त्या

क्रांती's picture
क्रांती in लेखमाला
11 Sep 2019 - 6:05 am

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 17px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
margin:30px;
}

p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}

a: {
color: #990000;
}

a:link {
text-decoration: none;
}

a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
}
div.chitra1 {
max-width:650px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:300px;
margin: auto;
}

त्या

त्या रोजच जातात नदीकाठावर थकल्या-ओढल्या पावलांनी
अतृप्त इच्छा, अशक्त आशा, अस्वस्थ भावना, अपुऱ्या स्वप्नांचं
भलंथोरलं गाठोडं माथ्यावर घेऊन.
त्या रोजच आपटून-धोपटून
खसाखसा घासून, खळाखळा खंगाळून, करकचून पिळून काढतात,
विरल्या-विटल्या लक्तरांतला सारा मळ,
लख्ख करतात त्यांना बिलोरी आरशासारखं,
आणि झटाझट झटकून पसरतात सारी,
वाळूवर लांबच लांब.
मग काठावरच्या घनदाट सावलीच्या वत्सल चिंचेखाली, सळसळत्या बाळसेदार पिंपळाखाली,
विसावत गातात,
हरपल्या सुखाची गाणी गवसल्या वेदनांच्या स्वरांत.
झाडांवर क्षणभर थबकून फिरून गगनभरारी घेणारी
लडिवाळ पाखरं मिळवतात आपले भारलेले स्वर या गाण्यांत,
अन्
त्या स्वरांनी जादूची कांडी फिरावी, तसे
हिरव्यागार पानजाळीतून झिरपणारे काही निरागस कवडसे,
नाचतनाचत उतरतात लक्तरांवर.
उडत्या भिरभिर पंखांची, नाचऱ्या झुरुमुरू पानांची,
हलत्या कलाबतू सावल्यांची नवलाची नक्षी मिरवत खुलतात,
मखमली, गर्भरेशमी झालेली लक्तरं,
जरतारी सोनसळी तलम पोत लेवून.
त्या हरखून उठतात, हळुवारपणे घड्या घालतात,
नव्याकोऱ्या वस्त्रांच्या ,
अन् परततात थुईथुई नाचऱ्या पावलांनी,
माथ्यावर घेऊन सांजेचं अलवार रंगखुळं आकाश.

प्रकाशचित्र: मिलन वाडकर ( कृष्णा रिव्हर कँप)

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

वा! लिखाण, प्रकाशचित्र सगळंच उत्तम!

पद्मावति's picture

11 Sep 2019 - 11:56 am | पद्मावति

खुप सुरेख चित्रदर्शी कविता.
प्रकाशचित्र पण फार आवडले.

जॉनविक्क's picture

11 Sep 2019 - 12:07 pm | जॉनविक्क

सुरेख.

स्वधर्म's picture

11 Sep 2019 - 12:43 pm | स्वधर्म

कविता अाणि चित्रही खूप अावडले.

जव्हेरगंज's picture

11 Sep 2019 - 1:23 pm | जव्हेरगंज

जबरी लिखाण!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2019 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

आजी's picture

11 Sep 2019 - 1:59 pm | आजी

सुंदर लेखन.

श्वेता२४'s picture

11 Sep 2019 - 2:04 pm | श्वेता२४

सुरेख कविता.

जालिम लोशन's picture

11 Sep 2019 - 3:33 pm | जालिम लोशन

मेणवलीचा घाट.

दुर्गविहारी's picture

13 Sep 2019 - 6:15 pm | दुर्गविहारी

छान आहे कविता. मेणवलीच्या घाटाचा फोटोही मस्त.

तुषार काळभोर's picture

15 Sep 2019 - 5:22 pm | तुषार काळभोर

जबरदस्त कविता!!
फोटो पण मस्त.

अलकनंदा's picture

15 Sep 2019 - 6:07 pm | अलकनंदा

वा! तरल लिहिलंय.