मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
13 Jul 2020 - 3:43 pm
गाभा: 

'जावे त्याच्या वंशा' त्या शिवाय खर्‍या अडचणी अनुभवता येत नाही असे म्हणतात. पण टिकाकाराचे घर शेजारी असेल तर चुका उमगण्यास सोपे जाते. वेगवेगळे टिकात्मक धागे मिपावर निघाले निघत आहेत, मीही प्रसंगी टिका करण्यात सहभागी झालोय तरीपण खालील प्रश्न पडतो आहे.

'मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ?'

तुमची उत्तरे मी देऊ शकत नाही ती तुम्हीच देऊ शकता आणि माझी मी

१) मी मिपा लेखनातून रिटायरमेंट घेतलेला वाचनमात्र मिपाकर असतो तर कंटेनमेंट झोन अनुभवणार्‍यात मिपाकर नाहीत कि काय किंवा ते त्यांचे अनुभव का लिहित नाहीत की मिपा त्यांच्या पर्यंत पोहोचलेला नाही असा प्रश्न उपस्थित केला असता.

२) खरे म्हणजे लोकांच्या घरात रहाणे दाखवण्यात बीग बॉस टाईप रिअ‍ॅलीटी शो मध्ये इतका रस असलेल्या दूरचित्रवाणी तसेच अगदी सोशल मिडीयाने कंटेनमेंट एरीयात नेमके काय होते आहे हे पुरेसे दाखवलेच नाही, मी कोणत्याही टिव्ही चॅनलच मालक / संपादक / सुत्रधार / निवेदक असतो तर कंटेनमेंट एरीयात राहणार्‍यांना पत्रकार पद बहाल करून त्यांच्या रोजच्या व्यवहाराचे आणि समस्यांचे दर्शन लाईव्ह त्यांच्या घरातून दाखवले असते आणि व्हायरॉलॉजीस्ट, इम्युनॉलॉजीस्ट, लंग्स स्पेशालिस्ट आणि आय ए एस अधिकार्‍यांचा चर्चा पॅनल बनवून चर्चा घडवली असती.

३) मी टिव्ही चॅनलच मालक / संपादक / सुत्रधार / निवेदक असतो तर अधिकतम काळ व्हायरॉलॉजीस्ट, इम्युनॉलॉजीस्ट, लंग्स स्पेशालिस्ट यांच्या पॅनल सोबत प्रत्येक डॉक्टरला बोलावले असते आणि प्रेक्षकांच्या शंकावर आधारीत वीषाणू संक्रमण बद्धल खूप अधिक चर्चा घडवली असती.

४) मी डॉक्टर अथवा फार्मसिस्ट असतो तर अ) स्वतः काटेकोर मास्क वापरले असते, ब) माझ्या सगळ्या पेशंट आणि ग्राहकांना स्वतः फोन करून अधिकतम शारीरीक अंतर पाळणे, मास्क लावणे आणि कुणाचाही कुणालाही / कशालाही होणार्‍या प्रत्येक स्पर्श्याच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळा निर्जंतुकीकरणाचा आग्रह धरला असता.

५ अ) मी राष्ट्रीय आरोग्य धोरण आखणारा डॉक्टर आणि नेता असतो तर आजाराशी झुंज काही आठवड्यांची नाही तर किमान डिडेक वर्षाची आहे असेच जनतेला सांगितले असते.

५ ब) मी राष्ट्रीय आरोग्य धोरण आखणारा डॉक्टर आणि नेता असतो तर केवळ कोविड-१९ ला करण्याचे मर्यादीत लक्ष्य न घेता श्वसन विषयक सर्वच वीषाणू संक्रमणांना नेस्तनाबूत करण्याचे सर्वसमावेशक लक्ष्य संशोधन आणि लोकव्यवहारातील बदलांबद्दल ठेवले असते.

५ क) मी राष्ट्रीय आरोग्य धोरण आखणारा डॉक्टर आणि नेता असतो तर व्यावसायिक कारणाने दिवसाकाठी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना भेटावयास लागणार्‍या प्रत्येक व्यक्तीला एन ९५ चे मास्क आणि फेस शिल्ड अथवा चष्मा कंपलसरी केला असता

६) मी सरकार चालवणारा नेता असतो तर घरोघर लोक सर्वेक्षण आणि जागृतीसाठी बायलॉजी आणि केमेस्ट्रीच्या ग्रॅज्युएट्सना आणि मेडिकल रिप्रेझेंटेटीव्हज बोलवून व्हायरॉलॉजीस्ट/ इम्युनॉलॉजीस्ट / लंग्स स्पेशालीस्ट कडून ट्रेनिंग देऊन घरोघरच्या जागरूकता आणि सर्वेक्षण कामावर लावले असते.

७) मी सरकार चालवणारा नेता असतो तर अध्यादेश काढून एक देश एक रेशन कार्ड होई पर्यंत आधारकार्डाचे डिटेल घेऊन रेशन व्यवस्था लगोलग ऑनलाईन अद्ययावत करून रेशन धान्य आणि भाजी घरपोच देण्याची व्यवस्था केली असती. शहरातील बेकार लोकांना कुरीयर आणि पोस्टमन लोकांसोबत घरपोच सेवेत सामावून घेतले असते.

८) मी सरकार चालवणारा नेता असतो तर अध्यादेश काढून किमान अंतर न राखणार्‍यावर कुणालाही ऑनलाईन कायदेशीर दावा ऑनलाईन सुनावणी करून अशा दावा करु इच्छितांना एक उत्पन्नाचे भरीव साधन मिळवून दिले असते.

९) मी सरकार चालवणारा नेता असतो तर ट्रान्सपोर्ट बंद करण्यापेक्षा पेट्रोल आणि ट्रान्सपोर्ट्चे दर लोक अत्यावश्यक असेल तरच प्रवास करतील एवढे वाढवले असते. प्रसंगी हुकुमशाही लावून तात्पुरती वसुली कंत्राटे देऊन किमान अंतर न राखणार्‍यांकडून मोठी सक्त दंड वसूलीची व्यवस्था केली असती.

१०) मी सरकार चालवणारा नेता असतो तर कामावर राहण्याच्या जागा उपलब्ध आहेत तेथे किमान शारीरीक अंतर ठेऊन काम चालू ठेवण्यास परवानगी दिली असती.

११) मी सरकार चालवणारा नेता असतो तर मेट्रोपॉलीटन सिटीत लॉकडाऊन काळातही वस्तुंचे उत्पादन करणार्‍यांना छोट्या गावी तातडीचे व्यवसाय स्थलांतर करून उत्पादनास आग्रही प्रोत्साहन दिले असते.

१२) मी सरकार चालवणारा नेता असतो तर रिकामी बांधकामे आणि रिकामी घरे दोन वर्षांसाठी ताब्यात घेऊन अधिक घनता क्षेत्रात राहणार्‍यांची दोन वर्षांसाठी राहण्याची सोय सोपी केली असती.

१३) मी सरकार चालवणारा नेता असतो तर किमान २ वर्षांसाठी फॅमिली प्लानिंग अत्यावश्यक केले असते.

१४) मी सरकार चालवणारा नेता असतो तर पूर्ण लॉक्डाऊन न लावता केवळ गर्दीच्या वेळांवर लॉक डाऊन लावून व्यावसायिक व्यवहाराचा कालावधी दिवसाचे गर्दी सोडूनचे सर्व तास व्यवसाय चालू ठेवणे कंपलसरी केले असते ज्यामुळे गर्दीची गरज कमी भासली असती.

१५) मी सरकार चालवणारा नेता असतो तर दर चार घरातून आठवड्यातून एकाच व्यक्तीला सामान आणण्याची परवानगी ऑनलाईन पद्धतीने मॅनेज केली असती तेवढ्यावर गर्दी कमी नाही झाली तर ती पंधरा दिवसातून एकदा वर आणली असती.

१६) मी सरकार चालवणारा नेता असतो तर घरपोच माल पोहोचवणार्‍या ऑनलाईन सेवांना अधिक प्रोत्साहन दिले असते.

१७) मी सरकार चालवणारा नेता असतो तर टिव्ही चॅनलांवर शारीरक आंतर न पाळणार्‍यांवर शिक्षा झाल्याच्या बातम्या वगळता अगदी जाहिरातीते रिप्रेजेंटेशनल दृश्यात शारीरक आंतर न पाळणारी दृश्ये दाखवण्यावर बंदी आणली असती.

१८) मी सरकार चालवणारा नेता असतो तर प्रेक्षा गॅलरी विरहीत तसेच जवळ येण्यावर बंदी घालून क्रिकेट मॅचेसना परवानगी देऊन टिव्ही चॅनलांवर फुकट रतीब घातला असता जेणे करून लोक घराच्या बाहेर पडण्याचे आकर्षण कमी झाले असते.

१९) मी सरकार चालवणारा नेता असतो तर टिव्ही चॅनलांना शारीरीक अंतर पाळणार्‍या मनोरंजक कार्यक्रमांचा मोफत रतीब घालण्यास सांगितले असते.

२०) मी सरकार चालवणारा नेता असतो तर गरीबांच्या वस्त्यात अधिक टॉयलेट्स व अधिक खोल्या बांधण्यासाठी तातडीने फंडींग पुरवले असते.

* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे, व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

13 Jul 2020 - 11:19 pm | आनन्दा

मी जर नेता असतो तर घराचे दरवाजे बंद करून गुपचूप शेपूट घालून बसलो असतो.

विजुभाऊ's picture

17 Jul 2020 - 3:38 pm | विजुभाऊ

जे काम मा मुख्य मंत्री यानी करायला हवं ते फडणीस करताहेत. लोकांना भेटणे, कुठे वैद्यकीय सुविधा कशा आहेत याची ग्राउंडलेवल वरून माहिती घेणं हे करताहेत.
मुख्यमंत्री मात्र टीव्हीवर विनोदी भाषणे देत बसले आहेत.
इतका दिशाहीन माणूस झाला नसेल या माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात

विजुभाऊ's picture

17 Jul 2020 - 3:38 pm | विजुभाऊ

जे काम मा मुख्य मंत्री यानी करायला हवं ते फडणीस करताहेत. लोकांना भेटणे, कुठे वैद्यकीय सुविधा कशा आहेत याची ग्राउंडलेवल वरून माहिती घेणं हे करताहेत.
मुख्यमंत्री मात्र टीव्हीवर विनोदी भाषणे देत बसले आहेत.
इतका दिशाहीन माणूस झाला नसेल या माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात