Skip to main content

[शशक' २०२०] - धिंगाणा

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 20/04/2020 17:54 या दिवशी प्रकाशित केले.

धिंगाणा




"आय आय गं, उरावर नाचला आज तो.. सोसवत नाही रे देवा आता.." ढेल्या हत्ती. "म्होरचं चाक दिसलं कारे कुणाला? पलंगाखाली अडकून पडलं हुतं..." भलामोठा ट्रक उताणा होत. "खरंतर त्याचा माझा काही संबंध नाही, पण धुतलं राव त्यानं मला आज.. ते पण शाम्पू लावून" मोबाईल शिंकत. "गपा रे भोसडीच्यांनो... हितं माझा रिमोट सापडत नाहिये." भिताडावरचा चिंताग्रस्त टिव्ही. "टिक टॉक टिक टॉक.." भिंतीवरचे घड्याळ. "अबे याला काय झालं आता?" अर्धवट फाटलेलं कलिंगड. "तसं बघितलं तर अजून नऊ तास बाकी आहेत सकाळ व्हायला" शेपूट तुटलेल्या कुत्र्याने कळीचा मुद्दा मांडला. बदकाने त्याच्याकडे अवाक होऊन पाहिलं आणि म्हणालं, "मग नंतर नुसता..?" "धिंगाणा!!!.." सगळे एकसुरात चिरकले.


वाचने 6505
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

+१

+१ लहान बाळाच्या लीला वाटत आहेत.

Toy story

:D

+१

+१

+१

+१

+१

+१