Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by तमराज किल्विष on गुरुवार, 09/05/2019 - 20:57
लेखनविषय (Tags)
व्यक्तिचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
माझ्या लहानपणी ही गोष्ट माझा आजा मला रोजच सांगायचा. बाबा म्हणजे माझा आजा विड्या वळायचं काम करायचा. बाबा विड्या वळत असायचा, अन् कोठूनही माझी स्वारी आली की लगेच " बाबा गोष्ट सांग" ऑर्डर सुटायची. बाबा म्हणायचा. " थांब, सांगतो." मी " नाही, आता लगेच सांग". मग बाबाची गोष्ट सुरू व्हायची. एक होती म्हातारी. ती चालली कुपाटी कुपाटीना. तिला सापडले दोन पैसे. दोन पैशाचं तिनं दूध आणलं. ते ठेवलं तापायला. ते गेलं उतू. म्हातारी गेली उतरायला. हाताला आले तीन फोड. फोड फुटले. एकात निघली सकू. एकात निघली बकू. एकात निघला डिंगऱ्या. सकू पाणी आनती का? मी नाही आनीत जा. बकू पाणी आनते का? मी नाही आनीत जा. डिंगऱ्या पाणी आनतो का? आनतो आनतो. डिंगऱ्या माझा कामाचा. शाळेत जातो नेमाचा. "बाबा, अजून सांग" बाबा म्हणायचा " तुजं पोट भरणार नाही, सांगतो." एक होता राजा. त्याच्या डोक्यावर सात बाजा. तोच तुजा आजा. "बाबा आजून सांग". एक होता सांगू. एक होता नकोसांगू. सांगू चढला झाडावर. मंग खाली कोण राहीला? मी " नकोसांगू" बाबा " मंग नही सांगत. " "बाबा अरिंग मिरिंग". मग बाबा आणि मी दोन्ही पाय एकमेकांच्या पायाला जूळवायचो. मग बाबा बोटाने एक शब्द बोलत एका पायावर बोट ठेवत खेळ चालू करायचा. अरिंग मिरिंग लवंगा तिरिंग लवंगातीरचा डुबडुब बाजा गाई गोपाळ उतरला राजा. असे शेवटचं बोट ज्या पायावर थांबे. तो पाय मागे घ्यायचा. हा खेळ झाला की, आपडी थापडी... "आपडी थापडी गुळाची लापडी. तेलणीच्या तीन पुऱ्या. चाकूत्याचं एक पान. धर गं बेबी हाच कान. " मग कान धरून " च्याव म्याव पिताळाचं पाणी प्याव" हे करायला खूप मजा येई. मधीच लहर आली की, "बाबा, कुकुचिकू!" मग बाबाच्या पायावर बसायचं. बाबा पाठीवर झोपून पाय हवेत वर खाली करी व तोंडानं म्हणे. " कुकुचिकू, कुकुचिकू. राजाची लेक माझ्या बाळाची बायकू." मला इतका आनंद व्हायचा. माझा आनंद पाहून बाबाला डबल टिबल आनंद व्हायचा. दुर्दैवाने मी तिसरी चौथीत असतानाच बाबा वारला. आमच्याकडे कुणाकडेच त्याचा फोटो नाही. चुलत्यांना, आत्यांना विचारलं पण कुणाकडंच नाहीय. अंधूक सा फोटो मनात मात्र आहे. आणि बाबाच्या गोष्टी आठवत राहतात. बाबा मी तुला फार फार मिस करतो रे.
  • Log in or register to post comments
  • 7947 views

प्रतिक्रिया

Submitted by कंजूस on गुरुवार, 09/05/2019 - 21:14

Permalink

मज्जाच होती की रे.

मज्जाच होती की रे.
  • Log in or register to post comments

Submitted by तमराज किल्विष on गुरुवार, 09/05/2019 - 21:20

Permalink

हो ना. खूप खूप मजा होती .

हो ना. खूप खूप मजा होती . बालपणीचा काळ सुखाचा!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 09/05/2019 - 21:34

Permalink

अप्रतिम लिहीलंय हो...!!!

अप्रतिम लिहीलंय हो...!!! ग्रेट!!
  • Log in or register to post comments

Submitted by तमराज किल्विष on गुरुवार, 09/05/2019 - 21:44

Permalink

पाय लागू जव्हेरजी. आपल्या

पाय लागू जव्हेरजी. आपल्या कडून अशा शब्दात प्रतिक्रिया मिळाली हे भाग्य माझे. खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 09/05/2019 - 22:18

Permalink

सुंदर मनोगत !

सुंदर मनोगत !
  • Log in or register to post comments

Submitted by तमराज किल्विष on गुरुवार, 09/05/2019 - 22:56

In reply to सुंदर मनोगत ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

धन्यवाद सर.

धन्यवाद सर.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 09/05/2019 - 22:21

Permalink

लिखाण आवडलं.

लिखाण आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by तमराज किल्विष on गुरुवार, 09/05/2019 - 22:56

In reply to लिखाण आवडलं. by यशोधरा

Permalink

धन्यवाद यशोधरा जी.

धन्यवाद यशोधरा जी.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on गुरुवार, 09/05/2019 - 23:00

Permalink

खूप मनापासून लिहिलंय. सुंदर

खूप मनापासून लिहिलंय. सुंदर आठवण.
  • Log in or register to post comments

Submitted by तमराज किल्विष on गुरुवार, 09/05/2019 - 23:03

In reply to खूप मनापासून लिहिलंय. सुंदर by पद्मावति

Permalink

धन्यवाद पद्मावति जी.

धन्यवाद पद्मावति जी.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Fri, 09/06/2019 - 08:26

Permalink

मस्त...

आजोबांच्या आठवणी आवडल्या, प्रत्येकाच्या मनात असे एक अजोबा असतातच पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by तमराज किल्विष on Fri, 09/06/2019 - 09:39

In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

धन्यवाद पैजारबुवा जी.

धन्यवाद पैजारबुवा जी.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Fri, 09/06/2019 - 09:23

Permalink

अप्रतिम ..

मी पण बालपणीं पोहोचलो. अडम तडम तड तड बाजे, चाऊ म्याऊ गरे खाऊ, अटक मटक चवळी चटक. आमच्यातली काही मुले इरिंग मिरिंग म्हणायची. मस्त लेख. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by तमराज किल्विष on Fri, 09/06/2019 - 09:39

In reply to अप्रतिम .. by सुधीर कांदळकर

Permalink

धन्यवाद सुधीर भाई.

धन्यवाद सुधीर भाई.
  • Log in or register to post comments

Submitted by श्वेता२४ on Fri, 09/06/2019 - 12:05

Permalink

मस्त स्मरणरंजन

हा घोडा कुणाचा? राजाचा, बटो बटो कुठे गेला होतात अशा प्रकारचे अनेक खेळ आठवले. छान लिहीलंय
  • Log in or register to post comments

Submitted by तमराज किल्विष on Sat, 09/07/2019 - 05:30

In reply to मस्त स्मरणरंजन by श्वेता२४

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by इरामयी on Sat, 09/07/2019 - 04:33

Permalink

खूप सुंदर. आजोबांचं निर्व्याज

खूप सुंदर. आजोबांचं निर्व्याज प्रेम.
  • Log in or register to post comments

Submitted by तमराज किल्विष on Sat, 09/07/2019 - 05:30

In reply to खूप सुंदर. आजोबांचं निर्व्याज by इरामयी

Permalink

धन्यवाद इरामयी.

धन्यवाद इरामयी.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com