चार पाच प्लेट भाजी खरेदी

Primary tabs

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
9 Oct 2019 - 4:36 am
गाभा: 

(हे या रेसेपीचे पुरस्कर्ते आहेत.)

२०२० पर्यंत भाज्यांचे बरेच नॉर्म्स बदलणार आहेत, बिगर तेलाच्या भाज्या येणार आहेत तर आता भाजी घेणे किती सयुक्तिक आहे? रोज फारतर २५० किलोग्राम भाजी खरेदी करू शकते तर उकडलेली, तळलेली किंवा भाजलेली ह्यापैकी कशाने बनलेली भाजी सयुक्तिक आहे? अर्थात महिन्याभरात फारतर एखादे दुसरी भाजी महाराष्ट्रातील होवू शकते. शिवाय मंदीमुळे खरेच भाज्या जास्त किमतीला मिळत आहेत का किंवा त्यांच्या किमती अजून वाढतील का? नवीन नॉर्म्समुळे शिळ्या भाज्या आता घेणे फायद्यात ठरू शकते का? सद्या स्विगी उबेर इट्स हा पर्याय आहेच पण त्यांच्यासाठी वाट पाहणे आणि ते ऐनवेळेला दर वाढवतात. त्याहीपेक्षा ते वेळेवर येत नाहीत. त्यामुळे ते मागवणे अवघड आहे. तसेही बाहेरील भाज्या शौक म्हणून नाही तर गरज म्हणूनच मागवायच्या आहेत. पोटाचे दुखणे भयंकर वाढल्याने चार पाच प्लेट भाजी घ्यावी असा विचार आहे. खरोखर चार पाच प्लेट्सने सहा सात प्लेट्सच्या तुलनेत पोटाचे दुखणे थोडे सुसह्य होवू शकते का? शिवाय पैशाचा विचार करता शिळी भाजीच घ्यावी की ताजी?

(वाचक भाज्यांऐवजी भजीही घेवू शकतात. सामग्री वरीलप्रमाणेच वापरावी लागेल. तिखट मिठ चवीप्रमाणे लावावे. वरतून कोथंबीर पेरल्यास दुसर्‍या वाचकाच्या तोंडाला पाणी सुटू शकते.)

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

9 Oct 2019 - 2:29 pm | जालिम लोशन

खल्लास

नरेश माने's picture

9 Oct 2019 - 2:56 pm | नरेश माने

रोज फारतर २५० किलोग्राम भाजी खरेदी करू शकते.... >>>>> खरं की काय? २५० किलोग्राम गावजेवण असते का रोज?

आनन्दा's picture

9 Oct 2019 - 5:56 pm | आनन्दा

ग्रामभोजन म्हणा!

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Oct 2019 - 2:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

रोज २५० किलोग्राम भाजी? एका माणसाला?
पैजारबुवा,

जॉनविक्क's picture

9 Oct 2019 - 4:45 pm | जॉनविक्क

पेटसफा , कायमचूर्ण वगैरे देखील घेणं आपणास आवश्यक आहे असे वाटते

पाषाणभेद's picture

9 Oct 2019 - 5:53 pm | पाषाणभेद

ग्राम असे कृपया वाचावे.

बाप्पू's picture

9 Oct 2019 - 7:01 pm | बाप्पू

हसून हसून मेलो...
मस्त विडंबन... !!!!