वर्क फ्रॉम होम चे अनुभव

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in काथ्याकूट
22 Apr 2020 - 9:52 pm
गाभा: 

सध्या बऱ्याच लोकांचे वर्क फ्रॉम होम चालू आहे माझे पण वर्क फ्रॉम होम चालू आहे माझ्या कंपनीने आम्हाला आमचे डेटा पॅक वापरून काम करायला सांगितले आहे त्यानुसार सर्व आपापले मोबाईल नेट कनेक्ट करून घरून काम करत आहेत मी सध्या reliance jiofi dongle कनेक्ट करून वापरते पण ह्यात नेटवर्क स्पीड ला खूप issues येत आहेत आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स कमी होत आहेत तसेच ऑफिस मधील कामाचा tempo/मूड आणि घरातून ह्यात खूप फरक जाणवतो आहे काही काही ना घरातून चांगले काम करता येते पण ऑफिस मधील वातावरणात जास्त काम होते असे मला वाटते तसेच ऑफिस मध्ये TL समोर TP केला तरी वोर्कलोड नसेल तर चालून जातो पण वर्क फ्रॉम होम ला सारखे लक्ष असते -ह्याबद्दल इत्तरांचे अनुभव वाचायला आवडतील तसेच स्पीड व परफॉर्मन्स कसा सुधारावा ह्याबद्दल कोणी सांगू शकेल काय ? धन्यवाद

अवांतर : इथे माझ्या शेजारील घरातून सारखे खोकण्याचे व शिंकण्याचे आवाज येत असतात माझ्या kitchen ची खिडकी आणि जिना त्यांच्या balcony ला लागून आहे (कसबा पेठेतील लागून असलेली घरे -६ फीट डिस्टन्स जेमतेम असेल पुणेकरांना कळेल )खिडकी मध्येच अडकून बसलीये पूर्ण बंद करता येत नाहीये त्यामुळे फारच टेन्शन येते आहे आणि कामात असताना मध्येच डिस्टर्ब होते आणि चिडचिड होते पण सध्या त्या लोकांना corona नसुदे एवढीच प्रार्थना मी करू शकते

अजून बरेच काही लिहायचे आहे सध्या एवढेच. मिसळपाव वरील लेख आणि शशक वाचून तेवढेच बर वाटते त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा

प्रतिक्रिया

तुम्हाला अवरली रिपोर्ट वगैरे मागतात का..? वर्क फ्रॉम होमला सारखे लक्ष असते म्हणजे नक्की काय..?

Prajakta२१'s picture

23 Apr 2020 - 11:44 pm | Prajakta२१

hourly report magat nahi pan madhunch jage zalyasarkhe konala tari low output varun boltat groupvar.

office madhye jase kam hote tase hot nahiye, adhi wattle hote ki gharun jast chnagle kam hoil pan tase kahi hot nahi
net issues mule ajunch kantala yeto call vagaire kahi nahi
individual work ani individual client ahe, individual client cha load kami asla ki ajun kase tari feel hote karan office madhye dusrya team meber cha load share karta yet hota kahi guidance lagla tar tithe available hota atta tase hot nahiye
tyamule kahi kahi lokanna khup kami kam ani kahi kahinna jast load ase hotey

ani net,power issue astattach

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2020 - 1:12 pm | चौथा कोनाडा

होणार्‍या त्रासाबद्दल समर्पक लिहिलंय !

प्रत्येकाचे "वर्क फ्रॉम होम"चे दुखणे वेगवेगळे आहे.
मित्राला घरून कामासाठी डेस्कटॉप आणण्यासाठी त्याच्या वरिष्ठाने त्याला शहराच्या दुसर्‍या टोकाला पाठवले.
ऐनवळी डेस्कटॉप (विशिष्ट कॉनफुगुरेशनचा) मिळालाच नाही, लॅपटॉप घेऊन यायला लागले.
घरी परत येताना पोलिसांना उत्तरं देता देता त्याच्या नाकी नऊ आले.
नेट स्पीड इश्शू तुमच्या सारखाच आहे.
टास्क पुर्ण करायला दिड पट वेळ लागतोय. कामाचा फॉलोअप जोरदार चालू असतो.
वैतागलाय बिचारा. कधी एकदा ऑफिसला जातोय असे झाले आके त्याला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Apr 2020 - 1:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेजार्‍यांचा त्रास करुन घेऊ नका. काय शिंकरायचं ते शिंकरु द्या, खोकायचं ते खोकू द्या. इतक्या दूरुन तसे काही इफेक्ट होणार नाहीत पण माणूस म्हणून आपण पॅनिक मोडमधे जातोच. खिडकीत एखादा टॉवेल, कपडा लावून टाका. अडथला निर्माण करा. मनात व्यापलेली शंकेची जागा रिलॅक्स होईल. लॉकडाऊनच्या काळात चीड चीडही होतेच. शांत राहणे हाच त्यावर उपाय. तान घेऊन प्रश्न सुटत नाहीत, तर आपणच एक नवा प्रॉब्लेम उभा करतो तेव्हा रिलॅक्स राहावे असे सुचवतो.

-दिलीप बिरुटे

Nitin Palkar's picture

23 Apr 2020 - 1:59 pm | Nitin Palkar

खूपच छान आणि नेटके समुपदेशन!

Prajakta२१'s picture

23 Apr 2020 - 11:35 pm | Prajakta२१

खुप धन्यावाद & शुभेछा

Prajakta२१'s picture

23 Apr 2020 - 11:46 pm | Prajakta२१

खुप खुप धन्यवाद & शुभेछा

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Apr 2020 - 2:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

पहीले १० दिवस बरे गेले. पण नंतर मोठ्या टीम्र बरोबर सतत संपर्कात राहणे कठीण होत आहे. टीम कामात चुका करत आहे आणि क्लायंट ला उत्तरे देउन बेजार झालोय. कामाच्या तासांचा काही हिशोबच राहिलेला नाही. खिडकीतुन सुर्य उगवतो मावळतो तेव्ह्ढेच समजते. कॉल चालु असताना जेवणे खाणे पिणे धुणे चालु राहते. घरच्यांना वेळ देणे वगैरे नाहीच.

वाईट म्हणजे आपल्याला फार काम आहे आणि घरच्यांना काहीच काम नाही, त्यामुळे सारखे सारखे मला फार काम आहे म्हणुही शकत नाही, भडका उडायची शक्यता.
लवकरात लवकर हे दुष्ट्चक्र संपावे हीच ईच्छा

पहिल्या दिवसापासुन असंख्ये कामे सुरु आहेत. दिवस केव्हा सुरु होतो आणि सम्पतो ते कळतच नाहिये. सकाळी ८ वाजता मीटिंग्स सुरु होतात आणि सन्ध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत चालु असतात.

पण नंतर मोठ्या टीम्र बरोबर सतत संपर्कात राहणे कठीण होत आहे. टीम कामात चुका करत आहे आणि क्लायंट ला उत्तरे देउन बेजार झालोय. कामाच्या तासांचा काही हिशोबच राहिलेला नाही. खिडकीतुन सुर्य उगवतो मावळतो तेव्ह्ढेच समजते. कॉल चालु असताना जेवणे खाणे पिणे धुणे चालु राहते. घरच्यांना वेळ देणे वगैरे नाहीच.

हे माझ्या बरोबर पण होतेय ,या कारणांमुळे घरच्यांना वेळ देवु शकत नाही आणि त्यांची चिडचिड होतेय पण त्याला इलाज नाहिये सध्या तरी.
क्लायंटच्या वेळा फिक्स्ड आहेत त्यानंतर ते उपलब्ध नसतात. आम्हाला ती चंगळ नाहिये. ऑफशोर मध्ये राहीलेली कामे इकडे पुर्ण करावी लागतात.

वरील दोन्ही प्रतिसादांशी तंतोतंत सहमत. अगदी शब्दश: असं होतंय अनेक जणांच्या बाबतीत. जवळपास 24x7 कामावर असल्याचा फील.

मी मगची ५ वर्षे हेच कर्तोय.. फरक इतकाच आहे कि मि यावेळेस गावि आहे.

गाव बदलले तरि नशीब बदलत नाही हेच खरे!

सतिश गावडे's picture

23 Apr 2020 - 5:17 pm | सतिश गावडे

वर्क फ्रॉम होमसाठी मोबाईल हॉटस्पॉट, डोंगल वगैरे कामाचे नाहीत, त्यासाठी फायबर ऑप्टिक केबलने घरापर्यंत येणारे ब्रॉडबंड कनेक्शनच हवे. मात्र आता सर्व काही बंद असल्याने असे कनेक्शन घेणे शक्य होणार नाही.

ब्रॉडबंड असूनही इंटरनेट जाणे, लाईट्स जाणे अशा समस्या आहेतच :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Apr 2020 - 7:51 pm | अनिरुद्ध.वैद्य

चांगलं हवं, त्याशिवाय कठीण. त्या मानाने एयरटेल फायबर ऑप्टिक अन जीओ मोबाईल हॉटस्पॉट भागवून नेतंय.

बाकी कामात काही इश्यू नाही, पण सतत संवाद टीम मध्ये ठेवावा लागतोय.

Prajakta२१'s picture

24 Apr 2020 - 9:57 pm | Prajakta२१
Prajakta२१'s picture

24 Apr 2020 - 9:58 pm | Prajakta२१

धन्यवाद

नवीन लेखन प्रकाशित होत नाहीये

Prajakta२१'s picture

24 Apr 2020 - 9:59 pm | Prajakta२१
Prajakta२१'s picture

24 Apr 2020 - 9:59 pm | Prajakta२१
Prajakta२१'s picture

24 Apr 2020 - 10:00 pm | Prajakta२१
राहुल०८'s picture

25 Apr 2020 - 7:21 pm | राहुल०८

We started wfh about 2 mnts now. Earlier we had issues for communication, work distribution, delivery and what not. But now everything on track based on mutual understanding n following below
1. Be clear abt day objectives
Everyday morning, we clearly dish out the work items to be achived that day, that week. Be realistic, keep your margin time. No need to be heroic.
2. Follow up last day items
Report exact status is very crucial. Net problem, power down, machine issue, whatever dam issues just report as it is. You are not working white house to get everything at ur doorstep.
No need to think that my boss will feel bad, group talking something nonsense, etc etc. If we are happy n clear with ourself, why to bother about others.
3. Upfront mentioned ur personal, non reachable time
Employee at home doesnt mean he is at disposable for 24*7. Inform team upfront about ur exact personal time outside office hours so others wont trouble you.
Imagine you are a muslim n you have namaz time, will anyone dare to deviate you.
4. If you have power or net issues, inform ur boss n tell that this time you can make up when power is avaiable or like that.

Some secreat points are
A. Being busy is not so important than showing being busy. Keep some items in pipline when can be pulled out when have no work. So no one can raise finger. Newspaper normally publish some pipeline articles when no real news.
B. Learn something new related to work n keep posting in groups which can be helpful to team so others can notice
C. Try to help struggling team members wherever possible
D. Try to eat less, non spicy, liquid diet, more home excercise and sleep on time greatly helps in home stay.

Prajakta२१'s picture

25 Apr 2020 - 10:43 pm | Prajakta२१

थँक यु

फारच चांगला आणि optimistic प्रतिसाद

चौथा कोनाडा's picture

26 Apr 2020 - 12:02 pm | चौथा कोनाडा

बाबौ, कसलं आवगड !
कुनी तर मर्‍हाटीत सांगा की राव त्ये राहुल०८ काय म्हंतायत ते !

https://www.loksatta.com/desh-videsh-news/2-6-lakh-tcs-employees-will-pe...

ज्यांच्याकडे नेट आणि बाकी सर्व उपलब्धता आहे त्यांना WFH आवडतच असेल कंपन्यांचे कॉस्ट सेविंग होत असेल तर हा पर्याय कायमचा अमलात येऊ शकतो

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2020 - 11:22 am | चौथा कोनाडा

चांगला निर्णय आहे, दीर्घकालीन काय फायदे तोटे होतात याचा वैयक्तिक परिणाम काय होतो हे अभ्यास करण्याजोगे असेल.

Prajakta२१'s picture

29 Apr 2020 - 3:56 pm | Prajakta२१

आमच्या इथे सध्या लोड कमी आहे प्रत्येकाला स्वतंत्र टास्क assign असल्यामुळे आत्ता जेव्हा ज्याचे काम संपेल त्याला ऑफ/हाफडे घ्यायला सांगतात पण असा हाफ डे असेल तर त्याची CL (किंवा बॅलन्स नसेल तर EL) कट करणार आहेत ह्या हाफडे साठी.....

Prajakta२१'s picture

29 Apr 2020 - 9:34 pm | Prajakta२१

१ मे पासून मी आणि अजून दोघांना अर्धवेळ काम करण्यास सांगितले आहे
अमेरिकन कंपनी असल्याने टेन्शन आहे (अन्यत्र कुठे business नाहोए )

तुषार काळभोर's picture

30 Apr 2020 - 7:06 am | तुषार काळभोर

इथं बहुतेक सगळ्यांनी आयटी क्षेत्रातील वर्क फ्रॉम होमचा अनुभव सांगितलाय.
मी उत्पादन क्षेत्रातील कंपनीत आयटी मध्ये आहे. दहा वर्षांपूर्वी आयटी सपोर्ट म्हणून सुरुवात केली होती , आता बिजनेस एप्लिकेशन्स बघतो. (उत्पादन विषयी विष्लेशन करणारी काही सॉफ्टवेअर असतात. ती स्थानिक गरजेनुसार डिप्लॉय करणं आणि त्यानंतर त्याला सपोर्ट करणं, गरजेनुसार बदल करत राहणं इत्यादी.)
आयटी मध्ये तीन लोक असतात. एक मॅनेजर, एक मी अन् एक आयटी इंजिनिअर (जे काम मी आधी करायचो). आमच्या मॅनेजरची ऑक्टोबरच्या शेवटी गच्छंती झाली. तेव्हापासून मी माझं काम + मॅनेजर च काम करत होतो. नवा मॅनेजर पंधरा एप्रिल ला येणार होता, ते आता पाच मे पर्यंत पुढं ढकलला गेलं.
कंपनीच्या आशिया आयटी प्रमुखाने फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच साप्ताहिक विशेष मीटिंग सुरू करून सगळ्या साईट्स ना आणीबाणी साठी तयार व्हायला सांगितलं. म्हणजे क्रिटिकल युजर्स ची यादी बनवणे, त्यातील ज्यांना लॅपटॉप नाही त्यांच्यासाठी स्पेयर लॅपटॉप तयार ठेवणे, घरून काम करण्यासाठी आवश्यक vpn घेऊन ठेवणे, लोकांना त्याची ट्रेनिंग देणे, त्यांना घरून काम करून खात्री करायला सांगणे, लोकांची गरज पाहून त्यांना वेबेक्स अकाऊंट देणे, ज्यांच्या घरी इंटरनेट ची सोय नाही त्यांना कंपनीच्या मोबाईल नंबर वर पुरेसा डेटा असलेला प्लॅन सुरू करून देणे, ज्यांच्याकडे कंपनीच्या सिम ( व्होडाफोन ) ला नेटवर्क चांगले नाही त्यांना एअरटेल 4G Hotspot देणे अशी भरपूर तयारी सुरू झाली.
तेव्हा भारतात काहीच नसल्याने काय उगाच कटकट आहे असं वाटायचं.
एकतर मला माझी स्वतःची कामे असायची, वर मॅनेजर ची कामे, तात्पुरत्या मॅनेजर च्या नात्याने दिवसाला दोन तीन तास कॉल असायचे, वरती ही तयारी सुरू झाली.
दहा मार्च च्या आसपास वातावरण गंभीर व्हायला सुरुवात झाली. क्रिटिकल युजर्स ची यादी (७४) एचार शी शेअर केली होती, त्यांनी ट्रायल म्हणून दहा - पंधरा लोकांना एकावेळी, असं वर्क फ्रॉम होम ची चाचणी सुरू केली.
एकवीस मार्च च्या शनिवारी ऑफिसला गेलो तेव्हा लक्षात आलं, बावीस चा कर्फ्यु तर सिर्फ झांकी है, लॉक डाऊन अभी बाकी है. रविवारी सकाळी एचार ने एक व्हॉटसअप ग्रुप बनवला (एकतर सगळ्या स्टाफ कडे लॅपटॉप नसल्याने मेल अॅक्केस नाही शिवाय कामगारांना कळवणार कसं). त्यात मेसेज आला की सोमवार मंगळवार कंपनी बंद राहील. बुधवारी गुढीपाडवा अन् गुरुवारी कंपनी सुरू होईल. पण मुख्यमंत्र्यांनी ३१ मार्च पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला. मग सोमवारी महाराष्ट्र लॉक डाऊन असून कंपनीत गेलो. तीन क्रिटिकल युजर्स ना लॅपटॉप दिले. (एकाला आधीच दिला होता). एकाला सोमवारी दिला. आणि पेरोल बघणाऱ्या बाईंसाठी तयार केलेला लॅपटॉप एचार च्या ताब्यात दिला आणि सांगितलं कसा पोचवायचा तसा पोचवा.
घरी येताना वाघोलीत असताना सव्वा तीन ला कळलं की पुण्यात साडे तीन पासून गाड्यांवर बंदी घालताहेत. गाडी रेमटावली आणि चार च्या आधी घरी पोचलो. आणि लॉक डाऊन सुरू झाला.

आयटी मॅनेजर नाही. आयटी इंजिनियर कडे कंपनीचा लॅपटॉप नाही. मी आयटी इंजिनियर ची कामे केल्याने मला ती येतात. तात्पर्य लोकांना हवा तो सपोर्ट मी द्यायचा.
पहिले आठ दहा दिवस वीस एक जणांना घरून कसं अॅक्केस करायचं तेच माहिती नव्हतं. मग त्यांना प्रत्येकी एक दीड तास समजावणे.
(डिटेल प्रोसिजर मी एक महिन्यापूर्वी पाठवली होती आणि एक एक आठवड्यानंतर अजून दोनदा आठवण सुद्धा करून दिली होती. पण नाकात पाणी गेल्याशिवाय आपल्याला पोहायला येतं की नाही, हे सुद्धा लोक ट्राय करून बघत नाहीत).
मध्येच एकाचा फोन आला की तो सोलापूर जिल्ह्यात कुठल्याशा गावाला गेलाय आणि त्याच्या एअरटेल 4G (कंपनी ने दिलेलं) ला रेंज येत नाही. मी विचारलं की कंपनीच्या व्होडाफोन सिम ला येत असेल तर त्याला डेटा अॅक्टिवेट करतो. तो म्हणाला नाही, हे खूप आडबाजूला खेडेगाव आहे. इथे फक्त जियो चालतं. इथे एअरटेल चालू नाही करता येणार का?
मी सांगितलं की ते शक्य नाही. ' मग मी काम कसं करू?'
' सर, मला समजतोय प्रॉब्लेम पण त्याच्यावर काही इलाज नाही. '
थोडावेळ असा संवाद होऊन शेवटी माझ्या या उत्तराने मी फोन कट केला.
' सर माझ्या वडिलांनी कंपनी असती तरी मी तुमच्या गावात टॉवर बसवला नसता! '

नंतर त्याने एस्केलेट केला इश्यू. पण माझ्या गेलेल्या मॅनेजर कडून ही चांगली गोष्ट शिकलो होतो. आपलं चुकत नसेल तर सी ई ओ च्या सुद्धा दबावाखाली यायचं नाही. ' मी काही करू शकत नाही. उद्या ते एव्हरेस्ट वर जाऊन बसतील आणि म्हणतील मला कंपनी च काम करायचंय. इथे स्पीड चांगलं मिळत नाही. काही तरी करून दे. मी कुठून टॉवर टाकणार एवरेस्त वर?' यावर मी ठाम राहिलो. शेवटी त्याने शेजाऱ्याच्या जियो च एक्स्ट्रा डेटा टॉप अप केलं आणि त्यावर काम करतोय.
दुसऱ्या दिवशी परत फोन आला. ' अरे, sap सुरू होत नाहीये. '
मला माहिती होतं त्याने vpn कनेक्ट केलेलं नसणार. पण मी मुद्दाम दोन दिवस काहीच केलं नाही. त्याच्या मॅनेजर ने फोन केल्यावर सांगितलं, त्याला vpn वापरायला सांगा, होईल सुरू.
अर्ध्या तासाने त्याचा मेसेज आला ' हाऊ टू कनेक्ट vpn?'
मी त्याच्या अन् माझ्या मॅनेजर ला (आयटी च रिपोर्तिंग फायनान्स हेड ला असतं) सीसी मध्ये ठेऊन आधी पाठवलेले तीन मेल परत फॉरवर्ड केले.

तर वीसेक जण होते असे ज्यांनी घरून काम केलाच नव्हतं आणि त्यांना समजावावं लागलं.

एचार ने एक गुगल शीट शेअर केली होती ज्यात तासाबर हुकुम काय करतोय हे लिहायचं होतं. माझ्याकडे जेण्युईन गोष्टी होत्या त्यात लिहायला ;)

ऑक्टोबर पासून ओवर लोड झाल्याने माझे स्वतःचे तीन चार प्रोजेक्ट पेंडींग होते. एका चेन्नई च्या एक्स्पर्ट ला हाताशी धरून ते पूर्ण केले. उद्या चौथा पूर्ण होईल.

३१ मार्च ला पगार जमा झाल्याचा मेसेज आला. जीव भांड्यात पडला.
यंदाच्या अप्रेजल ला (मी मॅनेजर च काम सहा महिने व्यवस्थित हतळल्याने ) २५% वाढीची अपेक्षा होती. - आमच्याकडे १२-१८ % वाढ ही ठीक ठाक समजली जाते - वाढ होणं लांब राहिलं.......)
गेल्या आठवड्यात बातमी कळली की आठ ते पंचवीस टक्के पगारकपात होईल. < दहा लाख = ८% ; १०-१५ लाख =१२% ; १५-२० लाख =१५%; अशी ४०! लाखा पुढे २५% कपात ठरल्याचं कळलं.
काल मेसेज आलाय. 'एप्रिल मध्ये उत्पादन पूर्ण बंद असल्याने आम्ही सात मे पर्यंत पगार जमा करायचा प्रयत्न करतोय. परिस्थिती अशीच सुरू राहिली तर मे महिन्याच्या पगाराला अजून त्रास होऊ शकतो. तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे '

असो, सोमवार पासून कंपनी सुरू होईल अशी अपेक्षा आहे. मी बस टाळून काही आठवडे तरी गाडीवर जायचा विचार करतोय.
तर अशी ही उत्पादन क्षेत्रातील आयटी ची वर्क फ्रॉम होम ची कहाणी सुफळ चालू-पूर्ण.

Nitin Palkar's picture

4 May 2020 - 8:11 pm | Nitin Palkar

दंडवत घ्या हो, खरोखरच पैलवान आहात. अप्रेजल करता शुभेच्छा.

माझ्या कंपनीची वर्क फ्रोम होम सुविधा नाही. त्यामुळे त्यांची काहीच तयारी नव्हती. त्यामुळे लॉकडाऊन सुरु होईस्तोवर त्यांची काहीच तयारी नव्हती. लोकांनी एचआर कडे चौकशी केल्यावर अतिशय उद्धट उत्तरे मिळाली. त्या विचारायला जाणार्यांच्यात मोठ्या पोस्टवर असणारे कोणीच नव्हते. शेवटी कोणीतरी येवून कंपनी बंद केली. मग आठ दिवस कमी व्हीपीएन असल्याने भयंकर त्रास. टीमकडून कामही करून घ्याप, ऑफिसचा लप्तोप, पीसी काहीही नाही. घरच्या पीसी वर काहीही डौनलोड करायचे नाही. काम मात्र झालेच पाहिजे. जाबेर वर ओनलाईन असायलाच हवे. माझ्याकडे ब्रॉडब्यांड फास्ट तर तूच सर्व अरजंट रीक्वेस्ट पूर्ण कर. वैताग नसता. खूप आहे, लेख होईल पण नकोच ते. आलिया भोगासी असावे सादर.

वर्क फ्रॉम होम म्हणजे भीक नको पण कुत्रं आवर असा प्रकार झालाय

Prajakta२१'s picture

24 May 2020 - 4:16 pm | Prajakta२१

चांगले प्रतिसाद सर्वांचे आभार आणि शुभेच्छा
आमच्या इथे नेट स्पीड आणि पॉवर चे issues कन्सिडर करणार नाहीयेत असे सांगितले आहे
पॉवर चे एक वेळ ठीक आहे ते एक्सटेन्ड करून भरून काढता येते पण नेट स्पीड issue सॉल्व्ह होत नाहीये
त्यामुळे आउटपुट कमी झाले तर ते तसे कन्सिडर करणार नाहीयेत
फारच कठीण झालेय वर्क फ्रॉम होम चे. ज्यांच्याकडे ब्रॉडबँड आहे त्यांचा परफॉर्मन्स आपसूक चांगला होतोय पण ज्यांच्याकडे नाहीये
त्यांचा गंडतोय पण हे कन्सिडर करणार नाहीयेत
नेटमुळे हळूहळूच काम करावे लागते नाहीतर ते जायला लागते तसेच VPN ने स्पीड अजून कमी होतो ,without VPN स्पीड जास्त असतो पण VPN ची सक्ती.
ऑफिस गजबजलेल्या भागात आहे त्यामुळे कधी चालू होईल सांगता येत नाही लोकांचे अंतरानुसार गट केले आहेत माझ्या नेट स्पीड च्या issuemule मी पहिल्या गटात आहे जॉईन करणाऱ्यांत.
बघू आत्ता जसे होईल तसे काहीतरी चांगले होईल अशी आशा करायची

कोणती कंपनी आहे ही..? आणि तुम्ही कोणत्या लेव्हलला काम करत आहात..?

आता असे करा..

१) तुमच्या नेट सर्विस प्रोव्हायडरला एक इमेल लिहा की अमुक अमुक भागात स्पीड मिळत नाहीये. मग ते ढिगाने कारणे सांगतील.. आणि "आंम्ही यावर काम करतो आहे" असे आश्वासन देतील.
२) तो इमेल तुमच्या मॅनेजरला फॉरवर्ड करा, की" माझ्या भागात नेट स्लो आहे आणि इश्यु कंपनीला एस्कलेट केला आहे.. त्यावर ते काम करत आहेत"
३) यावर मॅनेजर थोडा कोंडीत सापडेल आणि सध्या त्याने तुम्हाला टार्गेट केले आहे, ते टार्गेट एका थर्ड पार्टीकडे डायव्हर्ट होईल.
४) ७ दिवसांनी पुन्हा सर्विस प्रोव्हायडरला खरमरीत मेल लिहा.. त्यांना सांगा की "तुमची सर्विस बेक्कार आहे आणि तुमच्या नेटवरून इमेल पाठवण्यापेक्षा कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून पाठवली तर लवकर पोहोचेल" वगैरे.. वगैरे..
५) हा मेल मॅनेजरला उगाचच FYI करून ठेवा - म्हणजे तुमच्याकडे कम्युनिकेशन ट्रॅक तयार होईल.
६) शक्य झाल्यास हा इश्यु टीम कॉलमध्ये डिस्कस करा आणि समदु:खी लोकं शोधा. त्यांच्यासोबत ऑफलाईन बोलून, सर्वांनी मिळून एखादा इमेल मॅनेजरला पाठवा की "आंम्ही सर्वजण नेटचा इश्यु फेस करत आहोत आणि आमच्या सर्विस प्रोव्हाडरला एस्कलेट केले आहे"
७) समजा २० जणांची टीम असेल आणि तुम्ही समदु:खी ७-८ जण असाल तर मॅनेजर एकाच वेळी इतक्या लोकांच्या पायावर पाय देऊ शकणार नाही. म्हणजे थोडेफार कन्सेशन मिळेल.

माझ्यामते; तुमचा प्रॉब्लेम पाहता तुम्ही ऑफिसला जाणे श्रेयस्कर आहे फक्त वरचे सगळे तुम्हाला वर्क फ्रॉम होम दरम्यान परफॉमन्स हिट होऊ नये आणि पे कट होऊ नये म्हणून सुचवत आहे.

Prajakta२१'s picture

24 May 2020 - 5:09 pm | Prajakta२१

धन्यवाद
आपल्या मार्गदर्शनबद्दल आभार आपण सुचवलेलं करून पाहण्याचा प्रयत्न करेन
टीम मध्ये हि बोलून बघेन
आमची मालवाहतुकीशी संबंधित कंपनी आहे (उसगावातली) आणि मी अंतर्गत (मालवाहतुकीच्या भाड्याच्या लेखापरीक्षणाचे) चे काम पाहते (आणि माझ्या टीम मधले)

Prajakta२१'s picture

24 May 2020 - 5:25 pm | Prajakta२१

without VPN सरासरी स्पीड ८३ ms (आत्ता मिपा वर असताना आणि epaper वाचत असताना)
तेच कामाच्या वेळेस विथ VPN स्पीड ३०० ms ते ५०० ms असतो (फक्त कामाचेच app)
TL ला पिंग रिपोर्ट पाठवले कि ते स्पीड issue म्हणणं हात वर करतात
आणि VPN ची सक्ती कदाचित नेट use ट्रॅक करायचा असेल तर
तसेही connectwise कंट्रोल घातले आहे कालच मीटिंग मध्ये सांगत होते मी घरून कोण काय करतेय ते बघू शकतो म्हणून
आत्ता मिपावर कमी वावर
आत्ता reliance जिओ वर जाऊन मेल पाठवला आहे धन्यवाद

तुषार काळभोर's picture

24 May 2020 - 9:18 pm | तुषार काळभोर

८.८.८.८

एअरटेल (सिग्नल स्ट्रेन्थ अंदाजे ८०%) - व्हीपीएनसह -
Approximate round trip times in milli-seconds:
Minimum = 77ms, Maximum = 170ms, Average = 109ms

एअरटेल (सिग्नल स्ट्रेन्थ अंदाजे ८०%)- व्हीपीएनशिवाय
Approximate round trip times in milli-seconds:
Minimum = 40ms, Maximum = 78ms, Average = 58ms

व्होडाफोन (सिग्नल स्ट्रेन्थ अंदाजे ६५%)- व्हीपीएनसह
Approximate round trip times in milli-seconds:
Minimum = 78ms, Maximum = 186ms, Average = 120ms
(पुन्हा पुन्हा टेस्ट करूनही व्होडाफोन व्हीपीएनसह कमी कालावधीचे पिंग रिजल्ट्स देतं)

व्होडाफोन (सिग्नल स्ट्रेन्थ अंदाजे ६५%)- व्हीपीएनशिवाय
Approximate round trip times in milli-seconds:
Minimum = 88ms, Maximum = 197ms, Average = 144ms

तात्पर्य - माझं वैयक्तिक मत असं आहे की ५०% पेक्षा जास्त सिग्नल असेल तर किती जास्त आहे त्याने विशेष फरक पडत नाही. फरक कंपनीच्या डेटा नेटवर्कच्या पर्फॉर्मन्सने पडतो. एअरटेल उत्तम दर्जा (वॉईस + डेटा) पुरवतो. मला अगदी दूरच्या खेड्यापाड्यातील जागा सोडल्या (जिथे मी जाण्याची शक्यता वर्षातून एखाद्या दिवशी काही तासांपुरती असते.) तर एअरटेल ने नेहमीच पुरेसा सिग्नल व चांगला डेटा स्पीड दिलाय. व्होडाफोन तुलनेने कमी आहे. (आयडीया आणि व्होडाफोनने बहुधा नेटवर्क आणि इन्फ्रास्ट्रक्चर आता एकच आहे). मला व्होडाफोन फक्त पहिल्या मजल्यावरील माझ्या खोलीत वापरता येतं. तळमजल्यावरील हॉल आणि इतर खोल्यांमध्ये व्होडाफोन निरुपयोगी (शून्य सिग्नल) असते.