मृत्यूंचा आकडा वाढला, आता 'राजि'नामे द्या
सार्स कोविड- २ २०१९ मध्ये मानव प्रजातित उतरुन सहा महिने उलटून गेले. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर पहिल्या १०८ दिवसात १०,००० मृत्यू झाले. त्या नंतर मागच्या ३७ दिवसात १०,००० जीव गेले त्यातील ५००० मागच्या १६ दिवसात गेलेत. संदर्भ
पहिल्या १०८ दिवसात जे १०,००० गेले त्यातले ५२% मुंबईतले होते, नंतरच्या १०,००० मुंबईचा टक्का घसरून १९% म्हणजे गेल्या ३७ दिवसातील १०,००० मृत्यू पैकी ८१ % उर्वरीत महाराष्ट्रातून आलेत. पुणे जिल्ह्याचा अॅक्टीव्ह केसलोड मुंबई जिल्ह्याच्याच्या अॅक्टीव्ह केसलोडच्या चक्क दुप्पट झाला आहे.
( दैनिक सकाळच्या बातमीवर आधारीत 'आता तरी भानावर या' या शीर्षकाचा मी धागा काढला. काही मिपाकरांनी त्याची 'जिलबी' म्हणून संभावना केली - कमाल म्हणजे मिपा संपादक कि मालकांनी त्यांची बाजू घेत माझी संपादन सुविधा कमी केली!)
माहित नसलेल्यांची खिसगणती नाही. सध्या प्रत्येक दहा बिल्डींग मध्ये एखादी अधिकृत अॅक्टीव्ह केस असल्यास नवल नसावे. कुणि एक सुशांतसिंग गेला तर हल्लकल्लोळ केला जातो, कोविडने गिळलेल्या १०-२० हजारांचे जीव कमी मोलाचे आहेत ? मास्क, सॅनिटाइजर व सुरक्षित अंतर ही साधीशी तीन सामाजिक पथ्ये, हि पथ्ये पाळण्यात कुणाचाच हलगर्जीपणा न होता २०,००० गेले कसे?
सामाजिक पथ्य पाळण्यात कुचराई व सामाजिक पथ्ये पाळणार्यांची संभावना करणार्यांचे 'राजि'नामे का मागू नयेत ?
सध्या गाठलेला महिन्याकाठी १०००० महाराष्ट्रीयांचा मृत्यूदर न वाढता अजून सहा महिने कायमजरी राहीला तर किती मराठी लोकांना महाराष्ट्राने गमावले असेल हे गणित अवघड नसावे किंवा कसे.
* अनुषंगिक नसलेली अवांतरे, व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पुणेकरांनो, अती आत्मविश्वासाचे परीणाम
अवांतराबद्दल क्षमस्व.
बांध कुणाचा फुटावयास हवा ?
हृदयाने द्रवावे की द्रवू नये
३७% अधिक मृत्यू - एकट्या मुंबईत फक्त ५ महिन्यात
पाकिस्तान चा आदर्श घ्या
https://www.google.com/amp/s
पाकीस्तान बाबत लेखातील मुद्दे