Skip to main content

[कविता' २०२०] - करवली

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 20/05/2020 19:32 या दिवशी प्रकाशित केले.

करवली




सहजंच फिरता फिरता आज पुन्हा तिथे आलो आणि आठवली ती पहिलीच मंद झुळूक मोहरून टाकणारी ते अवखळ चालणं लटकेच हसणं पापण्यांची उघडझाप आणि लगबग पावले त्यातली तारुण्याची नवाई हसणारे ओठ रुसणारे ओठ आणि आत जाई-जुईच्या पाकळ्या हसताना क्षणांत होतात मोकळ्या पण पटकन लपतातही सगळ्या नेसलेल्या साडीचा नवेपणा डोळे कसले, शलाकाच त्या आवाजाचे एक दोन शब्द घर करून बसलेत कानभर वाऱ्यावर झुलणारा भुरभूर कुन्तलभार त्यातल्याच दोन तीन बटा चेहऱ्यावर रुळणार आणि गालावरच्या खळीला स्पर्श त्या करणार तो कर्दळीचा हात त्यावर चंदनाची मेंदी आणि वर पिवळं-धम्मक कंकण इकडून तिकडे बागडणारी करवली तू खरी जिथे जाते तिथे कारंज्यांच्या सरी असतं एखादं पान असं वाटतं पुन्हा पुन्हा उघडावं बकुळीचं फुल जसं सुगंध देत रहावं आणि त्याचा सुगंध घेऊन पुन्हा मिटून ठेवावं


वाचने 12358
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर.. वा किती छान वर्णन.. तो कर्दळीचा हात त्यावर चंदनाची मेंदी आणि वर पिवळं-धम्मक कंकण हे तर अप्रतिम.. खुप आवडले..

पण, अजून उत्तम करता आली असती. सं - दी - प

कल्पना चांगली वाटली. शुभेच्छा

मस्त

असतं एखादं पान असं वाटतं पुन्हा पुन्हा उघडावं बकुळीचं फुल जसं सुगंध देत रहावं आणि त्याचा सुगंध घेऊन पुन्हा मिटून ठेवावं

आहा! काय सुंदर!

इकडून तिकडे बागडणारी करवली तू खरी जिथे जाते तिथे कारंज्यांच्या सरी एका बापाच्या नजरेने वरील ओळी वाचल्या अन डोळे पाणावले.