✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऋतुराज वसंताचे आगमन

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Tue, 03/03/2020 - 22:01  ·  लेख
लेख
ऋतुराज वसंताचे आगमन चैत्राचं वर्णन करणारी आणि चैत्र महिन्यापासून सुरू होणा-या वसंत ऋतूचं गुणगान अनेक पदं आपल्या मराठीत आहेत. गाण्यांमधून आलेलं वसंत ऋतूचं वर्णनही तितकंच बहारदार आहे. मग ते गीतरामायणातलं गीत असो किंवा एखादं नाट्यपद असो. भारतीय संगीताशी आपल्या महिने, ऋतु यांचं असलेलं जवळचं नातंच प्रत्येक गाण्यातून अधोरेखित होत जातं. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला राम जन्मला गं सखे, राम जन्मला गदिमाचे अजरामर काव्य.. प्रती वाल्मीकी च ते अन बाबुजी चे स्वर्गीय संगीत..क्या बात है........ सोने पे सुहागा. आहा ....आला वसंत देहि ..मज ठावुकेच नाहि या गाण्यात निसर्गात होणाऱ्या बदलांचा, विशेषत: चैत्रात फुलणाऱ्या पालवीने स्त्रीमन कसं भारावून जातं आणि वसंत ऋतू तिच्या देहातही कसा फुलू लागलो याचं यथार्थ वर्णन या गाण्यात आलंय. महिने आणि ऋतू यांचा भारतीय संगीताशी किती जवळचा संबंध आहे. याचंच आणखी एक उदाहरण म्हणजे बसंत बहार रागातील गाणी. 'राग बसंत' आणि 'राग बहार' यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या बसंत बहार रागातील अनेक गाणी आजही श्रोत्यांच्या ओठांवर आहेत. मग ते, 'केतकी गुलाब जुही चंपक बन फूले' हे हिंदी गीत असो अथवा 'मंदारमाला' नाटकात पं. राम मराठे आणि प्रसाद सावकार या जोडगोळीच्या बहारदार गायकीने अजरामर केलेलं 'बसंत की बहार आयी' हे सदाबहार नाट्यपद असो. ही गाणी मनाला आजही सुखावतात. व्हा तयार ..स्वागतास ऋतुराज वसंताच्या आगमनास .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
1493 वाचन

💬 प्रतिसाद

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा