फळांचा नाश्ता

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
1 Apr 2020 - 8:39 am

फळांचा नाश्ता ,
सकाळी जर मसालेदार आणि तेलकट नाश्ता कार्याचा नसेल आणि अगदीच अळणी पण खायचे नसेल तर हा नाश्ता करून बघा
- चुरा:
रोल्ड ओट भाजून घ्या त्यात पाहिजे तर बदाम / अक्रोड यांचा भरडा चुरा पण भाजा ( काजू नको)
भाजून गार करण्याआधी थोडीशी गुळी साखर घालावी आणि दालचिनी ची पूड
-फळे:
पीच , प्लम, पेअर सफरचंद ,माध्यम आकाराचे चिरून घ्या
( केळं घालता येईल पण ते इतर फळांची चव मारू शकते )
यातील पीच / प्लम पेअर चांगले पिकलेलं असतील तर त्यांना रस सुटेल )
वाडग्यात आधी वरील चुरा ठेवून मग टाय प्रथम रस सुटणारी फळे टाका आणि मग सफरचंद
वरती योगर्ट ( साधे, गोड वाले नाही आणि क्रीम / साय पण नको ) घाला ( योगर्ट आणि दही यात नक्की काय फरक आहे हे कोणी तान्या सांगू शकेल काय?)
IMG_7472[1]

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

1 Apr 2020 - 8:55 am | चौकस२१२

सँडविच स्पर्धा!
यात मोजायला गेलं तर हजारो पाकृ बनविता येतील... आणि सँडविच हे फक्त सपाट चौकोनी पावाचेच असते असे नाही तर अनेक वेगवेगळे पाव/ पावसदृश्य बेगल्स इत्यादी गोष्टींपासून पण बनवता येते..( तुर्किश पाव वैगरे )
तर चला मिपाकर पुढील दोन दिवस वेगवेगळे सँडविच च्या पाकृची मिपावर मांदियाळी करा....( फोटू पाहिजेतच पण)

माझे २ सुरवातीला
१)उरलेली तांबड्या भोपळ्याची भाजी चे
२) बिट आणि अवाकाडो चे
दोन्हीत ताजी दळलेली काळी मिरी
IMG_7474[1]
IMG_7473[1]

कंजूस's picture

1 Apr 2020 - 9:59 am | कंजूस

चांगली आहे शेफगिरी.

चौकस२१२'s picture

1 Apr 2020 - 10:15 am | चौकस२१२

"तुका म्हणे त्यातल्या त्यात "

चौकस२१२'s picture

1 Apr 2020 - 10:18 am | चौकस२१२

" जन्मोजन्मांतरीचे नाते " म्हणजे सफरचंद आणि दालचिनी यांचे .... तुनळीवर अनेक उदाहरण सापडतील