अरारारा आरारारा आरारारा...... खतरनाक !!!

Primary tabs

वडगावकर's picture
वडगावकर in काथ्याकूट
5 Aug 2019 - 6:04 pm
गाभा: 

सकाळ पासून निस्ता काश्मीर चा गदारोळ.....

मिपा वरच्या रसिक वाचकांसाठी काही गणमान्य व्यक्तीचे विचारामृत तुषार गोळा करून आणले आहेत. त्याचा सप्रेम स्वीकार करावा आणि सगळ्यात महतवाचे ,
नुसते वाचू नका....चार तुषार तुम्ही पण गोळा करून खाली लिहा

।।१।। माननीय शरद पवार :- "विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं:"

'काश्मीरची संस्कृती वेगळी आहे. तेथील बहुतांश जनता भारताशी निष्ठा बाळगणारी आहे. जम्मू-काश्मीरबाबत इतका महत्त्वाचा निर्णय घेताना तेथील जनतेला व नेत्यांना विश्वासात घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

।।२।। माननीय गुलाम नबी आझाद :- "भाजप सरकारने देशाचे शिर कापले असून, देशाशी गद्दारी केली आहे"

।।३।। माननीय पी. चिदंबरम :- सरकारने जे काही केलं त्यात जोखीम आहे. या सरकारने राज्यघटनेतील कलमांची चुकीची व्याख्या केली आहे. भारताची विचारधारा धोक्यात आहे असं मी सर्व राजकीय पक्ष, राज्ये आणि देशातील जनतेला सांगू इच्छितो. हा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात वाईट दिवस आहे, असं ते म्हणाले.

।।४।। काँग्रेस पक्षप्रतोद भुवनेश्वर कलिता :- पंडित जवाहरलाल नेहरूंनीही कलम ३७० ला विरोध केला होता. हे कलम एक दिवस आपोआप पुसलं जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं. आज देशातील जनतेचीही हे कलम हटवण्यात यावे, अशी भावना असताना काँग्रेसला मात्र ते मान्य नाही. हे पाहिल्यानंतर काँग्रेस पक्ष आत्महत्या करायला निघाला आहे, असं वाटतं आणि यात मला भागीदार व्हायचे नाही म्हणूनच मी पक्षाचा व्हिप पाळायचा नाही, असे ठरवले आहे. मी याक्षणी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे

।।५।। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद कुरैशी :-“भारताने अत्यंत धोकादायक खेळी केली आहे. संपूर्ण क्षेत्रावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. इम्रान खान काश्मीर समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना भारत सरकारच्या या निर्णयाने समस्येचा गुंता वाढवला आहे. आता काश्मिरींवर पहिल्यांपेक्षा अधिक कडक पहारा लावण्यात आला आहे. आम्ही यासंबंधी संयुक्त राष्ट्राला सांगितलं आहे. इस्लामिक देशांनाही आम्ही याची माहिती दिली आहे”.

अपूर्ण....आता तुम्हीच....पुढे वाढवणार.....

प्रतिक्रिया

कश्मिर मधे काहिच गोन्धळ नाही

बेगानि शादि मैन अबुद्ला दिवाना

विनोदपुनेकर's picture

5 Aug 2019 - 6:14 pm | विनोदपुनेकर

मा. गृहमंत्री महोदयानि आज राज्यसभे मध्ये धारा ३७० रद्द करण्यामागील नंतर होणारे विविध फायदे सांगितले हा कल्पनाविलास कि वास्तिवकता हे समजायला वेळ लागणार आहे सध्या इतकंच बोलू शकेल कि मा. प्रधानसेवकांनी नोटबंदी करतेवेळे असेच खूप जास्त फायदे हे देशासमोर मांडले होते जसे कि नक्षलवाद, दहशतवाद, काळा पैसा, भ्रष्टाचार कॅशलेस व्यवहार पण या पैकी खरेच काही झाले का ? लोकप्रिय निर्णय घेण्याबद्दल आक्षेप नाही पण त्याची नीटशी अंमलबजावणी व्हावी एवढीच माफक अफेक्षा

घाबरून राहणाऱ्यांचे दिवस संपलेत.
अतिरेकी कारवाया तर इतर महासत्तांच्या भूमीवरही होत आहेत. चार पाच लोक जग हातात ठेवायला पाहात आहेत.

मायावती,बिजेडी,आप यांनी चकित केलय सहमती देऊन.

नि३सोलपुरकर's picture

6 Aug 2019 - 10:03 am | नि३सोलपुरकर

" मायावती,बिजेडी,आप यांनी चकित केलय सहमती देऊन. "-

काका मला वाट्ते ,मायावती चा डोळा जेके च्या विधानसभेतील १४ जागांवर आहे .(लोन्ग टर्म प्लान ).

जालिम लोशन's picture

5 Aug 2019 - 7:53 pm | जालिम लोशन

नाझींनी जे ज्युंबरोबर केले ते हे सरकार कश्मीरीं बरोबर करत आहे,

नाझींनी जे ज्युंबरोबर ~~~~

हे नाही समजले.

जालिम लोशन's picture

10 Aug 2019 - 10:11 am | जालिम लोशन

वंशसहांर

नाखु's picture

10 Aug 2019 - 10:29 am | नाखु

विधान केलेले आहे त्यांनाच कळले नाही तर बाकीच्या लोकांना काय कळणार.

आणि हो नुकतीच एका नकलाकाराने बंगाल भेट घेतली होती, कदाचित त्याचाही परिणाम असावा.

काही रोग साथीचे असू शकतात.

चिंचवडमध्ये सुरक्षित राहून फुकट सल्ला देणारा पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु