हनुमान जयंती स्पेशल खबांटकी नाईट राईड (सायकल)

सुमोसायकलिंग's picture
सुमोसायकलिंग in भटकंती
17 Apr 2020 - 9:14 pm

२१ एप्रिल २०१९

हनुमान जयंती स्पेशल खबांटकी नाईट राईड..!!

आज ऐनवेळेस नाईट राईडला जायचे ठरवले. तसे पहाटे पहाटे किंवा रात्री उशीरा राईडला जाण्याचा अनुभव होताच. पण रात्रभर राईड करण्याची पहिलीच वेळ. आपण ठरवले की आपण काहीही करु शकतो याचा पुन्हा एकदा प्रचिती आली. सर्वजण सात वाजता रावेत ब्रीज वरून निघणार आहेत.मी उशीरा घरी आल्यामुळे निघायला आठ वाजणार होते. माझ्यासारखेच आणखी दोघे होती, अजित दादा आणि नितीन पानसे. ठरल्याप्रमाणे आम्ही आठ वाजता रावेत ब्रीजला भेटलो. डांगे, भुमकर चौकात ट्रफिक असल्यामुळे पुनावळ्यातुन हाय-वे ने जायचे ठरले.
हाय-वे वरून भुमकर चौक क्राॅस केला की ही भली मोठी चार चाकी गाड्यांची रांग दिसली. अगोदरच आम्ही ऐक तास उशीरा निघालो होतो. त्यात ही भली मोठी गाड्यांची रांग. ह्या ट्रफिक मधून कसातसा आम्ही बाहेर पडालो तसे परत बाणेरच्या पुढे ट्रफिक. असा काही वाटत होता की आज सगळेजण फिरायला बाहेर पडले होते. हीच परिस्थती चांदणी चौकाच्या अलिकडे आणि सिंहगड रोडला पण जाणवली. तरी सुद्धा सायकलचा ताशी वेग २०/२१ ठेवायचा प्रयत्न केला.

इतका वेळ शांत सायकल चालवणारे अजित दादा, रस्ता मोकळा दिसला की लगेच सायकलचा स्पीड वाढवला. मी सुद्धा स्पीड वाढवला होता. नितीन मागे होताच. आता आम्ही कात्रज घाटाच्या पायथ्याशी पोहचालो होतो. दादांनी तर पर्सनल बेस्ट करायचा ठरवला होत. मी पण घाट लवकरच पुर्ण करायचा ठरवला होत. आमच्या पुढे निघालेल्यांना कात्रज घाटच्या बोगद्याजवळ गाठायचे ठरवले होते पण येताना लागलेल्या ट्रफिक मुळे बेत फसला. दादा बोगद्याजवळ पोहचले आणि लगेच ५ मिनीटांत मी पोहचालो. आणि नितीन सुद्धा पाठोपाठ आलाच. दहा वाजले होते.
1

बोगद्याजवळ फोटो शुट झाल्यावर पुढे गेलेल्या टीमला काॅल केला तेव्हा ते जस्ट कापुरहोळला पोहचले होते. आम्ही लगेच सायकलला टांग मारली. बोगदा सोडुन घाट उतरताना मस्त वारा अंगाशी खेळत होता. आता पर्यंत ऐक बाॅटल पाणी संपले होते. विचार केला की रस्त्यात पाणी भरुन घ्यावा लागेल. मॅक डोनाल्डवर पाणी भरुन घेतलं. नितीन बराच वेळ मागे दिसत नव्हता. म्हणून आम्ही थोडावेळ थांबायच ठरवले. तो आला की आम्ही लगेच निघालो. पुढच्या अर्ध्यांतासात आम्ही कापुरहोळला पोहचलो. कापुरहोळला आर्धी टीम होती. आर्धी टीम खंबाटकी सर करायला गेली होती.
2
आम्ही पटकन नास्टा आणि चहा घेऊन खंबाटकीला जवळ करायचा ठरवला. पटकन सायकल घेऊन निघालो. शिरवळ मागे टाकून खंडाळ्याजवळ खंबाटकी पायथ्याशी ताजेतवाने होण्यासाठी थांबा घेतला. तोपर्यंत हळू हळू ऐक ऐक जण पुढे जात होता. मी आणि दादा चिक्की खाऊन पाणी पिऊन निघालो. मी आज दुसऱ्यांदा खंबाटकी घाटावर चढाई करणार होतो. अगोदरपेक्षा कमी वेळात सर ऐवढेच डोक्यात होते. घाटाचा पहिला टप्पा सुद्धा खंबाटकी घाटाचा ट्रेलर आहे. आता अजित दादांना पकडणे कठिण होते. आणि ते घाटात सपासप निघुन गेले. पहिली दोन वळण घेतली चव्हाणांची जोडी दिसली त्यांना बकलअप करून मी पुढे निघालो. आता एकटाच घाट सर करायचा होता. मी हळू हळू सायकल चालवत होतो. ऐक वळण झालं की वाटायच घाट संपला. ३-४ किमी घाटात १५-२० वळण नक्कीच असतील. दत्त मंदिराच्या इथे आलो की हायसे वाटले. ६०-६५ % घाट संपला होता.

आता पटापट सायकल चालवत होतो. घाट संपत आला होता. आणि पुढच्या ५ मिनिटांत घाट संपला. निम्या पेक्षा जास्त जणांनी घाट सर केला होता. ७-८ जण पुढे आशिर्वाद हाॅटेलकडे निघाली होती. इथे गज्जु दादा, शंकर दादा, राकेश पवार, महेश बोराटे, योगेश भोसले, संतोष ठुबे ही मंडळी तसेच काही नवीन सायकलीस्ट भेटले. १० मिनीटांत लगेच उतरायला चालु केला. उतार असल्यामुळे पॅडल मारायची जास्त गरज भासत नव्हती. आजू बाजूला पाण्याखालची शेती असल्यामुळे थंडावा जास्तच जाणवत होता. साधारण १:१५/१:३० वाजता हाॅटेल आशिर्वादला पोहचलो आणि ९५ किमी चा प्रवास झाला होता. तिथे फिरोज भाई, प्रमाेद चिंचवडे, राव साहेब, प्रीती मॅडम, तुषार देशमुख आणखी २-३ जण अगोदरच पोहचले होते.

3
रात्री दिड वाजता आमच्यासाठी सुरेख जेवण तयार होते. चपाती, बटाटा भाजी, जिरा राईस, दाल तडका आणि सलाडसह. तुषार लोया, गज्जु दादा आणि आशिर्वाद हाॅटेलच्या मॅनेजमेंटचे फार फार आभार. पटकन जेवण करुन १० मिनीट आराम करे पर्यंत सर्वजण आले होते. सगळ्याचे जेवण झाल्यावर ग्रुप फोटो घेतला.

5
सर्वजण आनंदी होते हे फार महत्त्वाचे. अगदी ठरलेल्या वेळा प्रमाणे सगळं मिळून येत होत. २ वाजता परतीचा प्रवास सुरू करायचा होता तो १५-२० मिनीटे उशीराने सुरू झाला.२०० किमी पुर्ण करायचे होते म्हणून ५ किमी पुढे जायचे ठरवले. मी, अजित दादा निघालो, पाठोपाठ प्रमोद, नकुल, प्रीती मॅडम, आणखी दोघे निघाले. बाकी सर्वजण पुण्याच्या दिशेने रवाना झाली. नेहमीप्रमाणे दादा आमच्या पुढे निघुन गेले. मी, प्रमोद, नकुल १०० किमी झाले की परतीचा प्रवास चालु केला. अजित दादांना काॅल करून सांगितले की आम्ही परत फिरलो मग तेही परत फिरले.

आता फक्त पॅडल मारायचे होते. मी, प्रमोद, नकुल ऐकमेकांसमोर सायकल चालवत होतो. कितीही प्रयत्न केला तरी सायकल २०च्या पुढे स्पीड घेत नव्हती. प्रमाेद साहेबांनी मला मधेच विचारले किती किमी झाले? मी म्हणालो आशिर्वाद सोडून २० किमी. मला परत ३०मिनीटांनी तोच प्रश्न परत विचारला, आणि मी सांगितला आपण गेल्या आर्ध्या तासात ७ किमी पुढे आलो. नकुलने सुद्धा तेच सांगितला. म्हणजे आमचा स्पीड १४-१५ च्या पुढे नव्हता. २-५ मिनीटांचा क्विक ब्रेक घेतला. दादा पण तिथे लगेच पोहचले. आता टार्गेट होते साडे सातच्या आत घरात. ४/४:१५ सर्वजण ऐका ठिकाणी थांबले होते. आम्ही क्विक स्टॅाप घेतला.

मी आणि दादा पिण्याचे पाणी भरुन साडे सातच्या आत घरात पोहचायच्या उद्देशाने पटकन निघालो. आता परत दादा आणि मी. फक्त आणि फक्त पॅडलिंग. दादा परत सपासप पुढे जात होते, माझे डोळे फक्त त्याच्यावर नजर ठेऊन होते आणि पाय पॅडलिंग करत होते. आता सायकलचा स्पीड वाढला होता. साधारण ६ वाजता कात्रज बोगद्याजवळ पोहचलो. क्विक ब्रेक घेऊन पाणी पिऊन आम्ही निघालो. चांदणी चौकात पाच दहा मिनीटे रिलॅक्स झालो. आतापर्यंतचा प्रवास १८० किमी झाला होता. दादा आणि मी भुमकर चौकातून न जाता मुकाई चौकातून जायचे ठरवले. चांदणी चौक ते मुकाई हे अंतर ३५-४०-४५ च्या वेगाने कापले. ७:३०ला रावेत ब्रीजजवळ पोहचलो. ७:३० आणि २०० किमी दोन्ही टार्गेट पुर्ण झाला.

36
Total Time : 11hrs:45mins
Saddle Time : 8hrs:50mins
Total Kms Covered : 200kms
Ghats Completed in this ride : Katraj and Khabatki with PRs.

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

17 Apr 2020 - 9:45 pm | प्रशांत

खूपच छान, ओघवते लेखन..!

मी पुण्यात नसल्याने या राईड ला येवु शकलो नाहि. :(

इतका वेळ शांत सायकल चालवणारे अजित दादा, रस्ता मोकळा दिसला की लगेच सायकलचा स्पीड वाढवला

चुकिच्या माणसासोबत राईड करत होता तुम्हि, यांना मोकळा रस्ता दिसला कि चढ दिसला रे दिसला केडन्स वाढतो आणि काहि मिनिटात दिसेनासे होतात.
एक मात्र चांगल कि पुढे जाऊन थांबतात आणि आपण पोहचलो कि चिक्कि देतात वरुन कौतुक ... ग्रेट ग्रेट मस्त पॅच मारला तुम्हि आपण काहि बोलण्यापेक्षा चिक्कि कडे लक्ष द्यावे

प्रचेतस's picture

18 Apr 2020 - 6:45 pm | प्रचेतस

मी पुण्यात नसल्याने या राईड ला येवु शकलो नाहि. :(

तेच म्हटलं, फोटोत आणि वर्णनात प्रशांत दिसलाच नाही, असं कसं होईल.

बाकी लेख मस्त. फिरत राहा, लिहीत राहा.

मी पाचवीत असताना छोट्या सायकलवर इतर मुलींबरोबर खंबाटकी घाट पूर्ण चढले. मात्र त्याच ब्रेक नीट नसलेल्या जवळपास अजिबात लागत नसलेल्या सायकलने तो पूर्ण घाट उतरले होते. तेव्हा खंबाटकी बोगदा नव्हता. रस्त्यावर दोन्ही साईडने ट्रॅफिक असायचे. आज आठवले कि अंगावर काटा येतो. लहानपणी माणूस आजिबात विचार न करता कितीही मोठे साहस करतो.

अजित पाटील's picture

20 Apr 2020 - 7:03 am | अजित पाटील

खुप छान असा अनुभव आला होता या सायकल प्रवासात !!
लॉक डोवन संपले की करू आशा एक भन्नाट सायकल ट्रिप ची

Nitin Palkar's picture

3 May 2020 - 8:04 pm | Nitin Palkar

अतिशय सुंदर वर्णन. पुढील सायकल स्वारीसाठी सर्वांना शुभेच्छा.