Skip to main content

[शशक' २०२०] - बिलीव इट ऑर नॉट

लेखक बेंगुताई यांनी सोमवार, 20/04/2020 17:58 या दिवशी प्रकाशित केले.

बिलीव इट ऑर नॉट




गणाचा भुताखेतांवर प्रचंड विश्वास. त्यातच बाजार करून यायला चांगलाच उशीर झाला, त्यातून आडरानावरची वाट. दिसायला धिप्पाड असला तरी भित्री भागुबाईच. सगळीकडे अंधार, रातकिड्यांचा किर्र आवाज. घाबरगुंडी उडून पावलं झपाझप घराकडे पडू लागली. तेवढ्यात पांढऱ्या धोतरातलं अंधुकसं कोणीतरी दिसलं तेवढंच आपलं सोबतीला. "ओ पाव्हणं, कुठं निघालं?" "वाडीवर चाल्लोया आमची भैन राहतिया.". (थोडी विश्रांती) चिंचेच्या झाडाखाली थांबतात. "पाव्हणं तुमाला भुताचा भेव वाटतंय का?" (हसून) "नाय रं का?" बिडी वाऱ्यानं पेटत नाही म्हणून पाव्हणा झाडाच्या पलीकडे जातो. गप्पागप्पात गणा बाजूला बघतो, पाव्हणं नाही?.. अन् गावात पळत सुटतो. गणा गप्प बसला म्हणून पाव्हणा येऊन बघतो तर, गणा नाही. पाव्हण्याचा चांगलाच विश्वास बसलाय आता भूतांवर.....


वाचने 5246
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

+१ सं - दी - प

+१

+१ मस्त. थोडक्यात महत्व्वाचे :)

+१ &#129327

दम दमा दम

+1

+१

+१ आवडली!

+1

+1

+१