राधाकृष्ण प्रणय प्रितीचे गीत

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
3 Mar 2020 - 12:17 pm

कामाने कृष्णाची तपस्या
भंग करण्यासाठी
राधेस पाठवले पण
कृष्णाच्या तपस्येच्या
अनुभूतीने राधाच
तपस्वी झाली
सोडवण्यास गेलेला
कामही तपस्वी होऊन
कृष्णराधेच्या प्रणय
तपस्येस शरण गेला
राधाकृष्ण प्रणय प्रितीचे
गीत गाऊ लागला

अदभूतमुक्तक

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

3 Mar 2020 - 6:57 pm | प्राची अश्विनी

आवडली.

माहितगार's picture

4 Mar 2020 - 12:52 pm | माहितगार

__/\__ प्रेर्ना स्थान आपलेच काव्य, तेव्हा प्रेर्नास्रोतातूनच मिळणार्‍या पावतीचे मोठे मुल्य असते, त्यासाठी अनेक आभार