✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गावाकडच्या गोष्टी 1

प
प्रमोद पानसे यांनी
Tue, 02/11/2020 - 22:35  ·  लेख
लेख
गावाकडल्या गोष्टी 1 लहानपणी म्हणजे तिसरी चौथीत असताना पतंग नव्हती उडवता येत.पण कटलेल्या पतंगी पकडण्याचा आणी मांजा गोळा करण्याचा भयंकर सोस होता. एखादी पतंग पकडली की मी तीचा मांजा वितावर आठ्या घालुन घरी आणायचा .आणी काकाच्या आसारीला तो गुंडाळायचा.माझ्या काकाला पतंग उडवायचा नाद होता.पण त्याच्या आसारीला असलेला सगळा मांजा मीच आणलेला असायचा.त्याबदल्यात निलकमल थिएटरात बच्चनचे सिनेमे बघायला मिळायाचे.काकाची वट होती तीथे.दर शुक्रवारी मला न्यायचा . एकदा घराच्या वर्हंड्यावर असलेल्या पत्र्यावर उतरुन जांभळात अडकलेली पतंग सोडायच्या प्रयत्नात गंजलेला पत्रा फाटुन दहा फुटावरुन वर्हांड्यात ढुंगणावर आपटलेलं आठवतय . गंजलेला पत्रा बरगड्यांना घासलेल्या आणी शर्ट फाटलेल्या अवस्थेत आम्ही दारासमोर फतकल घालुन आजोबांच्या शिव्या खाल्ल्या होत्या.आणी तसंच डॉक्टर कडे जाउन धनुर्वाताचं इंजक्शन भोसकुन घेतलं होतं. मांज्याचे गुंते सोडवता सोडवता आयुष्यातले गुंते कधी सोडवायला शिकलो समजलंच नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
2615 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

माझा धाकटा भाऊ पतंग छान

कंजूस
Wed, 02/12/2020 - 09:58 नवीन
माझा धाकटा भाऊ पतंग छान उडवायचा, मी पतंग बनवायचो. पूर्वी केबलचे जाळे, गच्चीतल्या अंटेना आणि ओवरहेड वायर्स मुंबईत नव्हते. पतंग अडकायचे नाहीत.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा