✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दोन नको देऊ...

र
राजे १०७ यांनी
Fri, 09/27/2019 - 20:59  ·  लेख
लेख
लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे ही. सदुबा नावाचा माणूस असतो. कलाबाई त्याची बायको. दोघं मस्त जगत असतात. एक दिवस सदुबा मित्राला जेवायला बोलवायचं ठरवतात. सदुबाचा मित्र गणपा खूप सज्जन माणूस होता. वेळप्रसंगी सदुबा आणि कलाबाईला कामा पडायचा. एक दिवस सदुबानं दोन मासे आणून कलाबाईकडं दिले व मस्त आमटी, भाकरी, भात बनवायला सांगितले. जेवायला गणपा येणार आहे हेही सांगितले. कलाबाईनं मस्त जेवण रांधलं. माशाचं कालवण म्हटल्यावर तिला मन आवरेना. थोडं वाढून घेतलं आणि भाकरी सोबत खाल्लं. अजून थोडे घेतलं, अजून थोडे.. असे करता करता सगळं कालवण संपवलं. नंतर नवऱ्याला काय सांगावे याची चिंता तिला पडली. सदुबा घरी आला, कलाबाईला सैपाक झाला की नाही हे विचारले. ती म्हणाली सुरीला धारच नाही. मासे कसे कापणार? सदुबाकडे सुरी दिली. सदुबा सुरी घेऊन मागील दारी धार लावायला गेला. तेवढ्यात गणपा पुढच्या दारी आला. कलाबाई त्याला म्हणाली, भाऊजी जेवण बिवण काही नाही. हे ना तुमचे कान कापून घेणार आहेत. त्यांनी नवस केला होता देवाला माणसाचे कान वाहीन म्हणून. ते पहा चाकूला धार लावत आहे. गणपानं पाहिलं तर खरंच सदुबा चाकूला धार लावत होता. ते पाहून गणपा घाबरून पळाला. इकडे कलाबाई नवऱ्याला म्हणाली. अहो, अहो तुमचा मित्र मासे घेऊन पळाला . धावा, पकडा. सदुबा तसाच चाकू हातात घेऊन गणपाच्या मागं लागला. धावता धावता अरे दोन नको देऊ एक तरी दे असा आवाज देऊ लागला. इकडं गणपाला वाटलं दोन नको एक तरी कान दे असं म्हणतोय सदुबा. गणपा अजून जोराने धावत सुटला. संपली माझी गोष्ट. ( कृपया गंमत म्हणून वाचावी.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
3121 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

मस्तच. ...

मुक्त विहारि
Sun, 09/29/2019 - 18:24 नवीन
छान आहे ही कूटकथा....
  • Log in or register to post comments

धन्यवाद मुक्त विहारी भाऊ.

राजे १०७
Sun, 09/29/2019 - 19:23 नवीन
धन्यवाद मुक्त विहारी भाऊ.
  • Log in or register to post comments

इरावती ची आठवण झाली

जॉनविक्क
Sun, 09/29/2019 - 19:25 नवीन
आन आकुंची सुद्धा तुम्हाला फार मोठा पल्ला गाठायचाय अजून, लिवते रवो क्लिमिश बौ
  • Log in or register to post comments

शेंबड्या जॉन तुला फक्त

राजे १०७
Sun, 09/29/2019 - 19:57 नवीन
शेंबड्या जॉन तुला फक्त कुत्सित प्रतिसाद देता येतात काय? नाकाचा शेंबूड पुसून घे पहिला.
  • Log in or register to post comments

प्रत्येकाच्या नाकात शेंबूड हा असतोच

जॉनविक्क
Mon, 09/30/2019 - 13:26 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजे १०७

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा