Skip to main content

[शशक' २०२०] - रात्रीस खेळ चाले

लेखक MipaPremiYogesh यांनी रविवार, 19/04/2020 22:56 या दिवशी प्रकाशित केले.

रात्रीस खेळ चाले




वर्षातले काही महिने नेहेमी रात्रीच्या वेळेस अघटीत घडायचे. रात्र जशीजशी चढत जायची तसे हे प्रकार वाढत जायचे. खूप वेगवेगळे आवाज, मारण्याचे आवाज, रक्त असं होऊन त्यांची झोप होत नसायची. एक दिवस त्यांनी जरा खोलीत एक वेगळाच बंदोबस्त केला. सगळ्यांनी लवकर झोपायचं ठरवलं, सगळी दारं, खिडक्या बंद केल्या. झोप पण छान लागली आणि 12 चे ठोके पडू लागले तेंव्हा एकदम त्या घरातल्या पुरुषाला तो तसाच त्रास सुरू झाला. त्याला पहिल्यांदा कळाले नाही असे कसे काय झाले आणि त्याने मोबाइल ची टॉर्च लावून पायाकडे बघितले तेंव्हा लक्षात आले की त्याच्या पायाची बोटं मच्छरदाणीला टेकली होती आणि डासांनी त्यावर बाहेरून हल्लाबोल केला होता.


वाचने 1799
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया