उल्लेखनीय प्रथा
लेखनविषय (Tags)
गेल्या आठवड्यात एका मित्राच्या मुलाच्या विवाह समारंभात गेलो होतो. नेहमी सारखाच मराठमोळा समारंभ. दोन उल्लेखनीय बाबी आढळल्या.
हॉल मध्ये शिरताना, प्रवेशद्वारापाशी सर्व पाहुण्यांना एक कागदी पिशवी दिली जात होती. ज्या मध्ये बीज गोळ्या (seed balls) होत्या. सीड बॉल म्हणजे उपयुक्त झाडांच्या बिया शेणखत, अथवा तत्सम खातात लपेटून त्याचा तिळगुळा एवढा, थोडासा मोठा केलेला लाडू. आशा प्रकारे त्या बिया सहज रुजू शकतात. यजमान सर्व पाहुण्यांना या बिया शक्य तिथे लावण्याची विनंती करत होते.
दुसरी बाब म्हणजे लग्न लागताना बोहल्यावरील नातेवाईकांव्यतिरिक्त इतरांना मंगलाक्षता दिल्या नव्हत्या ज्या योगे तांदळाची होणारी नासाडी टाळली होती. मंगलाष्टके संपल्यावर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून वधू वरांचे अभिष्टचिंतन केले.
दोन्ही बाबी उल्लेखनीय वाटल्याने मुद्दाम लिहिले आहे.
प्रतिक्रिया
छान उपक्रम.
स्तुत्य
फळांच्या सुद्धा
खूपच छान!