Skip to main content

[कविता' २०२०] - पथ स्वप्नांचे का

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 10/05/2020 13:14 या दिवशी प्रकाशित केले.

पथ स्वप्नांचे का




पथ स्वप्नांचे का असे मध्येच थिजले दीप त्यावरील का असे मध्येच विझले धडाधडा का कोसळले स्वप्नांचे उत्तुंग मजले दुःखाचे कढ मनोमनी आसवांनी डोळे भिजले तुझ्या पावलांचा आवाज अन चाहुली कीटक बुजले पण तू सोडून देता ठाव अभद्र चाल करण्या धजले चालत रहा म्हणूनच तू होईल जागे नशीब लाजले सार बाजूला महाभयंकर हे वाईटाचे तण माजले चांदण नक्षी पदरावर घेऊनि आकाश सजले रात्रीच्या अंधारात ह्या स्वप्न प्रकाशाचे निजले


वाचने 7010
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

चांदण नक्षी पदरावर घेऊनि आकाश सजले रात्रीच्या अंधारात ह्या स्वप्न प्रकाशाचे निजले +१

+१

सुंदर..

सुरेख रचना

रचना ठीक. पण शेवटच्या ओळीसाठी खास +१. :-)

कविता आवडली

कविता नीटशी कळाली नाही. पुलेशु! सं - दी - प