गुलाबी कागद निळी शाई....1 अनामिक
लेखनविषय (Tags)
गुलाबी कागद निळी शाई
Hiiii
पत्र पाहून आश्चर्य वाटलं ना? गंमत सांगू, मलाही वाटलं. :) कारण शाळेतलं पत्र लेखन संपल्यावर पुन्हा कधी खरंखुरं पत्र लिहिलंच नाही बघ. तसंही बोअरींगच होतं ते. तिथं हमखास मार्कस् जायचे. मराठीच्या मिस् तर छळायच्याच मला. माझे निबंध आणि पत्र भर वर्गात वाचली जायची. लेखन कसं नसावं याचं उदाहरण म्हणून. सगळे चिडवायचे मग. Science घेतलं आणि सुटले त्यातून. ते जाऊदे.
तर काय सांगत होते? हं तर तुला लिहिलेलं पत्र. त्याचं काय आहे,
तसा तू मला नेहमी भेटतोस. भेटतोस म्हणजे दिसतोस. कँटीनमध्ये, टी कॉर्नर वर. खरं तर मीच तुला रोज बघते. तू पहातोस की नाही माहित नाही. किंवा असं कोणीतरी तुला पहातं हे तर तुझ्या गावी पण नाही. म्हणजे नसावं. नाहीतर काही तरी response दिला असतासच ना तू इतक्या दिवसात??? सगळे माझे मित्र मैत्रिणी मला तुझ्या वरून चिडवतात. आणि तू? मठ्ठोबा नुस्ता. . त्या दिवशी तू म्हणालास, "अरे वा तुम्हाला पण चहा आवडतो का?"
इडियट स्ट्युपीड. मी काय चहा प्यायला घुटमळते का तिथे? इतका कसा तू स्वतः मधे गुंग?
Anyway, कळतंय का तुला मी काय म्हणतेय ते? तर मला तू आवडतोस. हं. कळलं? तू काही आपणहून कधी बोलणार नाहीस. त्यामुळे शेवटी मीच विचारतेय , येणार का एकदा कॉफी प्यायला? Coffee or tea. हे प्रत्यक्ष विचारायला थोडी घाबरतेय. म्हणजे Not exactly घाबरतेय. तू नाही म्हटलंस तरी चालेल. पण नंतर खूप awkward होईल बोलायला. मला नाही तुलाच. कारण तुझं काही सांगता येत नाही. इतका लाजाळू तू.. एकतर चहाच सोडायचास किंवा प्यून ला सांगून केबीन मध्येच मागवायचास.. मग जेवढी पाच मिंटं भेटायचास किंवा दिसायचास तेही बंद.
म्हणून पत्र. No mail or message. कारण कुणी पाठवलं ते कळेल ना पटकन?
पत्राखाली मुद्दामच मी माझं नाव नाही लिहिलंय. तसंही ते तुला माहिती असण्याची शक्यता कमीच. माझ्या बद्दल तुला "तसं" जर काही वाटत नसेल तर तू हे पत्र फेकून दे. अगदी बिनधास्त. Problemच मिटला. पण जर... जर...
तुला कुठेतरी काही तरी, अगदी इतकुसं का होईना पण काही वाटत असेल ना... तर Catch me if you can .:) तशी एक हिंट दिलीच आहे मी.
तुझी..
गुलाबी कागद निळी शाई
प्रतिक्रिया
शुभेच्छा.
मस्त
सही!! त्याच्या उत्तराच्या
छान !
भारी... मस्त कल्पना आहे...
छान
सर्वांना धन्यवाद!!!
शुभेच्छा
छान
पत्र लेखनाची माझी संवय अजूनही
वाह!
धन्यवाद!!!