Skip to main content

[शशक' २०२०] - आजी

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 16/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.

आजी




“आजोबा, मला आजी का नाही?” सिनियर केजीमधल्या चिंटूने विचारलं. त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नावर मी चमकलोच,” का रे? “ “साहिलची आजी किती मस्त आहे ! मलापण अशी एक आजी पाहिजे .” मी गप्पच झालो. मला अमिताची आठवण आली . आमचं लव्हमॅरेज. पण पुढे बिनसतच गेलं. मी सावरण्याचा खूप प्रयत्न केला .पण नाही! तिने पुढे दुसरं लग्न केलं. मी तसाच राहिलो .तिच्या आठवणींमध्ये झुरत . अन आता चिंटूला आजी पाहिजे म्हणून, पुन्हा दुसरं लग्न करायचं?... संध्याकाळी चिंटूची आई आली. त्याला तिचा मोबाईल खेळायला मिळाला. मध्येच त्याने मला मोबाईल दिला व एका आनंदी कुटुंबाचा फोटो दाखवला . मोठा करून पाहिला अन काळजातच कळ आली . साहिलची आजी म्हणजे अमिता होती !


वाचने 7045
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

+ १

मस्त

+१

+१

+१

+१

नो नो इट्स अॅक्च्युअली गुड!

+१

+१

+१ आवडली!

+1