निळाई......

किल्लेदार's picture
किल्लेदार in भटकंती
3 Apr 2020 - 2:05 am


निळाई......

टोरोंटो च्या उत्तर-पश्चिमेस साधारण अडीचशे किमी वर ब्रूस पेनिन्सुला (द्वीपकल्प) आहे. द्वीपकल्प म्हणजे पाण्यात घुसलेला जमिनीचा सुळका. "लेक हुरॉन" या प्रचंड सरोवरात घुसलेल्या या निमुळत्या सुळक्याच्या टोकावर, टोबरमोरी हे अतिशय सुबक आणि आटोपशीर असे लहानसे गाव आहे. आजवर टोबरमोरीला जायचा तीन वेळा योग आला. सुदैवाने तीनही वेळा वेग-वेगळ्या ऋतूत बदलत जाणारी इथली निळाई डोळे भरून बघता आली.

Capture

दहा वर्षांपूर्वी टोबरमोरीला प्रथम आलो तेव्हा उन्हाळा होता. कॅनडासारख्या थंड देशात उन्हाळा इतका प्रखर असू शकतो याची कधी कल्पनाही केली नव्हती. लेक हुरॉन च्या काठाकाठाने हिंडून दमलो तेव्हा कुठलीही तमा न बाळगता या मोरपंखी-निळ्या रंगाच्या पाण्यात सरळ तोंड बुडवून घटाघटा पाणी प्यालो आणि तृप्त झालो.

IMG_2213

IMG_1941

IMG_2512

IMG_2043

फ्लॉवरपॉट आयलंड
IMG_2379

IMG_2328
t-3195

t-3266

दुसऱ्या खेपेस टोबरमोरीचे वेगळेच रूप बघायला मिळाले. इथल्या पावसाने न भूतो ना भविष्यती असे झोडपून काढले की विचारता सोय नाही. तरीही दुसऱ्या बाजूस निसर्गाचे विराटपर्व दाखवून मी कायम या जागेचा ऋणी राहीन अशीही सोय करून ठेवली.

t-3111

t-3124

t-3113

t-3131-1

ऐन थंडीत ही जागा एखाद्या "घोस्ट टाऊन" सारखी असते. सभोवति फक्त पांढरा आणि निळा रंग. हाडं गोठवणारी थंडी आणि सर्वत्र सामसूम. पण हा सुद्धा एक वेगळा आणि सुखद अनुभव असतो.

20200222_144643 - Copy

20200222_151637 - Copy

20200222_153814

थंडीच्या या कडाक्यात रेस्टॉरंट्स उघडी नसली तरी कॅनडातले माझे सर्वात आवडते शॉपिंग सेन्टर LCBO, म्हणजेच (लिकर कंट्रोल बोर्ड ऑफ ऑंटेरियो) हे मात्र नेहमीच "वॉर्म वेलकम" करते.

20200222_144631 - Copy

प्रतिक्रिया

सोन्या बागलाणकर's picture

3 Apr 2020 - 5:41 am | सोन्या बागलाणकर

अहाहा... पु लंच्या निळाईनंतर तुमची निळाई वाचून आणि चित्रे बघून मजा आली.
t-3131-1 चित्र तर अंगावर काटा आणणारं खासच.
कॅनडा माझ्या खास आवडीचा देश, अजून येऊ द्या प्रवासवर्णनं या सर्वांगसुंदर देशाची.

अतिशय सुंदर वर्णन व फोटो!! मलाही पुलंची निळाई आठवली.

सरनौबत's picture

3 Apr 2020 - 11:52 am | सरनौबत

खूप सुंदर. मोजकंच पण मस्त लिखाण आणि जीवघेणे फोटो

चौकस२१२'s picture

3 Apr 2020 - 12:00 pm | चौकस२१२

मस्त.. तुमच्या फ्लिकर वरील छायाचित्रांना काही तरी नाव द्या जरूर म्हणजे कुठचे ते कळेल ( कारगिल वगैरे काही काळात आहेत पण बाकीचे)

चौथा कोनाडा's picture

3 Apr 2020 - 12:09 pm | चौथा कोनाडा

व्वा, जबरदस्त !
निळाई पाहून डोळे निवले.
लॉकडाऊनचा दहावा दिवस सार्थकी लागला !

दुर्गविहारी's picture

3 Apr 2020 - 2:38 pm | दुर्गविहारी

केवळ अप्रतिम !

गोंधळी's picture

3 Apr 2020 - 3:19 pm | गोंधळी

सगळेच फोटो सुंदर आहेत. मस्त.

किल्लेदार's picture

3 Apr 2020 - 5:39 pm | किल्लेदार

@सोन्या बागलाणकर - पुलंची निळाई जास्त गडद आहे ;)

@पलाश - धन्यवाद

@सरनौबत - आभारी आहे

@चौकस२१२ - अरे हो की. फोटोंना नाव द्यायला विसरूनच गेलो.

@चौथा कोनाडा - माझा पण. खूप दिवसांनी थोडंसच का होईना पण लिहिलं. छान वाटलं.

@ दुर्गविहारी - :)

@गोंधळी - थँक्स

अमोल तुरखडे's picture

3 Apr 2020 - 8:12 pm | अमोल तुरखडे

अप्रतिम !!!

विदुला's picture

3 Apr 2020 - 9:26 pm | विदुला

अतिशय सुंदर फोटो.

चौकटराजा's picture

3 Apr 2020 - 10:09 pm | चौकटराजा

किल्लीदार हे नाव पाहूनच धाग्यावर आलो. अपेक्षेप्रमाणे फोटो अचाट आहेत. ! इतके निळे आकाश फिल्टर मुळे की तेथील अम्बियंन्स मुळे ?

किल्लेदार's picture

4 Apr 2020 - 12:53 am | किल्लेदार

@अमोल तुरखडे - धन्यवाद मित्रा

@विदुला - थँक्स. काही दिवस इथेच वास्तव्यास आहे. कोरोना एपिसोड संपला की नक्की भेटू.

@चौकटराजा - इथली निळाई वेगळीच आहे. आपल्या पॅंगॉन्ग तळ्यासारखी. फक्त फरक असा की हे पाणी अतिशय मधुर आहे आणि आपल्या पॅंगॉन्ग चे खारे.

राघव's picture

4 Apr 2020 - 6:56 pm | राघव

भरून पावलो.. _/\_ :-)

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

6 Apr 2020 - 7:34 pm | सौ मृदुला धनंजय...

जबरदस्त फोटो आहेत.डोळ्यांचे पारणे फिटले

कोरोना एपिसोड संपला की नक्कीच टोरोंटो मिपाकर कट्टा करू.

कंजूस's picture

7 Apr 2020 - 6:07 am | कंजूस

फार सुंदर. तिनही ऋतुंची चित्रे आवडली.

प्रचेतस's picture

7 Apr 2020 - 6:24 am | प्रचेतस

व्वा..!.
डोळे निवले.

बिपीन सुरेश सांगळे's picture

7 Apr 2020 - 9:36 am | बिपीन सुरेश सांगळे

ये निळाई भी क्या है निळाई
बाहोमें लेती सारी खुदाई

मस्त मस्त

किल्लेदार's picture

8 Apr 2020 - 2:31 am | किल्लेदार

@ राघव - मी पण भरून पावलो

@ सौ मृदुला धनंजय - धन्यवाद

@ विदुला - नक्की करू कट्टा. टोबरमोरीलाच करायचा का ;) ?

@ कंजूस - फोटोत तीनही चांगलेच वाटतात. पावसात धांदल उडते

@ प्रचेतस - :)

@ बिपीन सुरेश सांगळे - खुदा ने अपने लिये यही पे जन्नत सजाई !!! ;)

अनिंद्य's picture

14 Apr 2020 - 8:52 pm | अनिंद्य

बढिया !

किल्लेदार's picture

19 Apr 2020 - 3:59 am | किल्लेदार

:)