✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

येत नाही...

अ — अजब, Tue, 07/21/2020 - 12:40
हारण्याची* वेळ जोवर येत नाही शक्यता नाकारता तर येत नाही... प्रश्न हा भंडावतो आहे मनाला का कधी प्रश्नास उत्तर येत नाही... हा उन्हाचा दोष की माझा म्हणू मी? सावली माझ्याबरोबर येत नाही... टेकल्यावर रोज डोके, समजलो मी पत्थराला कधिच पाझर येत नाही... चोरले अन तोडले आहे हृदय तू आळ त्याचा पण तुझ्यावर येत नाही... दूरवर आलो कुठे आहे 'अजब' मी? एवढे चालूनही घर येत नाही... (*'हारण्याची'ऐवजी 'जिंकण्याची' वाचायलाही हरकत नाही.)

प्रतिक्रिया द्या
3709 वाचन

💬 प्रतिसाद (7)

मस्त आवडली.

प्रमोद देर्देकर
Tue, 07/21/2020 - 14:04 नवीन
मस्त आवडली.
  • Log in or register to post comments

काही उत्तरे !

संजय क्षीरसागर
Tue, 07/21/2020 - 14:31 नवीन
एवढे चालूनही घर येत नाही...
सध्या घरातल्या घरात चालल्यामुळे असं होतं असेल.
सावली माझ्याबरोबर येत नाही...
डोक्यावर छत्री असल्यामुळे सावली पडत नाही.
आळ त्याचा पण तुझ्यावर येत नाही...
एकदा विचारायचं डेरिंग करुन पाहा !
का कधी प्रश्नास उत्तर येत नाही...
प्रश्न ऑप्शनला टाका, काम तमाम !
  • Log in or register to post comments

छान आहे गजल

श्वेता२४
Tue, 07/21/2020 - 15:25 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

छान..

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/21/2020 - 17:47 नवीन
छान..
  • Log in or register to post comments

वि-डंबन येतय...

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/21/2020 - 17:48 नवीन
वि-डंबन येतय... उमुमुमुं... हुंम्मम्ब!!! आ: ... होत नाही!
  • Log in or register to post comments

वाह्...

सत्यजित...
Tue, 07/21/2020 - 22:34 नवीन
क्लास! सुंदर गजल!!
  • Log in or register to post comments

छान आहे! :-)

राघव
Tue, 07/21/2020 - 23:23 नवीन
चोरले अन तोडले आहे हृदय तू आळ त्याचा पण तुझ्यावर येत नाही... ही द्विपदी खास आवडली!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा