बदामी चिकन कबाब

Primary tabs

केडी's picture
केडी in पाककृती
15 Apr 2020 - 8:34 am

1

ही पाककृती लॉक डाउन वाली नाही हे आधीच स्पष्ट करतो. खरं तर ही मी जुलै, २०१८ साली केलेली, पण का कोणास ठाऊक टाकायची राहून गेली. सध्या चिकन मिळतंय, बोनलेस मिळाले तर घरी मिक्सर मधून काढून बनवू शकता खिमा. आयता खिमा मिळाला तर उत्तम.

ह्यात सध्याच्या काळात जर काही गोष्ट मिळणे अवघड असेल तर ते म्हणजे कच्ची पपई! मला तेव्हा मित्राने बागेतली दिलेली, पण ते असेल तर हे कबाब अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतात, अगदी गलौती कबाब सारखे, त्यामुळे शक्य असेल तर जरूर वापरावे.

जास्ती खोलात न जाता, पपई मध्ये असलेले पापेन हे एंझाईम चिकन/प्रोटीन ला मऊ बनवते। (बाजारात मीट टेंडेरायझर पावडरी मिळतात, त्या असतील तर त्या वापरा).

ही पाककृती पुन्हा रणजीत राय ह्यांच्या तंदूर पुस्तकातून...

साहित्य
५०० ग्राम चिकनचा खिमा
१ कप बदाम रात्रभर भिजत घालून, सोलून, बारीक पेस्ट
२ मोठे चमचे कच्च्या पपईची पेस्ट
१ चमचा गरम मसाला
१ चमचा लाल तिखट
२ चमचे वेलदोडे पूड
२ मोठे चमचे तूप
१/४ कप कॉर्नफ्लार
चवीनुसार मीठ

कृती
चिकन च्या खिम्याला पपई, लाल तिखट आणि २ चमचे तूप लावून किमान १ तास मुरत ठेवावे. बदाम पेस्ट, गरम मसाला, वेलदोडे पूड, कॉर्नफ्लार आणि चवीनुसार मीठ घालून अजून ४ तास मिश्रण मुरत ठेवावे।

गोळे करून, त्याचे चपटे छोटे छोटे कबाब करावेत। तव्यावर किंवा ग्रील पॅन गरम करून त्यावर तुपात किंवा तेलात शॅलो फ्राय करावेत।
गरमागरम कबाब पुदिना चटणी सोबत मस्त लागतात

2

(मूळ पाककृतीत, हे मिश्रण सळई, किंवा स्कुव्हर्स वर लावून त्याचे सीख कबाब करा असे आहे, त्याला वेळ लागतो आणि तसे कबाब कोळशावर जास्ती छान भाजले जातात म्हणून मी असे केले. आपण केलेल्या कबाब ना कोळशाची धुरी दिली तर ते अजून छान लागतील).

3

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

15 Apr 2020 - 8:51 am | जेम्स वांड

सकाळ सकाळ कलीजा खल्लास काम झालं हे !

चांदणे संदीप's picture

15 Apr 2020 - 7:36 pm | चांदणे संदीप

ह्या लॉकडाऊनमध्ये जीव जाणार चिकनच्या आठवणीमुळे आणि ह्या असल्या फोटूमुळे!

सं - दी - प

सौंदाळा's picture

15 Apr 2020 - 7:47 pm | सौंदाळा

हेच म्हणतो
चिकन जाऊ दे हो केडी भाऊ ते दुधी भोपळा नाहीतर दोडक्याची वेगळी रेसिपी द्या, सतत खाऊन वैतागलोय, इकडे दुसऱ्या भाज्या मिळेना झाल्यात

नवीन पनीर ची टाकली आहे, ती बघा, पालक कोफ्ता ऐवजी दुधी भोपळा आतून कोरून त्यात स्टेफिंग भरून करता येईल

वामन देशमुख's picture

17 Apr 2020 - 9:50 am | वामन देशमुख

केडींच्या रेसिपीज् पाहून मी पामर, "खूप छान" याशिवाय दुसरं काय लिहिणार? इमेजेस् पाहून तर फारच न्यूनगंड येतो राव.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2020 - 6:22 pm | अत्रुप्त आत्मा

इमेज-फोटू-डॉन केडीबाबा की Ssss जय!

मदनबाण's picture

18 Apr 2020 - 7:54 pm | मदनबाण

पाकृ चे सुंदर फोटो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aithey Aa... :- Bharat