पॅनडेमिक

एकामुळे चार आणि चार नंतर सोळाला बाधित करणाऱ्या त्या महामारीच्या पोस्ट कडे बघत त्याचा तिळपापड होत होता. संसर्ग किती भयंकर आहे याची तो कल्पना करत होता. आधीच घरात बसून ऑफिसचे काम, भांडे घासून आणि मुलांसोबत खेळून मेटाकुटीला आला होता. हे प्रकरण एका झटक्यात संपवावे असं मनोमन तीव्र इच्छा करत संताप सुरु होता, पण बोलू शकत नव्हता. हि वाढत जाणारी साखळी कोणी तोडत सुद्धा नाही, याची चिडचिड सुरु होती. आता तर संसर्ग आपल्या घरात पोचला आहे. बायकोने अजून काही मैत्रिणींना सुद्धा संसर्गित केले होते, हे विचार सुरु असतांनाच -
"अहो, नुसतेच काय बघत आहात त्या पोस्टला, लाईक करा लवकर माझ्या साडी चॅलेंजला !"

वाचने
5677
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to मस्त ! by धर्मराजमुटके
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.
साडी चॅलेंन्ज आणि महामारी
+१
+१
+1
+१
+1
+1
+१
+१