Skip to main content

[कविता' २०२०] - भेट

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/05/2020 20:54 या दिवशी प्रकाशित केले.

भेट




त्या शरीरी वीज अचपळ कोंडिली होती जरी स्पर्शिले दिव्यत्व तरिही पाय त्याचे भूवरी हिंडला दिक्काल सहजी भासला तो स्थिर जरी दृष्टी व्योमापार त्याची नेत्र मिटलेले जरी माहिती होते जरी की काजवा मी, तो रवि कोणत्या कैफात वेड्या थुंकलो त्याच्यावरी भेट घडता आमुची, मी थिजुनी गेलो क्षणभरी माझिया हातात शस्त्रे... ....कमलदल त्याच्या करी


वाचने 7488
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

+१. कविता वाचायला, म्हणायलाही सुरेख वाटली. माझिया हातात शस्त्रे... ....कमलदल त्याच्या करी ह्या ओळीपण खूप परिणामकारक वाटल्या. सरळ अर्थ छानच आहे पण आणखी वेगळा अर्थ असेल तर तो काय असावा? हा विचार करते आहे.

वीज अचपळ
हे नाही कळले! बाकी उत्तम. +१ संदीप

In reply to by चांदणे संदीप

वीजही अचपळ असावीशी त्या शरीरात कोंडली गेली,हे ते शरीरसामर्थ्य! असा अर्थ अपेक्षित असावासे वाटते! कविता उत्तमच!