Skip to main content

[शशक' २०२०] - बाबांचं स्वप्न

लेखक ऊर्जा यांनी बुधवार, 22/04/2020 13:24 या दिवशी प्रकाशित केले.

बाबांचं स्वप्न




आई गं! बाबा कुठे गेलेत?, कधी येणार? यांसारख्या असंख्य प्रश्नांनी मी आईला भांबावून सोडायचो. अखेर पाच वर्षांच्या मुलाला कुठे माहीत होतं की, आता बाबा कधी येणारच नाहीत. आईबाबांच स्वप्न मला इंजिनिअर करायचं. त्या स्वप्नासाठी आईने माझ्या शिक्षणात कधी कमी होऊ दिली नाही. शेवटी चांगल्या गुणांनी मी इंजिनिअर झालो. निकाल दाखवण्याच्या घाईने आईला न कळवताच मी घरची वाट पकडली. घरात प्रवेश करणार तितक्यात काका, काकू आणि नारायण शेठचा आवाज कानी पडला. "शरदच्या स्वप्नापायी घरदार विकून टाकलंस, घरात खायला नाही आणि म्हणे पोराला इंजिनिअर बनवणार". मी तितक्यात आईसमोर होतो. माझा निकाल पहिला आणि आईने मला घट्ट मिठी मारली नी ढसाढसा रडू लागली.


वाचने 2956
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

-१. यात स्टोरी कुठे आली तेच समजत नाही.

प्रयत्न आवडला

-१ काहीही &#128520

+1

+१