे ठेवण्यासारखे काय आहे बुवा? पण वाढदिवसाच्या दिवशी उखाळ्या पाखाळ्या काढणे आणि दूषणे देणे हि नक्कीच आपली संस्कृती नाही. घाव वर्मी बसलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मोदींच्या वाढदिवसाला तुम्ही

सुबोध खरे
Sat, 09/19/2020 - 19:21 नवीन
मोदींच्या वाढदिवसाला तुम्ही पंचारती ओवाळा. वाढदिवसाला पंचारती ओवाळणे हि तर आपली संस्कृतीच आहे. त्यात नवे ठेवण्यासारखे काय आहे बुवा? पण वाढदिवसाच्या दिवशी उखाळ्या पाखाळ्या काढणे आणि दूषणे देणे हि नक्कीच आपली संस्कृती नाही. घाव वर्मी बसलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ सुबोध खरे : तुम्ही काय वाट्टेल ते करा

संजय क्षीरसागर
Sat, 09/19/2020 - 19:32 नवीन
तो तुमचा प्रष्ण आहे. इथे ज्या आलू-सोना विडीओवर चर्चा आहे त्यावर बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

छान

Gk
Sat, 09/19/2020 - 19:49 नवीन
वाढदिवसाच्या दिवशी दूषणे देण्याची पद्धत गांधी नेहरू विरोधकांनीच सुरू केली , आता 2 ओकतोबर आणि 14 नोव्हेम्बर येतीलच ह्यांच्या स्वतःच्या कुणाचातरी बर्डे 1 एप्रिलला आहे , पण ते कधी तो साजरा करत नाहीत आणि गांधी नेहरूंच्या केकवर मारायला मात्र तत्पर असतात मोदींच्या बर्डेला हेच सगळे पेरलेले उगवून आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

छान

Gk
Sat, 09/19/2020 - 17:20 नवीन
https://www.hindustantimes.com/india-news/no-water-in-60-toilets-built-under-swachh-bharat-mission/story-3rdu1Hv1UZbabYQhb68OTP.html 60 % टॉयलेंटात पाणी नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मोगा खान

सुबोध खरे
Sat, 09/19/2020 - 19:03 नवीन
मोगा खान The government provides an incentive of ₹12,000 (US$170) for each toilet constructed by a rural family घरी शौचालय बांधण्यासाठी पैसे दिले. आता पाणी आणण्यासाठी पण पैसे सरकारनेच द्यायचे? सत्तर वर्षात सर्व काही सरकारनेच फुकट पुरवायची सवय काँग्रेसने लावली आहे याचा हा परिणाम. मुली स्त्रियांना साधे सॅनिटरी नॅपकिन बदलायला आडबाजूला जायला लागत असे. शौचाला जाण्यासाठी अंधार पडण्याची वाट पाहावी लागत असे. आणि ते सुद्धा बलात्कार अत्याचार होऊ नये म्हणून तीन चार बायकांनी एकत्र जायला लागायचे. हे फायदे तुमच्या कडून डॉक्टर असून एकदाही कधी उच्चारले गेले नाहीत. केवळ द्वेष करायचा ठरवले तर त्याचा परिणाम स्वतःच्या शरीरावर आणि मनावर पण होतो एवढे लक्षात ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

छान

Gk
Sat, 09/19/2020 - 19:45 नवीन
पाण्याची व्यवस्था नसताना सेफ्टी संडास बांधून देणे हे म्हणजे एनेस्थेटीस्ट अजून आलेलाच नसताना सर्जनने हातभार पोट फाडून ठेवण्यासारखे आहे आता पेशन्ट विव्हलणार तर तुम्ही म्हणणार सर्जनची काय चूक ? सर्जन तुमचा लाडका आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पाण्याची व्यवस्था

सॅगी
Sat, 09/19/2020 - 19:55 नवीन
संडासच्या पाण्याची व्यवस्था करणे हे केंद्र सरकारचे काम आहे असा शोध लावल्या बद्द्ल Gk काकांचे अभिनंदन....आणि १ चमचा पाण्याची भेट....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा