मोठा गाजावाजा करत निसर्गाचे वादळ आज सकाळी मुरुडात दाखल झाले, कोकणाचे हाल झाले, मुंबईची नुसतीच हुल उठली पण मुंबईला जाणार्या वादळाची नंतर बातम्यांमधून जी दिशा हरवली ती उशीरा पर्यंत वादळ नेमके कोणत्या दिशेने गेले ते नीटसे कुणाला कळलेच नाही. नाही म्हणायला काही जण नासिक नासिक म्हणत होते कदाचित तिकडे ते पोहोचेलही पण मुरूड आणि नाशिकच्या मध्ये अजून काही आहे की नाही.
चक्रीवादळाने दोनदा सह्याद्री ओलांडून चक्रीचे साध्या वादळात अंशतः शमन झाले तरी वादळी स्थिती वादळी स्थिती असते. वादळाने दिशा बदललीच तर बदललेल्या दिशेकडच्या वाड्या वस्त्यांनाही काही पूर्वसूचना मार्गदर्शन मदत काही हवे की नको?
नाही म्हणायला सोशल मिडीयावर एखाद दुसर्या महाभागांनी वादळाची दिशा बदलून पिंपरी चिंचवडच्या उत्तरेकडून नाशिक कडे पुढे सरकेल अशी शक्यता वर्तवली पण त्याला हवामान खात्याचा दुजोरा नव्हता मी पाहिलेल्या बातम्यांमध्येही कुठे उल्लेख आढळला नाही. संध्याकाळी पाचा का पाऊणे पाचच्या हवामान खात्याच्या वेबसाईटवर दुपारी साडे तीन वाजता ते पुण्यापासून ४५ किमी उत्तर पश्चिमेला अक्षांश रेखांश ही दिलेले पण बातम्यांमध्ये पत्ता नव्हता ते अक्षांश रेखांश गूगल मॅपवर मुळशीच्या पलिकडे आणि लोणावळ्याच्या अलिकडे दिसत होते. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बातम्यांचा पत्ता नव्हता. म्हणजे आधुनिककाळातील माध्यमांच्या प्रभावा खाली वादळ मुंबईकडे चालले म्हणून पुणेकरांनी बिनधास्त रहायचे आणि मध्ययुगिन लोकांप्रमाणे जे काही वारे अनुभवायाचे त्या अनुभवाने पुणेकरांनी ठरवायचे की काय करायचे ! पुणेकर तसे टेकड्यांची कवचकुंडले घेऊन आलेले नशिबवान लोक आहेत आले वादळ गेले वादळ काय फरक पडतो म्हणा. (एखाद्या टेकडीवरील उडाले दोनचार पत्रे किंवा पडली दोनचार झाडे तर पुणेकरांचे आयुष्य तसे थांबत नाही) काही वेळाने पुण्यातील कर्वेरोडावर समुद्र आणि निसर्ग (रेस्टॉरंट) कसे शांत आहेत या बद्दलचे पुणेरी विनोद व्हॉट्स अॅपवर फिरावयास लागले. मोठा गाजावाजा करत निसर्गाचे वादळ आज सकाळी मुरुडात दाखल झाले, कोकणाचे हाल झाले, मुंबईची नुसतीच हुल उठली पण मुंबईला जाणार्या वादळाची नंतर बातम्यांमधून जी दिशा हरवली ती उशीरा पर्यंत वादळ नेमके कोणत्या दिशेने गेले ते नीटसे कुणाला कळलेच नाही. नाही म्हणायला काही जण नासिक नासिक म्हणत होते कदाचित तिकडे ते पोहोचेलही पण मुरूड आणि नाशिकच्या मध्ये अजून काही आहे की नाही.
चक्रीवादळाने दोनदा सह्याद्री ओलांडून चक्रीचे साध्या वादळात अंशतः शमन झाले तरी वादळी स्थिती वादळी स्थिती असते. वादळाने दिशा बदललीच तर बदललेल्या दिशेकडच्या वाड्या वस्त्यांनाही काही पूर्वसूचना मार्गदर्शन मदत काही हवे की नको?
नाही म्हणायला सोशल मिडीयावर एखाद दुसर्या महाभागांनी वादळाची दिशा बदलून पिंपरी चिंचवडच्या उत्तरेकडून नाशिक कडे पुढे सरकेल अशी शक्यता वर्तवली पण त्याला हवामान खात्याचा दुजोरा नव्हता मी पाहिलेल्या बातम्यांमध्येही कुठे उल्लेख आढळला नाही. संध्याकाळी पाचा का पाऊणे पाचच्या हवामान खात्याच्या वेबसाईटवर दुपारी साडे तीन वाजता ते पुण्यापासून ४५ किमी उत्तर पश्चिमेला अक्षांश रेखांश ही दिलेले पण बातम्यांमध्ये पत्ता नव्हता ते अक्षांश रेखांश गूगल मॅपवर मुळशीच्या पलिकडे आणि लोणावळ्याच्या अलिकडे दिसत होते. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बातम्यांचा पत्ता नव्हता. म्हणजे आधुनिककाळातील माध्यमांच्या प्रभावा खाली वादळ मुंबईकडे चालले म्हणून पुणेकरांनी बिनधास्त रहायचे आणि मध्ययुगिन लोकांप्रमाणे जे काही वारे अनुभवायाचे त्या अनुभवाने पुणेकरांनी ठरवायचे की काय करायचे ! पुणेकर तसे टेकड्यांची कवचकुंडले घेऊन आलेले नशिबवान लोक आहेत आले वादळ गेले वादळ काय फरक पडतो म्हणा. (एखाद्या टेकडीवरील उडाले दोनचार पत्रे किंवा पडली दोनचार झाडे तर पुणेकरांचे आयुष्य तसे थांबत नाही) काही वेळाने पुण्यातील कर्वेरोडावर समुद्र आणि निसर्ग (रेस्टॉरंट) कसे शांत आहेत या बद्दलचे पुणेरी विनोद व्हॉट्स अॅपवर फिरावयास लागले. वादळाचा केंद्र बिंदू लोणावळ्याच्या टेकड्या ओलांडून पुढे जाईल का या बद्दल मनात प्रश्न होता रात्री आठ वाजता हवामान खात्याच्या वेबसाईटने केंद्रबिंदूची पोझीशन लोणावळ्याच्या पलिकडे दाखवली एकुण पुणे शहर वारेवावधान आणि पाऊसाने भिजले तरी केंद्रबिंदूच्या कक्षेतून अवघ्या काही अंशाने वाचले असावे. तसे पश्चिम किनार्यास वादळांचा अनुभव कमी त्यामुळे पश्चिम किनारपट्टी जिथे बिनधास्त असते तेथे किनारपट्टीपासून सह्याद्री आणि टेकड्यांची कवचकुंडले ल्यालेल्या पुणेकरांसाठी नळी फुंकली निसर्ग-तंत्र-माध्यमांनी, आले वादळ गेले वादळ!!
* दुसर्या दिवशी म्हणजे ४ जून २०२० ला आलेली त्रोटक वृत्ते
** टाईम्स ऑफ ईंडिया
वाचने
3910
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
Skymet वर
तसे सरकारी कारभार हवामान
In reply to Skymet वर by Rajesh188
हे वादळ रायगडच्या किनार्यावर
केवळ किनाराच नाही वादळाने
In reply to हे वादळ रायगडच्या किनार्यावर by सतिश गावडे
पिम्परी चिंचवड ...