महाराष्ट्रात घडलेल्या कि घडवलेल्या योगायोगाने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महा विकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. त्यांचे समर्थक सर्व उत्सव एकत्रित आनंदाने साजरे करत आहेत. भारतीय राज्यघटनेच्या शपथांचाही उत्सव चालू आहे.
काळा प्रमाणे एका मागोगाग उत्सव येताहेत तशी १४ फेब्रुवारी २०२० ही व्हॅलेंटाईन डेची तारीख फक्त दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्हीत आधीची आणि नवी पिढी एकत्रपणे नांदण्याचा प्रयत्न करते आहे. चांगले दृष्ट लागू नये म्हणून महत्वाच्या व्हॅलेंटाईन डे बद्दल भूमिकेवरून ऐनवेळी त्यांच्यात आणि त्यांच्या समर्थकात संभ्रम नको म्हणून या मिपा चर्चेचे (भाजपेतरांसाठी) प्रयोजन.
भाजपायी व्हॅलेंटाईनडे चे समर्थक पुर्वी नसावेत त्यांच्या नव्या पिढीचा दृष्टीकोण माहित नाही पण या धागाचर्चेपुरते त्यांनी तटस्थता पाळावी अथवा स्वतःसाठी वेगळा धागा काढावा उगाचच मोठ्या प्रेमाने एकत्र आलेल्या महाविकास आघाडी समर्थकांच्या प्रेमालापास दृष्ट लावू नये:) महाराष्ट्रात व्हॅलेंटाईन डे साजरा करू इच्छितांना तुर्तास महा विकास आघाडी काय म्हणेल शिवसेना सरकार व्हॅलेंटाईन डे वर निर्बंध घालेल की भारतीय राज्यघटनेस जागून मोकळीक देईल आणि दिली तर किती ? म्हणजे महा विकास आघाडीतील समर्थकांनी आपापसात व्हॅलेंटाईन डेच्या प्रेममय शुभेच्छा दिल्या तर चालतील का ? कि व्हॅलेंटाईन डे टाळून केवळ इतर दिवशी तेवढ्याच द्याव्यात ?
सध्या हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे, सध्या सर्वचजण राज्यघटनेचे मनापासून शपथ घेत आहेत. आणि राज्यघटनेची शी शपथ शिवसैनिकही घेतील या अटीवरच सोनीया गांधी सरकारात सामिल झाल्या असे म्हणतात.
तसे पहाता भारतीय राज्यघटना बाळासाहेब ठाकरें आणि राजीव गांधींच्या काळापासून लवचिकच आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने भारतीय राज्य घटनेस स्मरूनच व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला होता असे ऐकुन आहे, राजीव गांधींनीसुद्धा भारतीय राज्य घटनेस स्मरून सेंसॉरशीपचे काही दरवाजे घट्ट करणारे काही कायदे आणलेच (त्या बद्दल सोनीया गांधींचे मत काय होते ते कुणास ठाऊक असल्यास नक्कीच सांगावे - राजीव गांधी आणि सोनीया गांधी व्हॅलेंटाईन डे साजरा करत कि नाही हे गूगल आम्हा आस्मादिकांना तत्काळ सांगण्यास अपयशी झाल्याने अभ्यासू काँग्रेस प्रेमीं याची माहिती देऊन काँग्रेस प्रेम व्यक्त करतील असा विश्वास हो विश्वासच आहे) तर असो आता त्यांच्या नव्या पिढ्या म्हणजे राहुल गांधी सुप्रिया सुळे अजित पवार आदित्य ठाकरे यांच्या व्हॅलेंटाईन डे साजरा करु अथवा न करु देण्याच्या भुमिका १४ फेब्रुवारी २०२० साठी काय असतील म्हणजे येता व्हँलेंटाईन आठवडा त्यांनी आपापसात आणि बाहेर आणि त्यांच्या समर्थकांनी नेमका कसा साजरा करावा अथवा न करावा?
त्या शिवाया आझादी उद्घोषकांनी व्हॅलेंटाईन डेपासून आझादी असा उद्घोष करावा की व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आझादी असा उद्घोष करावा ? आझादीचा उद्घोष करणार्या महिलांना व्हॅलेंटाईन डेच्या निमीत्ताने कुणी कुणी गुलाबी सदिच्छा दिल्या तर चालण्यासारखे असेल म्हणजे त्यांना अशा गुलाबी सदिच्छांपासून आझादी पाहीजे असल्यास गुलाबी सदिच्छा देण्याची आझादी हवी असलेल्यांनी त्यांचा प्रश्न कसा सोडवावा ? खास करून आझादीच्या उद्घोषक महिलांना आझादीच्या उद्घोषणा न करणार्यांनी गुलाबी सदिच्छा देण्याच्या आझादीचे नेमके काय करावे ? असे विवीधांगी प्रश्न महा विकास आघाडी त्यांचे सरकार पोलीस दले समर्थक आणि त्यांचे आझादी उद्घोषक यांच्या समोर १४ फेब्रुवारी २०२० च्या निमीत्ताने उपस्थित होतील ऐनवेळी अरे आता कसे करू म्हणण्या पेक्षा आपले मिपा व्यासपिठ आणि त्यावरील हा चर्चा धागा आहेच.
तेव्हा सांगा मंडळी तुम्हाला काय वाटते ते ? चर्चेसाठी काही किमान प्रश्न वर दिलेच आहेत काही अजून जोडतो आणि तुम्हीही काही जोडा आणि प्रश्नांची उत्तरेही जोडा.
१) भारतीय राज्यघटनेचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या स्वातंत्र्याचे प्रेमी युगूलांनी प्रेम करण्याच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले असते की साजरा न करण्याच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले असते ?
२) असे स्वातंत्र्य आझादी उद्घोषक महिलांना आणि त्यांना गुलाबी शुभेच्छा देऊ इच्छिणार्यांना असावे का ? अशा शुभेच्छा देताना काय करणे आणि काय न करणे प्रासंगिक आणि योग्य असू शकते ?
३) उद्धवजींच्या नेतृत्वाखालील महा आघाडी सरकारची आणि त्यांच्या अखत्यारीतील सरकारी निमसरकारी तसेच विद्यापिठे आणि कुलगुरुंची व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या आझादीबाबत काय भूमिका असावी ? त्यानी व्हॅलेंटाईन डेवरची बंधने वाढवावीत ? नरो वा कुंजरो वा करावे ? बंधने कमी करावीत ? जबाबदारी न्याय संस्थेच्या खांद्यावर ढकलावी ?
४) शिवसेना सरकार व्हॅलेंटाईन डे वर निर्बंध घालेल की भारतीय राज्यघटनेस जागून मोकळीक देईल आणि दिली तर किती ? म्हणजे महा विकास आघाडीतील समर्थकांनी आपापसात व्हॅलेंटाईन डेच्या प्रेममय शुभेच्छा दिल्या तर चालतील का ? कि व्हॅलेंटाईन डे टाळून केवळ इतर दिवशी तेवढ्याच द्याव्यात ?
५) राजीव गांधी आणि सोनीया गांधी व्हॅलेंटाईन डे साजरा करत असत का ? असतील तर कसा ?
६) राहुल गांधींना एका व्हॅलेंटाईन डेला ६८ वर्षीय महिलेने चुंबन भेट दिली अशी भेट इतर कोणी कोणी द्यावी अथवा देऊ नये ? खास करून त्यांच्या आझादी गँग महिलांची आणि केरळीय काँस्टीट्यूअन्सीची भूमिका काय असावी असे तुम्हाला वाटते ?
७) त्यांच्या नव्या पिढ्या म्हणजे राहुल गांधी सुप्रिया सुळे अजित पवार आदित्य ठाकरे यांच्या व्हॅलेंटाईन डे साजरा करु अथवा न करु देण्याच्या भुमिका १४ फेब्रुवारी २०२० साठी काय असतील म्हणजे येता व्हँलेंटाईन आठवडा त्यांनी आपापसात आणि बाहेर आणि त्यांच्या समर्थकांनी नेमका कसा साजरा करावा अथवा न करावा?
*आधी वर म्हटल्या प्रमाणे भाजपायींनी चर्चा हाणून पाडण्याची कृती टाळण्यासाठी आभार
* अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा, व्याकरण शुद्धलेखनादी चर्चा आणि विषयांतरे व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी अनेक आभार
मिसळपाव
आत्याबाईंना मिशा असत्या तर ?
In reply to आत्याबाईंना मिशा असत्या तर ? by कपिलमुनी
ये कांदा हमारा नही म्हणून रस्त्याच्या कडेने ?
In reply to ये कांदा हमारा नही म्हणून रस्त्याच्या कडेने ? by माहितगार
संपादकांना विनंती
खंदून बघा
In reply to खंदून बघा by कपिलमुनी
प्रश्न क्रमांक २ आणि ६?
In reply to प्रश्न क्रमांक २ आणि ६? by माहितगार
उत्तर
In reply to उत्तर by कपिलमुनी
हे कसले उत्तर ? भाजपेतरांत हिम्मत नाही ? हे ! आणि आझादी देणार?
कोणत्या वॅलेंटिने डे
In reply to कोणत्या वॅलेंटिने डे by चौकस२१२
हे गणित भाजपायींच्या लक्षात आले असते तर काश!
२ / ६
In reply to २ / ६ by चौकस२१२
शुभेच्छा' शब्दातच इच्छा आणि त्यासाठीचे वर्तन शुभ हे गृहीत