कठीण समय येता...

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
10 Jul 2020 - 4:42 pm
गाभा: 

सध्याच्या करोना कठीण परिस्थिती आपण सर्वच जण थोडयाफार फरकाने व्यथित आहोत ... आपल्याला आणि आपल्या जवळच्यांना धोक्यपासून वाचवण्याचे, एक मनुष्य म्हणून जे जमेल ते प्रयत्न करीत आहोत ,,, असे असताना जेव्हा काही स्वतःला श्रद्धाळू वैगरे म्हणवणारे लोकं ' बेजबाबदार' किंवा "समोरच्या जिवंत माणसांच्या प्रयत्नांचा किंवा अस्तित्वाचाच अपमान करणारी" व्यक्तवे करतात तेव्हा आपली तर बुवा ' आता माझी सटकली ' अशी अवस्था होते.

आजचे उदाहरण देतो...( हे कोठेही घडू शकते , भारताबाहेर असल्यामुळे दुरून आपण आर्थिक मदतीशिवाय इतर काही करू शकत नाही हा एक थोडा वेगळा मुद्दा यात डोकावतो तो वगळल्यास )
घडले असे
भारतातील वृद्ध आई वडिलांची काय परिस्थिती आहे , काय अडचणी सध्या त्यांना येत असतील असे चर्चा २-४ मंडळीत चालू होती.. तेवहा एक व्यक्ती म्हणाली कि ' देव सगळे काय ते बघून घेईल'
मी हे ऐकले आणि आधी क्षण भर विचार केला कि काळजीने थकून आणि असहाय झाल्यामुळे हि व्यक्ती असे म्हणाली असावी.... मग जरा शांत पणे विचार केला आणि नंतर त्या व्यक्तीला विचारले कि आपण असे का म्हणालात? वरील कारणांमुळे कि आपल्या श्रद्धे मुले?
आणि जर श्रद्धेमुळे म्हणाला असाल तर मग पुढील प्रष्ननची उत्तरे द्याल का?
काय प्रश्न?
- या विधानातून असे समजायचे का? कि जी लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना किंवा अश्या अडकलेल्या वयोवृद्धांना मदत करीत आहेत त्यांच्या श्रमांचे काहीच नाही का? त्याला तुमचं दृष्टीने किंमत नाही?
- जर देवच सगळं करणार असेल तर मग इथे बसून आई वडिलांना कसे सावध राहा हे सल्ले का देताय.. देव आहे ना बघून घेईल ना तो ? कशाला काळजी?
- म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजूने डमरू वाजव्याचा दिसतोय... १ देव आहे तो करेल हे सोडायचे नाही आणि २ आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा फायदा पण घायचाच.. बरं तसे सरळ पणे कबूल हि करीत नाहीत तुम्ही.. हा दांभिक पणा नव्हे का?
- असेल जर एवढी श्रद्धा तर सरळ सांगा ना आई वडिलांना कि जा घराबाहेर कंटाळा आला असले तर ..देव आहे ना? तो बघून घेईल.. आहे हिंमत असे सांगण्याची ?
म्हणजे थोडक्यात मी त्यांना 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर " असेच विचारले
आवडले नाही अर्थात .. पळपुटी उत्तरे सुरु झाली ..
मी परत विचारले अहो तुम्ही शास्त्राचे पदवीधर ना? मग काय विचारतोय ते समजत नाही आपल्याला ?
त्यावर उत्तर आले " स्वभाव असतो एकेकाचा "
वा रे बहादरर, हे उत्तर ! (,, पुढे माझ्य मनात या वृत्ती बद्दल जे आले ते इथे लिहिण्यासारखे नाही)
थोडक्यात हेच म्हणालो कि "जिवंत माणसाच्या प्रत्यंनांचाच आदर सुद्धा तुम्ही करू शकत नाहो तर धिक्कार असो या आपल्या श्रद्धेचा..." आणि जाऊन भरपूर थंड पाणी प्यायलो

खुलासा ; हा धागा काढून मला 'देव आहे कि नाही " असला फुकाचा वाद घालायचा नाहीये,,, बाबानो जाहीर करतो कि देव आहे .. ठीक ! ओके ! पुढे काय ? भले तो असेल .
तो आणि प्रत्येक व्यक्ती बघून घेतील ना ,,त्याने खेळ मांडलाय ना ,, खेळू दे त्याला.. तुम्ही कोण शहाजोग सांगणारे कि देव काय करेल किंवा नाही ते? तुम्ही तुमचे गुरु वगैरे सर्व सगळे मरणार माझ्य सारखेच, राग लोभ मत्सर सगळं काही आपल्याला आहे .. असुद्या , जगू जसे जमेल तसे ..निदान या अवघड परिस्थितीत तरी समोरच्या जिवंत माणसाचा असा अपमान करू नका !

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jul 2020 - 5:53 pm | प्रकाश घाटपांडे

तेवहा एक व्यक्ती म्हणाली कि ' देव सगळे काय ते बघून घेईल'>>> अतिशय कॉमन वाक्य आहे. त्याचा शब्दश: अर्थ कुणी घेत नाही. आपल्या हातात आहे तेवढ करत राहायचं. बाकी जे आपल्या हातात नाही ते परमेश्वर पाहून घेईल. त्याची इच्छा असे श्रद्धाळू लोक परंपरागत बोली भाषेत म्हणत असतात. जास्त काळजी करुन मनस्वास्थ्य बिघडघवून घेउ नका असा स्वत:ला दिलेला दिलासा असतो तो.

"त्याचा शब्दश: अर्थ कुणी घेत नाही". ..मला पूर्ण माहिती आहे कि अशी पद्धत असते.. पण या प्रसंगी मी शांत पणे या मागची खरी मानसिकता कळून घेण्यासाठी खोदून विचारले..
आणि जेव्हा फुसकी उत्तरे मिळली तेव्हाच प्रतिक्रिया उमटली...
मला हे दाखवून द्यायचे होते कि अश्या गंभीर समयी तरी सहज म्हणून असली विधाने फेकू नयेत
आज गरज होती कि या उदाहरणात काही तरी ठोस उपाय करता येत नसेल तर निदान गप्प तरी बसावे
असो काळजी बद्दल धन्यवाद

प्रसाद गोडबोले's picture

10 Jul 2020 - 7:57 pm | प्रसाद गोडबोले

बरं मग हा वाद घातल्यानंतर, थंड पाणी पिल्यावर, आणि नंतर मिपावर धागा काढल्यावर तुम्हाला समाधान लाभले ना? मग झालं तर ! समाधान महत्वाचं ! देव असला काय नसला काय , तुम्हाला काय फरक पडतो ?

चौकस२१२'s picture

11 Jul 2020 - 1:35 pm | चौकस२१२

मार्कस ऑरेलियस
आपल्या ग्रीक तत्वन्यानात जर चेष्टा करणे बसत असेल तर करा.. मी मात्र प्रामाणिक पणे लिहिले होते
प्रसंग होता लांबवरून भारतातील वयस्क लोकांना काय ठोस मदत करता येईल... यात देव आहे / नाही वैगरे काही संबंध नवहता .. बरं येथे बाकीचे म्हणतात " असे म्हण्यायची प्रथा असते " वैगरे मला माहित का नाही? त्या व्यक्तीला अगदी नम्रपणे मी विचारले कि अहो तुम्ही हे मध्ये का काढताय? त्यावर वरील खुलासा ती व्यक्तीही देऊ शकली असती तर उत्तर काय मिळाले " असतो एखाद्याचा स्वभाव" मला तरी हा सर्व प्रकार म्हणजे इंग्रजीत flipant रिमार्क करणे असे वाटले

बाप्पू's picture

10 Jul 2020 - 10:01 pm | बाप्पू

या लेखाद्वारे तुम्ही प्रत्येकाला दोनच पर्याय देत आहात
1) देव
2) डॉक्टर आणि वैद्यकीय उपचार

यापैकी एकाची निवड केली तर दुसऱ्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही ही अट आणि जबरदस्ती देखील तुमच्या लेखातून जाणवतेय.

पण मी म्हणेल कि दोन्हीपैकी कोणत्या पर्यायाची निवड करायची किंवा एकाच वेळी दोन्ही पर्याय निवडयायचे, हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे.

जोपर्यंत जगात देव आहे हे 100% सिद्ध होत नाही तोपर्यंत नास्तिक लोकं मिपावर जिलेब्या पाडत राहणार ..

आणि जोपर्यंत जगात देव नाही हे 100% सिद्ध होत नाही तोपर्यंत आस्तिक लोकं मिपावर जिलेब्या पाडत राहणार..

एकूणच काय तर अनंतकाळापर्यंत मिपावर जिलेब्या पडत च राहणार

प्रकाश घाटपांडे's picture

11 Jul 2020 - 12:33 pm | प्रकाश घाटपांडे

लॉजिक गेट 0 किंवा 1. बुलियन अल्जेब्रा. प्रकाशाने कण तरी असावे किंवा तरंग तरी असावे. :)

चौकस२१२'s picture

11 Jul 2020 - 1:30 pm | चौकस२१२

यापैकी एकाची निवड केली तर दुसऱ्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही ही अट आणि जबरदस्ती देखील तुमच्या लेखातून जाणवतेय.
माझी जबरदस्ती अजिबात एका गोष्टीवरच विश्वास ठेवा अशी नवहती.. माझी विनंती एवढीच होती कि जी व्यक्ती प्रयत्न करीत आहे त्या व्यक्तीला जर तुम्ही सारखा देव वैगरे दाखला द्यायला लागलात तर एक दिवस ती व्यक्ती म्हणणार.. आरे बाबा असेल तुझा देव वैगरे पण माझ्य प्रयत्नांची तर दखल घे ? आणि "सगळंच देव" अशी मखलाशी करून तू या प्रयत्नांचा का अपमान करतोस.. हे खास करून केव्हा जाणवले कि जेव्हा जीवनात कधी नोकरी किंवा उद्योगासाठी खूप प्रयत्न करून सुद्धा यश येत नवहते तेव्हा समोरचा जर सहानुभूती तर सोडाच पण असले तारे तोडू लागला तर वैताग येतोच..

नेत्रेश's picture

11 Jul 2020 - 2:42 am | नेत्रेश

बरेच डॉक्टर लोक म्हणतात, आम्ही प्रयत्न करतो, यश देव देतो. एकसारखे उपचार करुनही बर्‍याचदा सारखेच रीझल्टस मीळत नाहीत. काही बरे होतात, आही नाही होत. कित्येक मोठ्या हॉस्पिटसमध्ये देवाचे मंदिर अथवा येशुची मुर्ती असते. तीथे बरेच डॉक्टर्सही प्रर्थना करतात. रोगी आणी त्यांचे नातेवाईकही प्रार्थना करतात. त्यांना डॉक्टर हे म्हणत नाहीत की 'रोग्याला मी वाचवणार आहे, प्रार्थना करायची तर माझी कर.'

जेव्हा कुणी म्हणतो की 'देव सगळे काय ते बघून घेईल' तेव्हा 'प्रयत्न करणे आपल्या हातात आहे, यश देण्याचे देव बघुन घेईल' असा साधारण अर्थ असतो. त्या व्यक्तीला तुमचा प्रश्णाचे उत्तर देणे जमले नसेल, म्हणुन त्याचा डॉक्टरांवरचा विश्वास कमी होत नाही.

प्रत्येकवेळी 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर' हा बाणा चालवणे संयुक्तीक नाही, त्याचा बाप बाहेरगावी गेलेला असु शकतो. (कृ. ह. घ्या.)

आंबट चिंच's picture

11 Jul 2020 - 12:53 pm | आंबट चिंच

नेत्रेश यांनी बरोबर समजावले आहे.

बहुतेक सगळ्यांना समजले असेल.

देव हा विषय चर्चेला घेतलाच आहे तर .....
सादर आहे:

रमेश देव यांचे एक सुंदर गीत : https://www.youtube.com/watch?v=9jviLqTi5wA