नमस्कार मंडळी..!
मी हर्षद जाधव. इंदापूर जि.पुणे. येथील एक शेतकरी आहे मी जि पोस्ट टाकतोय ती मिपाच्या अधिकृत धोरणात बसते की नाही,काय माहीत? म्हणून सर्वप्रथम मी संपादक मंडळीची माफी मागतो.असो
मी एक पूर्णवेळ शेती करणारा शेतकरी आहे.शेतीत ऊस ,केळी,कांदा,अशी पिके घेत असतो.सध्या शेतीत केळीचे पहीले पिक काढण्यासाठी तयार झाले आहे.पण लॉकडाऊनमुळे कोणी व्यापारी फिरकत नाही.साधारण ५० टन केळी निघेल असा अंदाज आहे. मिपावर वेगवेगळ्या भागातील अनेकजण आहेत. तुमच्यापैकी कोणी केळीचा व्यापारी आहे का? किंवा दुसरे कोणी व्यापारी आपल्या संपर्कात आहे का. असले तर सांगा.सध्या १० टन माल काढणीसाठी तयार आहे.
दुसरे एक कच्चा किंवा पिकलेल्या केळीपासून कोणकोणते product बनवता येतील? वेफर्स जर मोठ्या प्रमाणात बनवायचे झाल्यास काय करावे लागेल.अजून दुसऱ्या idea द्या. मला व्य.नि करा .किंवा 8551902044 यावर संपर्क करा. धन्यवाद.
वर्गीकरण
वाचने
6671
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सन्ध्याकाळी फोन करतो.
Okay
आपली पोस्ट ट्विटर वर पण शेयर
धन्यवाद...!
In reply to आपली पोस्ट ट्विटर वर पण शेयर by महासंग्राम
ट्विटर वर बऱ्याच जणांनी शेयर
In reply to धन्यवाद...! by जावई
ट्विटर वर आलेला प्रतिसाद
ओके
रेडीओ सिटी वर बाजार म्हणून
कोल्हापूरला एक मित्र केळीचे
धन्यवाद.