Skip to main content

[शशक' २०२०] - तानाजी आन नाथाजी

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 17/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.

तानाजी आन नाथाजी




भोळा व्हता तान्या. निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं. तरीबी, रानात सरळसोट पाळ्या न्हाय घातल्या, आठ दिसांत जोंधळ्यात बैलजोडी लपली न्हाय, म्हातारीची नीट ऊठबस केली न्हाय, आसलं कायबी बागायतदार त्येला बोलणं लावी. म्हातारी तर त्येचा जीव घाईकुतीला आनी. सारक गुडघं चोळ, डोस्क दाब, खुब्याला त्याल लाव. म्हातारी जेवायबी उठू दीना गरीबाला. मंग त्यो काम सोडून घरला गेलाच. घरला लहान्या नाथाने सारं आईकलं. तडक गेला बागायतदाराकडं काम मागाय. बागायतदारानी आदुगर म्हातारीच्याच शेवेत लावला त्येला. एक पारबी झाला नसल. नाथाजी बागायतदाराकडं आला. "मालक, आईसायेब बोलाना झाल्याती. दुसरं कायतर काम सांगा." बागायतदार चमाकला. लगोलग उठून म्हातारीच्या छपरात गेला. म्हातारी त्वांड वासून पडल्याली!


वाचने 9849
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

+१

+१

नाळ मधला एक सीन आठवला.

+१

बापरे

+१

+१

+१

+१

+१ बदला घेतलाच शेवटी! -गा.पै.

+१

आवडली पैजारबुवा,

+१

+१

.

.

+१ सं - दी - प

+१

+१

+१ आवडली!

+1

+१