पनीर स्ट्फ्ड ब्रुसेल स्प्राउट्स
सध्या नाताळाचा हंगाम असल्याकारणाने इकडे बाजारात वेगळाच उत्साह दिसतोय, वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरु आहे.
नाताळ हा ख्रिस्ति लोकांचा मोठा सण, या दिवशी कुटूंबातील सर्व लोक एकत्र येतात, प्रार्थना करतात व एकत्र जेवण करतात. माझा ब्रिटिश सहकारी मला सांगत होता की येथील लोक सहसा रोज स्वयंपाक करत नाहीत तर तयार पदार्थ खातात मात्र नाताळच्या दिवशी हमखास सर्व जेवण घरीच बनवतात.
या जेवणामध्ये उकड्लेल्या भाज्यांसोबत ब्रुसेल्स स्प्राउट्सचा समावेश असतोच असतो.
ब्रुसेल्स स्प्राउट्स साधारणतः कोबीवंशीय भाजी आहे. दिसायला अगदी चिमुकल्या कोबीसारखीच, आत मद्धे अगदी छोटे पापुद्रे, चव म्हणाल तर थोडी शेंगदाणे मिश्र पत्ताकोबी सारखी. भरपुर जीवनसत्व व फायबर असणारी भाजी.
या वेळेस बाजारात ब्रुसेल्स स्प्राउट्स मुबलक उपलब्ध असल्यामुळे साहजीक खरेदी झाली व त्याबरोबर विचार केला की थोड्या वेगळ्या पद्धतीने पाकक्रुती करुया.
चला मग कृती कडे वळूया.
साहीत्य.
- ब्रुसेल स्प्राऊट्स साधारण पाव कीलो.
- परतण्यासाठी तेल.
- चिमुटभर हिंग
सारणासाठी-
- १ वाटी पनीर किसुन घेतलेले.
- चमचाभर आमचुर पावडर
- लाल तिखट.
- हळद
- मिठ
ग्रेव्हीसाठी -
- १ मोठा कान्दा
- १ मोठा टोमॅटो
- आल्याचा तुकडा
- लसुण, हिरवी मिरची.
- लाल तिखट.
- हळद
- मिठ
- गरम मसाला,मोहरी,जिरेमो
- चमचाभर साखर.
कृती:
आगोदर सारण तयार करुन घ्या.
किसलेले पनीर, आमचुर पावडर, लाल तिखट, चिमुटभर हळद व चमचाभर मिठ एकत्र करुन बाजुला ठेवुन द्या.
ब्रुसेल्स स्प्राऊट्स आधी स्वच्छ धुवुन घ्या व कापडाने पुसुन घ्या, वरचा पापुद्रा काढून घ्या.
काळजीपुर्वक स्प्राऊट्चे चार भागात चिरा करुन घ्या जेणेकरुन सारण देठापर्यंत व्यवस्थित बसेल.
कापलेल्या भागात पनीरचे सारण घट्ट दाबुन भरा.
एका पसरट पॅन मध्ये परतण्यापुरते थोडे तेल गरम करुन घ्या, चिमुट्भर हिंग टाका व सगळे स्प्राऊट्स काळजी पुर्वक तपकीरी होईपर्यन्त परतुन घ्या.
टिपः हे परतलेले स्प्राऊट्स स्टार्टर म्हणून देखिल छान लागतात.
आता ग्रेव्ही कडे वळूया.
कांदा,टोमॅटो अगदी बारीक वाटून घ्या व नंतर आले,लसूण व हिरवी मिरची पण वाटून घ्या.
एका कढईमध्ये तेल तापले की मोहरी,जिरे तडतडून घ्या, नंतर आले,लसूण व हिरवी मिरची पेस्ट टाका व परतुन घ्या. थोड्या वेळाने बारीक वाटलेले कांदा,टोमॅटो टाकुन परता. मिश्रणाला थोडे तेल सुटायला आले की मग स्प्राऊट्स टाका व काळजीपुर्वक ढवळा. वरुन थोडा गरम मसाला व मिठ टाका व साधारणतः ४ ते ५ मिनिटे झाकण ठेवा. चिमुट्भर साखर घाला व परत एकदा काळजीपुर्वक ढवळा.
गरमागरम पनीर स्टफ्ड ब्रुसेल्स स्प्राऊट्स तयार.
वाचने
9283
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
फोटोज कदाचित दिसत नाहीत म्हणुन परत एकदा डकवतोय.
मस्त ...
In reply to मस्त ... by मुक्त विहारि
धन्यवाद मुवि..
In reply to धन्यवाद मुवि.. by यश राज
पण. ..
In reply to पण. .. by मुक्त विहारि
नक्कीच
In reply to नक्कीच by यश राज
पनीर खूप खाल्ले आहे. ..
In reply to मस्त ... by मुक्त विहारि
मुवि,तुम्ही कोबी लावा आणि ते
मस्त पाकृ
In reply to मस्त पाकृ by श्वेता२४
धन्यवाद
नविनच भाजी समजली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaitan Ka Saala... :- Housefull 4छान.