लंबी रेस का घोडा
कोणातरी टीव्ही अॅंकरने आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेनेचा राहुल गांधी’ असा केला. ती तसे बोलली तेव्हा समोरचा मायक्रोफोन सुरू असल्याचे तिच्या लक्षात आले नसावे. त्यामुळे त्या वक्तव्याचा व्हिडिओ विनाविलंब व्हायरल झाला. तिच्या या वक्तव्याबद्दल व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये नापसंती वा संताप दिसतो. पण त्याचे कारण अनाकलनीय वाटते. ‘ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा... लिखके रख लीजिये’ असे या अॅंकरचे ‘आॅफ दि माईक’ वाक्य स्पष्ट एेकू येते. तिच्या या वाक्यामुळे काहीजण अस्वस्थदेखील झाले असून त्या वाहिनीने ताबडतोब खुलासा करावा, असे काहींनी म्हटले आहे. ‘या अॅंकरला घरचा रस्ता दाखवावा’ असेही काहींना वाटते.
माझा मुद्दा वेगळाच आहे.
आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे भावी राहुल गांधी आहेत ही त्या अॅंकरची ‘भविष्यवाणी’ ऐकून संताप येणे हा राहुल गांधींचा घोर अपमान आहे. या महिलेने आदित्य ठाकरेंविषयी आदर दाखविला असून राहुल गांधींनी ज्या कणखरपणाने एकहाती पक्षाची कमान सांभाळली, तो कणखर बाणा आदित्य ठाकरेंच्या अंगी तिला दिसला असावा, असे मानण्यास वाव आहे. ‘राहुल गांघी’ हे नाव बदनाम आहे असा ज्यांचा समज आहे, त्यांनाच या अॅंकरच्या वाक्यामुळे राग आला यात शंका नाही. राहुल गांधी हे काॅंग्रेसचे भविष्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच काॅंग्रेस पुन्हा उभारी घेईल असा दृढ विश्वास असलेला मोठा वर्ग राजकारणात आहे, आणि त्यापैकी अनेकांची राजकीय कारकिर्द राहुलजींच्या वयाएवढी प्रदीर्घ राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काही बिगरकाॅंग्रेसी नेत्यांनीही राहुल गांधींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली होती. ‘एकदा त्यांना संधी देऊन पहायला काय हरकत आहे?’ असे तर एकदा खुद्द राज ठाकरेही म्हणाले होते. राहुलजींच्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या वक्तृत्वाची, हजरजबाबीपणाची छाप पडल्याने भारावून गेलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ त्या काळात किती व्हायरल झाले होते ते आठवा. त्याच काळात राहुलजींनी देश विदेशात संवाद साधून भावी भारताचे आपले स्वप्न जगासमोर मांडले होते, तेही आठवा.
आज काॅंग्रेस हा एक पराभूत पक्ष आहे,आणि कदाचित त्यामुळेच राहुल गांधी हे नाव बदनाम झाले आहे. म्हणूनच, आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेनेचा राहुल गांधी’ असा केला गेलेला अनेकांना रुचलेला दिसत नाही. ज्यांनी त्याबद्दल जाहीरपणे नापसंती, संताप व्यक्त केला आहे, त्यांनी राहुल गांधींचा अपमान केला आहे असे मला वाटते.
आदित्य ठाकरेंचा ‘भावी राहुल गांधी’ म्हणून आदित्य ठाकरेंचा सन्मान करण्याचाही त्या महिलेचा उद्देश असू शकतो. कारण, आदित्य आणि राहुल हे दोघेही, राजकारणातील ‘लंबी रेस का घोडा’ आहेत.
‘आपली भविष्यवाणी लिहून ठेवा’ असेही ती अॅंकर महिला म्हणाली आहे. ते खरे होते का ते भावी काळ ठरवेलच, पण या वाक्यतून तिने आदित्य ठाकरेंचा अपमान केला असा समज करून घेणे योग्य नाही.
याद्या
5794
प्रतिक्रिया
9
वर्गीकरण
मिसळपाव
हा हा.. पण मला आदित्य ठाकरे
बहुशतकी प्रतिसाद
तुम्ही या प्रतिसादातच भरपूर
In reply to बहुशतकी प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
तेच की!
हा तौलनिक पडताळणी लेख
लयीच काडीबाज लेख हाये. छोटा
ही घ्या घोड्याची लंबी रेस
In reply to लयीच काडीबाज लेख हाये. छोटा by उपेक्षित
लंबी रेस का----
लंबी रेस का घोडा